मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चूक नाही

वेल्लाभट · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जरी सुखाची आस असणे चूक नाही हाव आहे ही आता, ही भूक नाही ओरडूनी सांग अथवा बस कुढत तेच आहे सत्य की जे मूक नाही बुद्धीची तलवार तू चालव स्वतःवर जातीची तुझियाकडे बंदूक नाही आमुचे ते वेगळेपण प्रिय आम्हा एक बिक होणे मुळी ठाऊक नाही कारणाविण काही येथे होत नाही अचानक हसणे कुणी हा फ्लूक नाही वाटते ते हो करूनी मोकळा तू धाकधूक नाही आणि रुखरुख नाही शेवटी पैसाच देतो चार घास भावनांनी भागणारी भूक नाही आरशाला दोष देणे चूक आहे आरशावर प्रेम करणे चूक नाही एक माझे वेगळेपण वर्ज्य त्यांना यापरी माझी अपूर्व चूक नाही - अपूर्व ओक ब्लॉग दुवा हा

वाचने 2237 वाचनखूण प्रतिक्रिया 9