कुठे भटकशी वरुणराजा!
लेखनविषय:
आकाश झाले कोरडे,
सुकले त्याचेही नरडे,
कुठे भटकशी वरूणराजा,
पाऊस इथे का न पडे.
धरतीची दशा ही सुन्न,
दाही दिशाही खिन्न,
कुठे भटकशी वरूणराजा,
कधी होशील तु प्रसन्न.
तुझ्या आगमनाची आस,
शेते पडली ही ओस,
कुठे भटकशी वरूणराजा,
घेऊदे मोकळा श्वास.
भिजवुन टाक ही अवनी,
आनंद पसरी या भवनी,
दया करा हो वरूणराजा,
भिक मागतो तुझ्या मी चरणी.
---- हृषीकेश ----
वाचने
1431
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
सुंदर वर्णन
छान लिहिलय. आवडली कवीता.
सुन्दर. विषय उत्तम. ज्योति अलवनि ह्यन्च्याबरोबर सहमत.