लाघवी
लेखनविषय:
तूझ्या कपाळावर रेंगाळणार्या
अल्लड, अवखळ...
किंचीत खोडसाळ बटा,
थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे,
आणि...
ओठावरचे मिश्किल हसू...!!
अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही,
वारंवार सावरायला लागली आहेस तू...
डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल
तू काही बोलत नाहीस...
ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य...
त्या बंद ओठाआड मात्र,
कधी पोहोचताच येत नाही बघ...
सगळं आर्त ...
त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू !
आणि ते म्हणतात...
व्वा, केवढी लाघवी पोर आहे !
विशाल...
वाचने
3551
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
वाह, मस्तं लिहिलय.
खूपच छान!
ते शीर्षक वाचून आधी जरा गडबडलो होतो. नंतर लक्षात आले. :-)
In reply to खूपच छान! by एस
अगदी अगदी =)) गडबडलोच होतो.
कविता आवडली, पण ही कविता जर भव्य दिव्य व्यक्तींनी टंकली असती तर ....:)
In reply to कविता आवडली, पण ही कविता जर by दमामि
णोप. णो णाय णेवर
पुभाप्र म्हन्ले असते.
एक नंबर!
क्या बात है!!!
सुंदर कविता
सुंदर
कविता खरच सुंदर आहे
मस्तच
सुंदर कविता आहे. मस्तच्च!!!
मस्त... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeensधन्यवाद :)
आवडली कविता !
वाह, मस्तं लिहिलय.