मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जोक्स

मारवा · · काथ्याकूट
आंतर जालावर भ्रमण करतांना अचानक हे कठीण जोक्स हाती लागले. काही कळले काही कळल्या सारखे वाटले बाकी बहुतांश डोक्यावरुन गेले. पण मला नेहमीच्या रटाळ जोक्स पेक्षा वेगळे रोचक वाटले. हे सर्व जरी इंग्रजी असले तरी ज्यांनी कोणी बनवले त्यांनी फार कल्पकतेने बनवलेले विनोद आहेत. त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. हे एक जोक+पझल सारखे आहे जर तुम्ही यशस्वीरीत्या हे पझल सॉल्व्ह करु शकला तर तुम्हाला नक्कीच मजा येईल. याचा अर्थ लागत असेल तर त्यावर एक्सप्लनेटरी कॉमेंट करावी. नाही आवडले तर सोडुन द्या. फार लोड नका घेऊ. पटल तर बघा. आता उदा. जो जोक मला कळलाय तो सांगण्याचा प्रयत्न करतो. तो जोक असा आहे. It’s hard to take kleptomaniacs and puns seriously. Why? They take things literally. आता हा विनोद कळण्यासाठी काही संदर्भ माहीत असण आवश्यक आहे क्लेप्टोमॅनीआ म्हणजे एक असा मानसिक आजार ज्यात हा आजार असलेल्या व्यक्तीला चोरी ( चिल्लर दुकानात वगैरे ) करण्याची तीव्र अनकंट्रोलेबल इच्छा निर्माण होत असते. त्याला ती वस्तु उचलुन खिशात टाकण्याची चोरण्याची एक उबळ येत असते. तर असे लोक म्हणजे क्लेप्टोमॅनीअ‍ॅक्स हे काही सराइत गुन्हेगार वा क्रीमीनल नसतात मात्र ही एक सवय असते. दुसरा शब्द म्हणजे पन्स याचा अर्थ बघा pun, also called paronomasia, is a form of word play that suggests two or more meanings, by exploiting multiple meanings of words, or of similar-sounding words, for an intended humorous or rhetorical effect. मराठीत याला मला वाटत श्लेष साधणे किंवा द्वीअर्थी बोलणे असा अर्थ योग्य होइल. असे बोलणारे लोक असा शब्दच्छल करणारे लोक म्हणजे पन्स. पन्स ची काही मजेदार उदाहरणे बघा म्हणजे पन काय हे अधिक स्पष्ट होइल १-She had a photographic memory but never developed it. २-I was struggling to figure out how lightning works then it struck me. मराठीत बरीच उदाहरणे सापडतील उदा. झाडावर प्रेम करा झाडाखाली करु नका इ. तर आता तुम्हाला क्लेप्टोमॅनीअ‍ॅक्स आणि पन्स दोघांचा अर्थ कळलेला आहे आता परत एकदा हा जोक वाचा It’s hard to take kleptomaniacs and puns seriously. Why? They take things literally. अजुन एक दुसरा जोक इथे चिंतातुर जंतु नी छान समजावला आहे. तो जोक असा 4. Jean-Paul Sartre is sitting in a cafe revising his first draft of Being and Nothingness. He says to the waitress, “I would like a cup of coffee please. No cream.” the waitress replies, “I’m sorry sir, but we’re out of cream. How about with no milk?” चिंतातुर जंतु चा प्रतिसाद विनोद समजावून सांगणं मुळातच कठीण असतं; त्यात फ्रेंच इन्टेलेक्चुअल विनोद समजावणं (तेही अ‍ॅन्ग्लो-सॅक्सन संस्कृतीशी परिचित माणसाला!) आणखीच कठीण (डोळा मारत) पण काही मदत - मनुष्य स्वतंत्र असतो का? अस्तित्ववादानुसार मनुष्याला स्वातंत्र्याची शिक्षा झालेली आहे - l'homme est condamné à être libre. त्याला निर्णयस्वातंत्र्य असतं का? ते असो किंवा नसो, निर्णय घ्यावे लागतातच. म्हणजे तेसुद्धा माणसाला भाग पडतं. मग 'फ्री विल' आहे का? तर तीसुद्धा असतेच, आणि तिचं तसं (म्हणजे तिला परिपूर्ण करणार्‍या अनेक घटकांच्या नसण्यासकट) असणं हीच एक शिक्षा आहे. म्हणजे एखाद्या घटकाच्या 'नसण्या'तूनही कशाचं तरी अस्तित्व सिद्ध होतं. To be, or not to be, that is the question: Whether 'tis Nobler in the mind to suffer The Slings and Arrows of outrageous Fortune, Or to take Arms against a Sea of troubles, And by opposing end them: to die, to sleep वगैरे ह्या सगळ्याला एकत्र करून ह्या चौकटीत बसवलं आहे - 'क्रीम नसणं'च्या अस्तित्वाचा पर्याय तुम्हाला नाही; मग त्याऐवजी 'दूध नसणं'च्या अस्तित्वाचा उपलब्ध पर्याय तुम्ही स्वीकाराल का? म्हणजे तुम्ही त्याची निवड कराल का? त्यानं तुम्हाला मिळू शकणार्‍या कॉफीचं, पर्यायानं तुमच्या निवडस्वातंत्र्याचं आणि पर्यायानं तुमच्या अस्तित्वाचंही - नक्की काय होतं? तर मंडळी बघा मजा वाटली एक्स्प्लोअर करण्यात आनंद वाटला तर घ्या शेअर करा एक्स्प्लेन करा नाही तर सोडुन द्या इन एनी केस लोड नका घेऊ फार... हे घ्या जोक्स 1. Einstein, Newton and Pascal are playing a rousing game of hide and seek. Einstein begins to count to ten. Pascal runs and hides. Newton draws a one meter by one meter square in the ground in front of Einstein then stands in the middle of it. Einstein reaches ten, uncovers his eyes, and exclaims “Newton! I found you! You’re it!” Newton replies “You didn’t find me. You found a Newton over a square meter. You found Pascal!” 2. A mathematician and an engineer decided they’d take part in an experiment. They were both put in a room and at the other end was a naked woman on a bed. The experimenter said that every 30 seconds they could travel half the distance between themselves and the woman. The mathematician stormed off, calling it pointless. The engineer was still in. The mathematician said “Don’t you see? You’ll never get close enough to actually reach her.” The engineer replied, “So? I’ll be close enough for all practical purposes.” 3. A buddhist monk approaches a burger foodtruck and says “make me one with everything.” The buddhist monk pays with a $20 bill, which the vendor takes, puts in his cash box, and closes the lid. “Where’s my change?” the monk asks. The vendor replies, “change comes from within”. 4. Jean-Paul Sartre is sitting in a cafe revising his first draft of Being and Nothingness. He says to the waitress, “I would like a cup of coffee please. No cream.” the waitress replies, “I’m sorry sir, but we’re out of cream. How about with no milk?” 5. Noam Chomsky, Kurt Godel and Werner Heisenberg walk into a bar. Heisenberg turns to the other and says “Obviously this is a joke, but how can we tell if it’s funny?” Godel replies “We can’t know that because we’re inside the joke.” Chomsky says “Of course it’s funny, you’re just telling it wrong.” 6. It’s hard to take kleptomaniacs and puns seriously. Why? They take things literally. 7. What do you get when you cross a joke with a rhetorical question? 8. Three logicians walk into a bar. The bartender asks “Do all of you want a drink?” The first logician says “I don’t know.” The second logician says the same. The third says “Yes!” 9. A Roman walks into a bar and asks for a martinus. “You mean a martini?” asks the bartender. The Roman replies, “If I wanted a double, I would have asked for it.” 10. Another Roman walks into a bar, holds up two fingers, and says “Five beers please!” 11. A logician’s wife is having a baby. The doctor hands the baby to the dad. His wife asks if it’s a boy or girl. The logician replies “Yes.” 12. Boy I tell ya, entropy ain’t what it used to be. 13. How do you tell the difference between a plumber and a chemist? Ask them to pronounce unionized. 14. Why do engineers mix up Christmas and Halloween? Because Oct 31 = Dec 25 15. Pavlov is at a bar enjoying a pint. The phone rings and he shouts “Oh! I forgot to feed the dog.” 16. Helium walks into a bar and orders a beer. The bartender says, “Sorry, we don’t serve noble gases here.” Helium doesn’t react. 17. Shrodinger’s cat walks into the bar and doesn’t. 18. A Higgs Boson walks into a church. The priest says “We don’t allow Higgs Bosons in here.” The Higgs Boson replied, “Well, without me, you can’t have mass.” 19. A programmer’s wife asks him to pick up a loaf of bread and, if they have eggs, get a dozen. The programmer comes home with a dozen loaves of bread. 20. There’s a band called 1023MB. They haven’t had any gigs yet though.

वाचन 19175 वाचनखूण प्रतिक्रिया 81

जव्हेरगंज गुरुवार, 09/17/2015 - 19:26
2. A mathematician and an engineer decided they’d take part in an experiment. They were both put in a room and at the other end was a naked woman on a bed. The experimenter said that every 30 seconds they could travel half the distance between themselves and the woman. The mathematician stormed off, calling it pointless. The engineer was still in. The mathematician said “Don’t you see? You’ll never get close enough to actually reach her.” The engineer replied, “So? I’ll be close enough for all practical purposes.” ख्याक्....! हा एकच समजला..! बाकी जोक्स च्या मराठीकरणाच्या प्रतिक्षेत...

मांत्रिक गुरुवार, 09/17/2015 - 19:48
. Helium walks into a bar and orders a beer. The bartender says, “Sorry, we don’t serve noble gases here.” Helium doesn’t react हेलियम नोबल मूलद्रव्य आहे, म्हणजे त्याच्या शेवटच्या आण्विक कक्षेत फक्त १ इलेक्ट्राॅन असल्याने तो संतृप्त आहे. त्यामुळे तो अन्य कुठल्याच मूलद्रव्याशी संयोग पावू शकत नाही. म्हणजेच तो रिअॅक्ट (रासायनिक अभिक्रिया) होऊ शकत नाही. म्हणून फजिती होऊन देखील तो काहीच रिअॅक्ट (प्रतिक्रिया देणे) होत नाही. इथे रिअॅक्ट शब्द द्वयर्थी वापरला आहे.

In reply to by मांत्रिक

मांत्रिक गुरुवार, 09/17/2015 - 22:37
Noble gases have eight electrons in their outermost shell, except in the case of helium, which has two. The noble gases are colorless, odorless, tasteless, and nonflammable under standard conditions. क्षमस्व मिपाकर्स! त्याच्या शेवटच्या आण्विक कक्षेत फक्त १ इलेक्ट्राॅन असल्याने तो संतृप्त आहे. याऐवजी त्याच्या शेवटच्या आण्विक कक्षेत फक्त २ इलेक्ट्राॅन असल्याने तो संतृप्त आहे. असे वाचावे. काॅलेज संपून १४ वर्षे झाली, लक्षात आलं नाही. यांना इनर्ट वायु असंही म्हणतात. कुणाशीही केमिकली रिअॅक्ट होत नाहीत, म्हणून इनर्ट. शेवटच्या आण्विक कक्षेत २ किंवा ८ इलेक्ट्राॅन असतील तर ते केमिकली इनअॅक्टीव्ह असतात.

फुलथ्रॉटल जिनियस गुरुवार, 09/17/2015 - 19:51
आयला, असले लेख वाचून वैचारीक मैथुन करुन घेण्यापेक्षा मी फेसबूक वापरलेले बरे, आज मिपाचा वाढदिवस, आज तरी हलके फुलके लेख् टाका राव.

In reply to by फुलथ्रॉटल जिनियस

मारवा गुरुवार, 09/17/2015 - 21:20
फुलथ्टॉटल जिनीयस रनींग अवे फ्रॉम इन्टेलेक्च्युअल इंटरकोर्स ! हलक्यात घ्या जोकच होता हलका फुलका

मांत्रिक गुरुवार, 09/17/2015 - 19:57
. A Roman walks into a bar and asks for a martinus. “You mean a martini?” asks the bartender. The Roman replies, “If I wanted a double, I would have asked for it.” रोमन एकवचन व अनेकवचन यांवर विनोद आहे. radius = radii Fungus = fungi Hence martinus = martini मार्टीनी हे त्याला अनेकवचन वाटले असेल, व साहजिकच त्याने मार्टिनस असा शब्द एकवचनी म्हणून वापरला.

In reply to by मांत्रिक

मारवा गुरुवार, 09/17/2015 - 21:33
हे थोड रोमन एकवचन अनेकवचन थोड अधिक विस्तार पुर्वक द्या ना म्हणजे मराठी किंवा इंग्रजी शी तुलना करुन सांगीतल तर लक्षात येइल अस नाही लक्षात येत आहे प्लीज एलाबोरेट इट सर

In reply to by मांत्रिक

मांत्रिक गुरुवार, 09/17/2015 - 21:39
रोमन भाषेची स्टाईल आहे. रॅडियस हे एक वचन तर रॅडिआय हे अनेकवचन. फंगस हे एकवचन तर फंजाय हे अनेकवचन. म्हणून त्या रोमनाला, जो एकच पेग घेणार होता, त्याला वाटलं की मार्टीनाय हे अनेकवचन व मार्टीनस हे एकवचन. म्हणून एकच पेग घेण्याच्या तयारीत आलेला तो मार्टीनस ऑर्डर करतो.

जव्हेरगंज गुरुवार, 09/17/2015 - 20:05
10. Another Roman walks into a bar, holds up two fingers, and says “Five beers please!” दोन बोटांचा आकार इंग्रजी V असा होतो. म्हणजेच रोमन 'पाच'.

बहिरुपी गुरुवार, 09/17/2015 - 20:49
16. A Higgs Boson walks into a church. The priest says “We don’t allow Higgs Bosons in here.” The Higgs Boson replied, “Well, without me, you can’t have mass.” हिग्ज बोसॉन ला गॉड पार्टिकलपण म्हणतात. मास म्हणजे वस्तुमान आणि चर्च मधल्या प्रेयरला पण मास म्हणतात. मला वाटत, एवढ्या माहिती वर जोक समजावा.

बहिरुपी गुरुवार, 09/17/2015 - 21:18
1. Einstein, Newton and Pascal are playing a rousing game of hide and seek. Einstein begins to count to ten. Pascal runs and hides. Newton draws a one meter by one meter square in the ground in front of Einstein then stands in the middle of it. Einstein reaches ten, uncovers his eyes, and exclaims “Newton! I found you! You’re it!” Newton replies “You didn’t find me. You found a Newton over a square meter. You found Pascal!” पास्कल प्रेशर मोजण्याचे एकक आहे तर न्यटन फोर्स च. एक पास्कल म्हणजे एक न्यटन पर मिटर स्क्वेअर. न्यटन एक मिटर बाय एक मिटर च्या स्क्येअर मध्ये उभा राहीला म्हणजे एक न्यटन पर मिटर स्क्वेअर म्हणुन पास्कल असे म्हणाला.

तुषार काळभोर गुरुवार, 09/17/2015 - 21:35
१३. प्लंबर कामगार असल्याने तो शब्द तो युनियनाईझ्ड असा उच्चारेल, तर केमिस्ट अन-आयनाईझ्ड म्हणेल. १४. दशमान पद्धतीत २५ म्हणजे अष्टमान पद्धतीत ३१.((१०*२)+५)=((८*३)+१) ८ अन् १२ सांगंल का कुनी फोडुन?

In reply to by तुषार काळभोर

मारवा गुरुवार, 09/17/2015 - 21:49
एकदम अचुक धो बी प छा ड और इसीके साथ नंबर १३ भी सॉल्व हो गया अब बहोत ही थोडे मैदान मे बचे है

आदूबाळ गुरुवार, 09/17/2015 - 21:37
19. A programmer’s wife asks him to pick up a loaf of bread and, if they have eggs, get a dozen. The programmer comes home with a dozen loaves of bread.
प्रोग्रॅमरने बायकोच्या बोलणं बूलियन पद्धतीने सोडवलं. (ईश्वर त्याचं भलं करो.)

In reply to by मारवा

प्यारे१ गुरुवार, 09/17/2015 - 22:05
त्याची बायको कंडीशन घालतेय ना की 1 ब्रेड पाकीट आणा आणि अंडी असली तर 12 आणा. आता दुकानात अंडी आहेत. अंडी असणं ही अट पूर्ण झाल्यानं पुन्हा पहिल्या पायरीवर जाऊन 12 ब्रेड पाकीटं आणली.

In reply to by आदूबाळ

चाणक्य गुरुवार, 09/17/2015 - 22:09
की त्याची बायको म्हणते की 'एक ब्रेड आणा आणि अंडी असतील तर डझनभर आणा.' आता दुकानात अंडी होती....कंडीशन फुलफील्ड. भाऊनी डझनभर ब्रेड आणले. (मला यात बूलियन वगैरे समजलं नाही)

In reply to by मांत्रिक

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 09/17/2015 - 23:16
बरोबर आहे रे मांत्रिका. बायकोला हे अपेक्षित होते. int LoafOfBread = 1; int Eggs = 12; पण त्याने असा विचार केला असावा. if(Eggs >=1) LoadOfBread = 12;

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ही ही ही.... आपण डूआयडी असल्याचा पुरावा खुद्द माईसाय्बांनीच दिला की वो ! गलतीसे मिष्टेक हो गया ना माईसो ?! =)) (हे म्हणजे, बिरबलाने झोपलेल्या बहुभाषी पंडिताच्या अंगावर गार पाणी ओतून त्याची मातृभाषा ओळखली, अग्दी तस्संच झालं की वो ! ;) :) )

जव्हेरगंज गुरुवार, 09/17/2015 - 21:45
8. Three logicians walk into a bar. The bartender asks “Do all of you want a drink?” The first logician says “I don’t know.” The second logician says the same. The third says “Yes!” लॉजिशियन फक्त हो, नाही कि़वा माहीत नाही एवढीच उत्तरे देऊ शकतात. पहिल्या दोन टग्यांना माहीत नसते कि तिसरा कॉफी घेणाराय कि नाही, म्हणुन ते माहीत नाही म्हणतात. पण तिसऱ्याला माहीत असतं ईतर दोघांना कॉफी ढोसायचीय. म्हणुन तो हो म्हणतो.

In reply to by जव्हेरगंज

चाणक्य गुरुवार, 09/17/2015 - 22:04
तसं नाहीये ते. १. पहिल्याला प्यायचीये पण बाकीच्या दोघांना हवीये का नकोय ते त्याला माहीत नाही. म्हणून 'तिघं घेणार का?' या प्रश्नाला तो माहीत नाही म्हणतो. त्याला जर प्यायची नसती, तर त्याचं उत्तर नाही असं असतं. सो पहिल्याला प्यायची आहे हे नक्की झालं २. आता दुस-याला हे कळलंय की पहिल्याला प्यायचीये. आणि त्याला पण प्यायचीये पण तिस-याला प्यायचीये की नाही हे त्याला माहीत नाही. त्यामुळे तो पण 'माहीत नाही' असं उत्तर देतो. त्याला प्यायची नसती तर त्यानेही उत्तर नाही असंच दिलं असतं. सो दुस-यालाही प्यायची हे नक्की झालं. ३. आता तिस-याचं काम सोप्प झालं. त्याला पहिल्या दोघांच्या उत्तरावरून लाॅजिकली हे कळालं की या दोघांना काॅफी हवीये. आणि त्यालाही हवीये, त्यामुळे त्याचं उत्तर हो असं आलं.

In reply to by चाणक्य

राजाभाऊ Sun, 09/20/2015 - 22:09
इनसफिशियंट इन्फरमेशन... पहिल्याला प्यायची नसेल तर बाकिच्या दोघांना हवी का नको ते त्याला माहित नाहि, म्हणुनहि तो "माहित नाहि" म्हणेल ना?

In reply to by राजाभाऊ

एस Mon, 09/21/2015 - 01:28
प्रश्न असा आहे की, 'तुम्हां सर्वांना प्यायची आहे का?' आता इथे तीन विधाने आहेत आणि लॉजिकल ऑपरेटर 'अ‍ॅण्ड' आहे. तुमचा तर्क बरोबर तेव्हा ठरला असता जेव्हा लॉजिकल ऑपरेटर 'ऑर' असता. म्हणजे विधान काय आहे? If (A=Yes) AND (B=Yes) AND (C=Yes) Then Everyone wants to drink यातील पहिले विधान जरी बरोबर असले तरी संपूर्ण तर्क खरा होण्यासाठी दुसरे व तिसरे विधानही बरोबर असायला हवे. त्यामुळे पहिल्याला प्यायची असली तरी इतर दोघांना प्यायचीये की नाही हे माहीत नसल्यामुळे तो 'आय डोन्ट नो' असे उत्तर देतो. तसेच दुसराही. यातील एकाचेही उत्तर स्वतःपुरते नकारात्मक आल्यास तो इतर कुणाचा विचार न करताच 'आम्हां सर्वांना प्यायचीये असे नाही' हे म्हणू शकतो.

नीलमोहर गुरुवार, 09/17/2015 - 23:13
3. A buddhist monk approaches a burger foodtruck and says “make me one with everything.” The buddhist monk pays with a $20 bill, which the vendor takes, puts in his cash box, and closes the lid. “Where’s my change?” the monk asks. The vendor replies, “change comes from within”. एक बौद्ध भिक्षु बर्गर फूड ट्रक मधून बर्गर घेतो. तो २० डॉलर देतो जे विक्रेता घेतो आणि गल्ल्यात टाकतो. भिक्षु विचारतो माझे उरलेले पैसे (चेंज) कुठेत, त्यावर विक्रेता उपरोधिक तत्त्वज्ञानी उत्तर देतो, " बदल (चेंज) स्वत:तूनच येतो." इंग्लिशमध्ये उरलेल्या सुट्टया पैशांना चेंज म्हणतात, चेंज कम्स फ्रॉम विदिन म्हणजे एक तत्त्वज्ञानी वचन आहे ज्याचा अर्थ होतो बदल आपल्या आतूनच येतो. भिक्षु: माझे उरलेले पैसे (चेंज) ? विक्रेता: चेंज आतूनच येतो ;)

In reply to by नीलमोहर

आदूबाळ Fri, 09/18/2015 - 00:24
इतकंच नाहीये. एक गुप्त विनोदही यात आहे.
A buddhist monk approaches a burger foodtruck and says “make me one with everything.”
इथे तो बर्गरवाला अर्थ घेतो की सगळी चराचर सृष्टी वापरून बर्गर बनव. (वामन पृथ्वीचा घास घ्यायला निघाला तसं.)
“Where’s my change?” the monk asks. The vendor replies, “change comes from within”.
सुट्टे मागितल्यावर तो बर्गरवाला म्हणतो, बाबारे, सुट्टेही चराचरातलाच एक भाग आहे. ते तर तुझ्या चराचर-बर्गरमध्ये गेले. आता मी कुठून देऊ?

नीलमोहर गुरुवार, 09/17/2015 - 23:13
3. A buddhist monk approaches a burger foodtruck and says “make me one with everything.” The buddhist monk pays with a $20 bill, which the vendor takes, puts in his cash box, and closes the lid. “Where’s my change?” the monk asks. The vendor replies, “change comes from within”. एक बौद्ध भिक्षु बर्गर फूड ट्रक मधून बर्गर घेतो. तो २० डॉलर देतो जे विक्रेता घेतो आणि गल्ल्यात टाकतो. भिक्षु विचारतो माझे उरलेले पैसे (चेंज) कुठेत, त्यावर विक्रेता उपरोधिक तत्त्वज्ञानी उत्तर देतो, " बदल (चेंज) स्वत:तूनच येतो." इंग्लिशमध्ये उरलेल्या सुट्टया पैशांना चेंज म्हणतात, चेंज कम्स फ्रॉम विदिन म्हणजे एक तत्त्वज्ञानी वचन आहे ज्याचा अर्थ होतो बदल आपल्या आतूनच येतो. भिक्षु: माझे उरलेले पैसे (चेंज) ? विक्रेता: चेंज आतूनच येतो ;)

In reply to by नीलमोहर

सचिन जोशी Fri, 09/18/2015 - 00:28
इथे “make me one with everything” याचे सुद्धा दोन अर्थ निघतात. एक अर्थ असा की मला सर्व पदार्थ घालून बर्गर दे. तत्वाद्यानी अर्थ असा की मला सर्वांशी सम्रुप होऊ दे. वेटर इथे तत्वाद्यानी उत्तर देतो की कोणताही बदल स्वतह्पासून सुरू होतो.

भाकरी Fri, 09/18/2015 - 00:10
हे अफलातून कलेक्शन कुठे सापडलं तुला ते आधी सांग.

In reply to by भाकरी

भाकरी Fri, 09/18/2015 - 00:28
In a first year anatomy class in medical school, the professor was going over various muscles in body and their functions. When he asked the class "What's the function of 'gluteus medius' muscle?", he got a prompt reply from back benches - "It turns heads!"

राजेश घासकडवी Fri, 09/18/2015 - 09:15
15. Pavlov is at a bar enjoying a pint. The phone rings and he shouts “Oh! I forgot to feed the dog.” हा विनोद आहे पाव्हलॉव्हच्या सुप्रसिद्ध प्रयोगाबद्दल. त्याने प्रयोगात अनेकवेळा घंटा वाजवून मग कुत्र्याला खायला दिलंं. कुत्र्याचं त्यामुळे 'घंटा वाजली की खाणं मिळतं' असं प्रोग्रामिंग (कंडिशनिंग) झालं. त्याला घंटा वाजल्यावर भूक लागायला लागली. हे पाव्हलॉव्हने त्या कुत्र्यांची लाळ किती गळते हे मोजून दाखवून दिलं. या जोकमध्ये त्याच्या बरोबर उलटं चित्र दाखवलं आहे. फोनची घंटा वाजल्यावर पाव्हलॉव्ह ताडकन उठून म्हणतो 'अरेच्च्या, मला कुत्र्याला खायला घालायला हवं.' याचा अर्थ असा की घंटा वाजल्यावर कुत्र्याला खायला देऊन देऊन स्वतः पाव्हलॉव्हचंच प्रोग्रामिंग (कंडिशनिंग) झालं. घंटा वाजली की त्याला खायला घालायची गरज निर्माण झाली.

राजेश घासकडवी Fri, 09/18/2015 - 09:27
17. Shrodinger’s cat walks into the bar and doesn’t.
श्रोडिंजर हा क्वांटम मेकॅनिक्सचा जनक. क्वांटम मेकॅनिक्समध्ये मूलभूत कण - इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वगैरेसारखे पार्टिकल्स - हे एका प्रकारच्या वेव्हफंक्शनने दाखवले जातात. हे वेव्हफंक्शन दोन स्थितींचं बनलेलं असतं. जोपर्यंत आपण प्रयोग करून त्या कणाची स्थिती (उदाहरणार्थ, ऊर्जा किती आहे ही स्थिती) शोधून काढत नाही तोपर्यंत ते नक्की कुठच्या स्थितीत आहे असं सांगता येत नाही. जेव्हा आपण प्रयोग करून ते तपासून बघतो, तेव्हा त्या दोनपैकी एका स्थितीत ते सापडतं. मग आपल्याला त्याविषयी विधान करता येतं. हे समजावून सांगण्यासाठी त्याने एका खोक्यात बंद केलेल्या मांजराचं उदाहरण दिलं होतं. त्या खोक्यात एक विषारी वायूची कुपी आहे. आणि ती कुपी फुटणार की नाही हे एका रेडिओअॅक्टिव्ह मटेरिअलमधून बाहेर पडणाऱ्या प्रारणावरून ठरतं. आता हा कण बाहेर पडेल की नाही, कधी पडेल हे सांगता येत नाही - सुमारे तासाला एक या गतीने बाहेर पडेल एवढंच सांगता येतं. आता आपण जर पंधरा मिनिटांनी खोक्याच्या बाहेरून विचारलं, की मांजर जीवंत आहे की मेलेली आहे? तर ती जीवंत आणि मेलेली अशा दोन स्थितींच्या एकत्रित वेव्हफंक्शनने मांडावी लागते. जेव्हा आपण बॉक्स उघडून बघतो तेव्हा ती जीवंत किंवा मेलेली सापडते. हे सामान्य इंट्युइशनच्या पलिकडचं आहे, पण क्वांटम जग असंच चालतं. म्हणून जोकमध्ये एकाच वेळी ती मांजर बारमध्ये शिरलेली आणि न शिरलेली अशा दोन्ही स्थितीत आहे असं म्हटलं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

चाणक्य Fri, 09/18/2015 - 09:36
सोप्या भाषेत कसं लिहावं हे कळत नव्हतं. तुम्ही मस्त समजावून सांगितलंत

In reply to by राजेश घासकडवी

मारवा Fri, 09/18/2015 - 13:02
वरील विनोद कधीच कळला नसता. तुमचाच प्रतिसाद वापरुन मी मोदी असतो तर तुम्हाला सेन्सॉर बोर्डा चा अध्यक्ष केल असतं ह.घ्या. गुरुजी.

कानडा Fri, 09/18/2015 - 09:50
20. There’s a band called 1023MB. They haven’t had any gigs yet though. >> बँड च नाव आहे १०२३MB. 1Giga Bytes =1024MB. म्हणुन त्यांना अजुन एकही गिग मिळालली नाही. तसेच त्यांना अजुन कोणिही hire केलेले नाही हे सुद्धा यातुन सांगितले आहे. Gig is slang for a musical engagement in which musicians are hired.

कानडा Fri, 09/18/2015 - 09:58
A logician’s wife is having a baby. The doctor hands the baby to the dad. His wife asks if it’s a boy or girl. The logician replies “Yes.” >> हे उत्तर OR लॉजिक वापरुन दिलेले आहे. प्रश्न आहे "if it’s a boy or girl?". OR लॉजिकने याचे उत्तर हो असेच येणार. दोन (किंवा अनेक) पर्यायांपैकी एखादा जरी बरोबर असला तरी उत्तर LOGICAL ONE म्हणजे हो येणार.

सुबोध खरे Fri, 09/18/2015 - 10:26
आचार्य अत्रेंना एका माणसाने रात्री दहा वाजता फोन करून वेळ काय झाली ते विचारले त्यावर त्यांनी उत्तर दिले, आता "जवळ जवळ" झोपायचीच वेळ झाली.

In reply to by सुबोध खरे

मारवा Fri, 09/18/2015 - 13:47
नसती भानगड व्हायची महाराष्ट्रात गेल्या दहा हजार वर्षात उठल नसेल अस वादळ उठेल. मी हा थोडा असा वाचलेला आहे. एकदा एक बाई आणि अत्रे काही कामा निमीत्ताने रात्री पर्यंत बसलेले होते. बाईंनी विचारले काय वेळ झाली ? अत्र्यांनी निरागसतेने उत्तर दिले होते दहा वाजले जवळ जवळ झोपण्याची वेळ झालीय. ( माणसाला अस उत्तर अत्रे देतील का ? )

मारवा Fri, 09/18/2015 - 13:41
मंडळी ५ वा ७ वा आणि १२ वा अजुन बाकी आहेत ७ वा माझ्या मते टफेस्ट आहे, 5. Noam Chomsky, Kurt Godel and Werner Heisenberg walk into a bar. Heisenberg turns to the other and says “Obviously this is a joke, but how can we tell if it’s funny?” Godel replies “We can’t know that because we’re inside the joke.” Chomsky says “Of course it’s funny, you’re just telling it wrong.” 7. What do you get when you cross a joke with a rhetorical question? 12. Boy I tell ya, entropy ain’t what it used to be.

In reply to by मारवा

मांत्रिक Fri, 09/18/2015 - 14:00
Entropy:- याचा अर्थ अव्यवस्था असा साधारण आहे. व्यवस्थेकडून अव्यवस्थेकडे जाणे हा वस्तुचा किंवा एखाद्या सिस्टीमचा गुणधर्म असतो. म्हणजे: १.आजचा सुंदर चेहरा कालांतराने म्हातारा सुरकुतलेला होणे. २.आज अगदी उत्तम असणारा मोबाईल, टीव्ही, कार पुढे पुढे भंगार होत जातात. आता पाहू विनोदाचा अर्थ कुणाला उकल करता येतो का? मला तर नाही जमलं.

In reply to by चिगो

मारवा Sun, 09/20/2015 - 13:37
तुम्ही म्हणता तो पन अर्थ बरोबरच आहे पन मी काय म्हणतो चिगो हे वाचल्यावर मला पन एक स्टेटमेंट आठवलं महाजन सरांच्या एका निसर्गावरील लेखात वाचलेलं Change is the only constant thing in the nature. या वाक्यासमोर हे एन्ट्रॉपी च वाक्य ठेवल तर काय मजा येतेय बघा Boy I tell ya, entropy ain’t what it used to be.

In reply to by मारवा

राही Sun, 09/20/2015 - 14:52
एन्ट्रॉपी दर क्षणाला (किंवा काळाच्या सूक्ष्म एकांकाला) बदलत असते. मग पूर्वीची एन्ट्रॉपी आत्ता कशी राहील. म्हणून पूर्वीची एन्ट्रॉपी आता नाही बॉ.

अन्या दातार Fri, 09/18/2015 - 14:06
विश्वातील एन्ट्रोपी ही कायम वाढत असते. त्यामुळे एका क्षणाला असणरी एन्ट्रोपी दुसर्‍या क्षणाला बदललेली असते. यावरुन ७वा जोक लक्षात यावा. अधिक वाचन - http://www.askamathematician.com/2011/12/q-why-does-the-entropy-of-universe-always-increase-and-what-is-heat-death-of-the-universe/

मारवा Fri, 09/18/2015 - 14:55
१- Your mother is so classless, she could be a Marxist utopia. २- What do you call two crows on a branch? Attempted murder. ३- Did you hear about the suicidal homeopath? He took 1/50th of the recommended dose. ४- The average human has one breast and one testicle. ५- Did you hear about the dyslexic, agnostic insomniac? He stayed up all night wondering if there was a dog. ? यातील पाचवा जोक असा आहे डायलेक्सीआ हा एक आजार आहे याचा अर्थ Dyslexia, also known as reading disorder, is a learning disability characterized by trouble with reading despite normal intelligence यात असा मनुष्य स्पेलींग चा घोळ करतो, वाचण्यात अडचण असते इ. agnostic म्हणजे असा मनुष्य जो ईश्वराच्या अस्तीत्वा वा नसण्याविषयी दोन्ही विषयी तो सांशक आहे. अनिर्णीत अवस्थेत आहे. आस्तिक हि नाही आणि नास्तिक ही नाही असा अज्ञेयवादि आहे. त्याला नेहमी प्रश्न पडलेला असतो तो ठाम निर्णय घेण शक्य नाही हाच त्याचा स्टॅन्ड आहे. इनसोम्नीअ‍ॅक ज्याला निद्रानाश झालेला आहे आता हा जोक परत वाचा Did you hear about the dyslexic, agnostic insomniac? He stayed up all night wondering if there was a dog. ? डायलेक्सीआ ने डॉग च स्पेलींग उलट वाचुन घोळ केलाय आणि ...... वरती मराठे नी एका प्रतिसादात असाच एक डायलेक्सीक चा जोक दिलाय A dyslexic man walks into a bra. यात परत बार च्या एवजी स्पेलींग मध्ये घोळ करुन ब्रा केलय. डायलेक्सीआ चा संदर्भा https://en.wikipedia.org/wiki/Dyslexia

In reply to by तुषार काळभोर

दिपोटी Mon, 09/21/2015 - 15:17
जगात ५०% पुरुष (प्रत्येकी दोन testicles) व ५०% स्त्रिया (प्रत्येकी दोन breasts) आहेत, तर यांचे सरासरी प्रमाण काढल्यास 'प्रत्येक व्यक्तीस एक स्तन व एक वृषण आहे' असे अनुमान निघते, जे अर्थात फार विनोदी आहे. सरासरी प्रमाणावर, खरे तर, संख्याशास्त्रावर अति विसंबून राहणे कसे फोल आहे हे यातून दिसते. यावरुनच एक दुसरा विनोद आठवला तो असा: 'Beware of averages! Always remember the man who drowned while crossing a river with an average depth of six inches.' म्हणजेच 'संख्याशास्त्रापासून सावध रहा! सरासरी सहा इंच खोली असलेल्या नदीचे पात्र ओलांडताना बुडालेल्या त्या माणसाला कधी विसरु नका.' आता फक्त सहा इंच सरासरी खोली असलेल्या नदीत तो कसा बुडाला असल बरं? तर सरासरीवरुन कमाल (maximum) खोलीचा अंदाज काढणे कसे धोक्याचे आहे हे पहा: त्या नदीमध्ये ६७ ठिकाणी खोली मोजली असता त्यातील ६६ ठिकाणी फक्त ५ इंच व एका ठिकाणी तब्बल ७२ इंच (सहा फूट) खोली असल्यास त्या नदीची सरासरी खोली फक्त ६ इंचच असेल. सरासरी प्रमाणावर, खरे तर, संख्याशास्त्रावर अति विसंबून राहणे कसे फोल आहे हे यातून देखील दिसते.

In reply to by दिपोटी

बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 10:52
एका प्रकल्पावर दोन पुरुष आणि १०० स्त्रिया काम करत असतात. कालांतराने हे दोन पुरुष या १०० स्त्रियांपैकी दोघींशी लग्न करतात. एक संख्याशास्त्रज्ञ याचा report कसा लिहील? १००% पुरूषांनी २% स्त्रियांशी लग्न केलं.

मारवा Fri, 09/18/2015 - 15:01
६- Infinitely many mathematicians walk into a bar. The first says, "I'll have a beer." The second says, "I'll have half a beer." The third says, "I'll have a quarter of a beer." The barman pulls out just two beers. The mathematicians are all like, "That's all you're giving us? How drunk do you expect us to get on that?" The bartender says, "Come on guys. Know your limits."

मारवा Fri, 09/18/2015 - 20:41
तो वरचा क्लेप्टोमॅनीअअ‍ॅक्स चा जोक देण्यात चुक झाली होती म्हणुन थोडा अवघड ही झाला तो मुळ लेखात असा दिलेला आहे 6. It’s hard to take kleptomaniacs and puns seriously. Why? They take things literally. तो खर म्हणजे फार च सोपा आहे तो असा आहे. तो असा वाचावा हा आवर्जुन कळवण्यासाठी साहेबांचे धन्यवाद मला साला कठीण स्वरुपात सापडलेला हे खर म्हणजे एकदम च सोप आहे की. It's hard to explain puns to kleptomaniacs because they always take things literally चुकभुल देणेघेणे

अंतु बर्वा Sat, 09/19/2015 - 00:12
What do you call two crows on a branch? Attempted murder. ईथे दिलेल्या माहितीवरुन, मर्डर म्हणजे कावळ्यांचा संच. एखाद्या कावळ्यांच्या संचाला मर्डर म्हणण्यासाठी कमीत कमी ३ कावळे हवेत म्हणुन अटेंप्टेड मर्डर असावं. बादवे, हा एक छान जोक सापडला: A photon checks into a hotel and the porter asks him if he has any luggage. The photon replies: “No, I’m travelling light.”

मारवा Sun, 09/20/2015 - 13:49
तो जोक माहीतेय का एक वडील की मास्तर मुलाला सांगत असतात. ते एक लाल रंगाच द्रव्य असत ते घेतल्यावर थोडी चक्कर आल्यासारख होत ते अस असत न ते तस असत अस लपवत लपवत लाजत लाजत मास्तर सांगत असतो पोराचा बल्ब पेटतो तो सरळ म्हणतो अहो दारु म्हणा की मास्तर

मारवा Mon, 09/21/2015 - 16:26
7. What do you get when you cross a joke with a rhetorical question? चिंतातुर जंतु चा प्रतिसाद Rhetorical_question - A rhetorical question is a figure of speech in the form of a question that is asked in order to make a point rather than to elicit an answer. उदा : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? ह्या प्रश्नाचं उत्तर कुणी देणं अपेक्षितच नाही. ते प्रश्नातच आहे. https://en.wikipedia.org/wiki/Rhetorical_question What do you get when you cross a क्ष with a य? ही विनोदाची एक विधा आहे (genre). उदा : What do you get when you cross a karate expert with a pig? A pork chop. पण विनोदाच्या ह्या प्रकारात काही तरी उत्तर येतं तेव्हाच विनोद पूर्ण होऊ शकतो. मात्र, ह्या प्रकारातल्या विनोदाचा आणि Rhetorical_questionचा जेव्हा संकर होतो तेव्हा... आता कळलं?

असंका Wed, 09/23/2015 - 07:56
अजूनही नाय कळलं....र्‍हेटोरीकलचा अर्थ माहित होता. 'व्हॉट डू यु गेट...' ही एक जॉन्रॉ आहे हे माहित नव्हतं. ते आता कळलंय, तरीही जोक नाहीच कळला. यात जर काही विरोधाभास असेल, तर तोच विनोद आहे का?

बोका-ए-आझम Wed, 09/23/2015 - 10:49
मार्क्सवादाचं अंतिम उद्दिष्ट आहे वर्गहीन समाज (a classless society ) निर्माण करणं पण त्याच्या टीकाकारांच्या मते हे अशक्य स्वप्न ( Utopia) आहे. Class चा एक अर्थ दर्जा असा पण आहे. बहुतेक एखाद्या मुलीने तिच्या नव-याला किंवा नव-याने त्याच्या बायकोला मारलेला हा टोमणा आहे - Your mother is so classless, that she is Marxist Utopia. इथे class या शब्दावर श्लेष आहे.

तुडतुडी Wed, 09/23/2015 - 13:43
झक्कास . १ नंबर । प्रोफेट - प्रेषीत नास्तिकांना ज्याच कायम वावड आहे तो तुमच्यासाठी आम्ही नास्तिक . आमच्यासाठी तुम्ही नास्तिक . हाकानाका