आवर्त
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या चरचरीत पंज्याला सुखावणारा
तुझा चिमुकला मऊसूत तळवा
तुला भान देखील नाही बोचऱ्या स्पर्शाचे
गाढ झोपेत मंद हसरा तुझा चेहरा
इकडे प्रेम आणि तिकडे आधार
यांच्या आश्वासक सोबतीत
विसावलाय, दिवसभराचे उनाडणे विसरून
तुझ्या निर्व्याज निजेची गुंगी
मलाही चढू लागली आहे हळूहळू
खूप वर्षापूर्वी माझ्या शेजारी
अशीच होती शांत निजलेली
दोन छोटी पाउले.
मला टक्क जागे ठेवून
माझी शर्यत सुरू झाली होती
त्यांना जिंकविण्याची
ती कोमल पाउले,
हजारो मैलांचा प्रवास समोर होता त्यांच्या
त्यांना बळ देऊ शकणार कां मी?
दिशा कशी दाखविणार?
कुठे भरकटणार नाहीत नां ती?
बिन उत्तराचे प्रश्न पांघरून मी तळमळत,
चिमुकली दोन पाउले अशीच होती
शांत निजलेली बाजूला.
पण किती फरक, तेव्हा आणि आत्ता!
त्यावेळी त्यांना
बळ देण्याचा भार माझ्या पाउलांवर
त्यांना दिशा दाखविण्याचे दायित्व माझ्या शिरावर!
चिमुकली पाउले होती गाढ झोपेत,
मी तळमळत!
आता,
तुझी रेशमी पाउले
माझ्या खरखरीत तळपायाला गोंजारत
आणि मी शांत, निवांत, बिनधास्त
तुझा सगळा भार पेलणारी
मी चालणे शिकवलेली,
समर्थ पाउले,
आहेत तुझ्या बाजूला!
मी सुशेगाद!
हा क्षण मुठीत पकडून ठेवता येईल?
वाचने
3308
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
आई ग....किती सुरेख. फारच गोड
In reply to आई ग....किती सुरेख. फारच गोड by पद्मावति
+१
In reply to +१ by एस
+१
In reply to आई ग....किती सुरेख. फारच गोड by पद्मावति
पद्मावतीताई यांच्याच
In reply to आई ग....किती सुरेख. फारच गोड by पद्मावति
सुंदर!
(No subject)
बाबा ते आजोबा स्थित्यंतरावरची
In reply to बाबा ते आजोबा स्थित्यंतरावरची by डॉ सुहास म्हात्रे
+१
मस्त!
सुरेख अगदी सुरेख
फ़ोटो
छान
काही
In reply to काही by नाखु
धन्यवाद !
अवांतर - तुम्ही मिपाचे बरेच
In reply to अवांतर - तुम्ही मिपाचे बरेच by मांत्रिक
हा प्रतिसाद अरूण मनोहर यांना
मस्त लिहीलंय!!