मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शतशब्दकथा स्पर्धा: अंतिम निकाल

आदूबाळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मिपाला स्पर्धा आयोजनाचा मोठा इतिहास आहे. कथास्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आदि स्पर्धा मिपाने वेळोवेळी आयोजित केलेल्या, करत असलेल्या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. शतशब्दकथा स्पर्धेलाही अविस्मरणीय प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी आलेल्या तब्बल ८३ शतशब्दकथांमधून सहा कथा अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या. अंतिम फेरीसाठी स्पर्धक लेखकांनी आपल्या शतशब्दकथेचा सीक्वल लिहायचा होता. सहापैकी पाच स्पर्धकांनी सीक्वल लिहिले. वाचकांच्या मतांना आणि परीक्षकांच्या निवडीला समान महत्त्व देऊन अंतिम फेरीचा निकाल जाहीर करत आहोत. तर अंतिम निकाल आहे:

प्रथम क्रमांकः मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)

द्वितीय क्रमांकः चांदणे संदीप (कथा: येक रुपाया)

तृतीय क्रमांकः मधुरा देशपांडे (कथा: निकाल)

विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन! विजेत्या स्पर्धकांना मिपातर्फे पारितोषिकस्वरूपात पुस्तकं आणि मानपत्र देण्यात येईल. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, खेडूत आणि वेल्लाभट यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं. गेला महिनाभर अनेक उत्तमोत्तम शतशब्दकथा वाचायला मिळाल्या. एक वेळ अशी होती की मुख्य बोर्डाच्या पहिल्या पानावर फक्त शतशब्दकथाच दिसत होत्या. आज या निकालाबरोबर ही स्पर्धा संपते आहे, पण गेला महिनाभर मिळालेल्या साहित्य मेजवानीच्या आठवणी बरेच दिवस टिकून राहतील. सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आणि मुख्यतः परीक्षकांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.

वाचन 15561 प्रतिक्रिया 48