मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोकल मराठी भाषा(शब्द-प्रतिशब्द-वाक्यप्रकार)

इनोबा म्हणे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आख्खा 'इंडिया' मधे 'वर्ल्डफेमस' असलेल्या 'मुम्बईय्या हिंदी' प्रमाणेच मराठीतसुद्धा अशा प्रकारचे गमतीशीर शब्द व वाक्यप्रकार आहेत जे ठराविक शहरात वा गावात वापरले जातात.आपण अशाच प्रकारचे शब्द इथं इतर गावकर्‍यांनाही सांगावेत,जेणेकरुन आपले शब्द-वाक्यप्रकार ही आख्ख्या मिपात 'वर्ल्डफेमस' होतील. आमच्या पुण्यात आम्ही वापरत असलेले काही शब्दः गोड आमटी: बोलीभाषेतही लेखी मराठी,जड शब्दांचा वापर करणारे 'महाशय'(शक्यतो 'सदाशिव पेठेतला') अनपरवडेबलः न परवडणारे अनझेपेबलः न झेपणारे मसशाणा: अतिशहाणा नव्वदने कल्टी खाणे: लगेच सटकणे निगाहे बघ: निघायचे बघ केशवः नाकासमोर चालणारी व्यक्ती होमीओपॅथीचा पेशंटः होमोसेक्शूअल चंद्रावर असणे,टांगा पल्टी-घोडे फरारः पिऊन टुन्न झालेला घे मिटवून नायतर दे पेटवूनः नुसताच आवाज करुन भांडणार्‍यांना उद्देशून,'हात' न लावता भांडणार्‍यांसाठी असे आणखी बरेच शब्द आहेत.तुर्तास एवढेच. (बोलीभाषेवर प्रेम करणारा) -इनोबा

वाचन 16357 प्रतिक्रिया 27