मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वैराग्याकडे पाउले

शेखरमोघे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
छंद लावला, जोपासला जोपासला वेल, बाग लावला, फुलवला, वाढवला पक्षी आले, आनंदले, वसले, वाढले सर्वां जसे नंदनवनच मिळाले पण आता … नद्या, तळी, निर्झर आटले, टिपूसभर पाणी मिळेनासे झाले आज जरी पक्षांना उडवून घालवले, अखेरचे बागेत पाणी शिंपले, तरी डोळा टिपूस न आले, हीच का वैराग्याकडे पाउले?

वाचने 2129 वाचनखूण प्रतिक्रिया 6

पद्मावति 16/09/2015 - 11:06
छान जमलीय कवीता. फक्त कवीतेची लांबी फारच कमी झाली आहे. वाचता वाचता अरे, वाह मस्तं...असे मनात येत नाही तोच संपलीसुद्धा. थोडी मोठी असती तर वाचायला अजुन आवडली असती.

जव्हेरगंज 16/09/2015 - 19:13
मोघेसाहेब मस्त....!!! हीच कविता जराशी सुधारून... छंद लावला, जोपासला जोपासला. वेल, बाग लावला, फुलवला, वाढवला. पक्षी आले, आनंदले, वसले, वाढले. सर्वां जसे नंदनवनच मिळाले. पण आता … नद्या, तळी, निर्झर आटले. टिपूसभर पाणी मिळेनासे झाले. आज जरी पक्षांना उडवून घालवले, अखेरचे बागेत पाणी शिंपले. तरी डोळा टिपूस न आले, हीच का वैराग्याकडे पाउले?