आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ...
आषाढीचे निमीत्त साधून एका मराठी विकिपीडिया सदस्याने आज विठ्ठलाच्या बर्याच गाण्यांची यादी मराठी विकिपीडियातील लेखात जोडली, हे पाहून मी ही माहितीचा आढावा घेण्यास सुरवात केली. विठ्ठल हे मुख्यत्वे महाराष्ट्रातील दैवत म्हणजे इंग्रजी विकिपीडियावरील लेखासही बहुसंख्य वाचक मराठीच असावेत असे गृहीत धरता येते.
काल पर्यंत गेल्या महिन्यातील(३० दिवसांची मिळून) इंगजी विकिपीडियावरील विठोबा लेखास हिट्सची संख्या ५००० होती तर मराठी विकिपीडियावरील लेखास मिळालेल्या हिट्सची संख्या १००० च्या आसपास. मराठी विकिपीडियावर लेखाची सुरवात १५ सप्टेंबर २००८ ला झाली तेव्हा पासून ६८ संपादने (अंदाजे २७ लेखकांकडून) झाली त्यातील ९ संपादने मागच्या ३० दिवसात झाली आणि लेखाचा सध्याचा आकार १९,५२८ बाइट्स आणि केवळ १ संदर्भ नोंदवलेला आहे.
तर इंग्रजी विकिपीडियावरील लेखाची सुरवात १९ मार्च २००६ ला झाली आजतागायत इंग्रजी विकिपीडियावर २०९० संपादने झाली (एकुण लेखक २८३; बाईट्स आकार ७१,२०३ आणि संदर्भांची संख्या १५०च्या आसपास) त्यातील २००६ ते २००८ कालावधीत अंदाजे ५०० संपादने झाली असावीत उर्वरीत १५०० संपादने २००८ ते २०१५ कालावधीत झाली अर्थात या १५०० संपादनात ५००च्या आसपास नव्हेंबर २००९ ते फेब्रुवारी २०१० (चार महिन्याच्या कालावधी) मध्ये एक मराठी आणि एक ऑस्ट्रेलीयन व्यक्तीने मिळून केली असावीत आणि त्यांच्या कामाचे फळ म्हणजे तो लेख ३ मार्च २००९ला इंग्रजी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर फिचर आर्टीकल झाला होता.
इंग्रजी विकिपीडियावरील लेखास ऑगस्ट २००६ मध्ये माझाही अत्यल्प (११ आणि ९०० बाइट्सच्या आसपास) हातभार लागला होता. उपरोक्त तौलनीक सांख्यिकीतील लक्षात घेण्यासारखे भाग म्हणजे विठोबा लेखास एकुण मराठी वाचकांच्या हिट्सच्या २%च्या आसपास हिट्स मिळत असाव्यात. दुसरे इंग्रजी विकिपीडियावरील हिट्सची संख्या पाच पट आहे पण लेखकांची संख्या दहापट आहे म्हणजे तेथे फक्त वाचकांचा सहभाग अधिक आहे असे नव्हे तर लेखन सहभागाचे प्रमाण अधिक राहीले आहे. अर्थात २००८ ते २०११ हा इंग्रजी विकिपीडियाचा भरभराटीचा काळ होता. गेल्या तीस दिवसात इंग्रजी विकिपीडियावर एकही संपादन नसावे याचा अर्थ मराठी विकिपीडियावर स्थिती चांगली आहे असे नव्हे. नेहमीचेच एक संपादक आज अचानक पोहोचून त्यांनी ९ संपादने केली म्हणून, फुल नाहीतर फुलाची पाकळीचे समाधान एवढेच.
मराठी विकिपीडियावर लेखाकडे लक्ष गेल्यामुळे मी उपरोक्त आकडेवारी तपासली, मराठी लेखासाठी काही तरी केले पाहीजे म्हणून मराठी गूगल शोध सुरु केला उपक्रम संस्थळावरील बिरुटेसरांची कॉमेंट वर टप्पा मारून रा.चिं. ढेरेंच्या 'श्री विठ्ठल: एक महासमन्वयची बुकगंगा डॉट कॉमवरील सुरवातीची दोन चार पाने चाळली त्यात त्यांनी संस्कृत आणि इतरही स्रोत ग्रंथ आणि दस्तएवज संदर्भांसाठी अभ्यासले जाणे अद्याप बाकी आहे असे नोंदवले आहे म्हणून आंतरजालावर काही संस्कृत शोध 'पुंडरी'क शब्दावर घेतल्यावर खालील श्लोक मिळाले. (मला त्यांचे अर्थ माहित नाहीत पुंडलीकाशी संबंधीत आहेत का तेही माहित नाही. संस्कृत जाणकारांनी खालील श्लोकांचे अनुवाद करून दिले तर मराठी विकिप्रकल्पातून वापरणे सोईचे जाइल. ज्या श्लोकांचा विषयाशी आजिबातच संबंध नाही ते सांगावेत म्हणजे या लेखातून वगळता येतील. ज्या श्लोकात त्रुटी आहेत त्याही सांगाव्यात म्हणजे त्या त्रुटी दूर करता येतील. किंवा खाली न दिलेलेही काही श्लोक आणि अनुवाद उपलब्ध असल्यास त्यांचीही दखल घेता येईल.
ब्रह्माण्डपुराणम्/अध्यायः_३५
या५वल्क्यस्य शिष्यास्ते कण्वो बौधेय एव च ।।
मध्यंदिनस्तु सापत्यो वैधेयश्चाद्धबौद्धकौ ।। ३५.२८ ।।
तापनीयश्च वत्साश्च तथा जाबालकेवलौ ।।
आवटी च तथा पुंड्रो वैणोयः सपराशरः ।। ३५.२९ ।।
इत्येते वाजिनः प्रोक्ता दशपंच च सत्तमाः ।।
शतमेकाधिकं ज्ञेयं यजुषां ये विकल्पकाः ।। ३५.३० ।।
स्कन्दपुराणम्/प्रभासखण्डः_2/प्रभासखण्डः_3
...।। १९ ।। पश्यध्वं मुनयः सर्वे कलिव्याप्तं दिगंतरम् ।। समंतात्परिधावद्भिर्दस्युभिर्बाध्यते प्रजा ।। 7.4.1.२० ।। अधर्मपरमैः पुंभिः सत्यार्जवनिराकृतैः ।। कथं स भगवान्विष्णुः संप्राप्यो मुनिसत्तमाः ।। २१ ।। को वा भवाब्धौ पततस्तारयिष्यति संगतान् ।। न कलौ संभवस्तस्य त्रियुगो मधुसूदनः ।। तं विना पुंडरीकाक्षं कथं स्याम कलौ युगे ।। २२ ।। तेषां चिंतयतामेवं दुःखितानां तपस्विनाम् ।। उवाच वचनं तत्र ऋषिरुद्दालकस्तदा।। २३।। उद्दालक उवाच ।। यावन्न कलिदोषेण लिप्यामो मुनिसत्तमाः ।। अपापा ब्रह्मसदनं गच्छामः
परिसंगताः ।। २४ ।। पृच्छामो लोकधातारं स्थितं विष्णुं कलौ युगे ।। यदि विष्णुः कलौ न स्याद्रुद्रेण ब्रह्मणाऽसह ।। २५ ।। तं विना पुंडरी काक्षं त्यक्ष्यामः स्वकलेवरम् ।। विना भगवता लोके कः स्थास्यति कलौ युगे ।। २६ ।। तच्छ्रुत्वा वचनं तस्य ऋषयः संशितव्रताः ।। साधुसा ध्विति ते चोक्त्वा प्रस्थिता ब्रह्मणोंऽतिकम्।। २७ ।।
।। ४४ ।। वैष्णवानां प्रयच्छंति गोपीचं दनमृत्तिकाम् ।। येषां ललाटे तिलकः गोपीचंदनसंभवम्।। ४५ ।। गोपीचंदनपुंड्रेण द्वादश्यां जागरे कृते ।। विष्णोर्नामसहस्रस्य पाठेन मुक्तिमाप्नु यात् ।। ४६ ।।
ब्रह्माण्डपुराणम्/अध्यायः_११
पीवर्यां वेदशिरसः पुत्रा वशकराः स्मृताः ।।
मार्कंडेयाः समाख्याता ऋषयो वेदपारगाः ।। ११.८ ।।
प्राणस्य पुंडरीकायां द्युतिमानात्मजोऽभवत् ।।
उन्नतश्चद्युतिमतः स्वनवातश्च तावुभौ ।। ११.९ ।।
तयोः पुत्राश्च पौत्राश्च भार्गवाणां परस्परात् ।।
स्वायंभुवेंतरेऽतीता मरीचेः श्रृणुत प्रजाः ।। ११.१० ।।
ब्रह्माण्डपुराणम्/अध्यायः_३५
तापनीयश्च वत्साश्च तथा जाबालकेवलौ ।।
आवटी च तथा पुंड्रो वैणोयः सपराशरः ।। ३५.२९ ।।
अजून एक काम केले ते म्हणजे pand या अक्षर समूहावर सेन्सस इंडीया मधील गावांच्या नावांचा शोध आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील गावांवर घेतला. सेन्सस इंडीयाचे वेबसाईट राईट क्लिक करून कॉपीपेस्ट करण्यास अनुमती देत नाही. पण या स्थलनामांच्या बाबतीत नोंदवण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे आंध्रप्रदेश (की तेलंगाणात ?) अशा गावांची नावे कर्नाटकापेक्षा अधिक असावीत. उदाहरणार्थ पण्डलगुण्टा, पण्ड(ल/र)पाडू, पण्डलपाका, पण्डलपर्रू, पण्डीगुण्टा, पण्डीकुंटा, पण्डीकोना, पण्डीलापल्ले,पण्डीपम्पुला, पण्डीराजपल्ले, पण्डीरीमामीदी, पण्डलापुरम, पण्डलुरु, पण्डरंगी, पण्ड्रापोट्टीपल्लम, पाण्ड्रापोलु, पांडरवडा, पण्डुर, अशा प्रकारची नावे आहेत बरीच गाव नावे पाण्डे आणि पाण्डव पासूनही असावीत. पांडुरंगपुरम नावाची दोन गावे खम्मम जिल्ह्यात दिसतात.
कर्नाटकात पाण्डर(हल्ली|वल्ली|गेरा) पण्डीवरीपल्ली, पण्डोगेरे, मग पण्डीत नावा पासून बरीच गावे दिसतात, उडुपी जिल्ह्यात पाण्डेश्वरा तर गदग जिल्ह्यात पाण्डुरंगपूर मिळते.
महाराष्ट्रः पाण्डेश्वर नावाचे गाव महाराष्ट्रातही पुरंदर तालुक्यात दिसते, पाण्डेरी नावाची तीन गावे कोकणात दिसतात, पांढर पासून बरीच गावे आहेत जसे की पांढरकवडा (विदर्भ) पण सोबतीला पांढरदेव पांढरदेवी पांढर(पाणी|वाणी|ढकणी) नावाची गावेही आहेत. पंढरी नावाची दिड डझन तरी गावे आहेत पण पंढरी नावाच्या गावांमध्ये विदर्भ आघाडीवर दिसतो. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरपाऊनी, तर गडचिरोली जिल्ह्यात पंढरी भाटल नावाचे गाव दिसते. पंढरपूर नावाची अर्धा डझन गावे वेगवेगळ्या प्रदेशात विखुरलेली दिसतात पण विठ्ठल देवता पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरात आणि महाराष्ट्रात पुजली जात असली आणि आपण कर्नाटकाचे नाव घेत असलो तरी नामसाधर्म्य असलेल्या ग्रामनामांची संख्या विदर्भ आणि तेलंगाणात अधिक दिसते आहे. मला वाटते अभ्यासकांसाठी हि दखल घेण्या जोगी गोष्ट ठरावी.
अवांतरः एक रोचक योगायोग म्हणजे २०व्या शतकाच्या पुर्वार्धात व्हिएटनाम मध्ये नव्याने बसवलेल्या एका शहरास Panduranga म्हटले जाते ते त्यांच्या भाषेत कोणत्या अर्थाने म्हणतात कुणास ठाऊक ?
या लेखाचे लेखन विकिपीडियासाठी केलेले असल्यामुळे आपले प्रतिसाद नित्याप्रमाणे प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.
प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिक नसलेल्या अवांतरांना टाळण्यासाठी आभार.
वाचने
7045
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
अरे देवा वाईट परिस्थिती
In reply to अरे देवा वाईट परिस्थिती by जडभरत
स्थिती
अवांतर...
In reply to अवांतर... by द-बाहुबली
सो यू वर राईट बॉमकेसजी :)
पुंड्र, पुंडरीक
In reply to पुंड्र, पुंडरीक by पैसा
पुण्डरीक म्हणजे कमळ असलं तर
अवांतरः एक रोचक योगायोग
अवांतरः एक रोचक योगायोग म्हणजे २०व्या शतकाच्या पुर्वार्धात व्हिएटनाम मध्ये नव्याने बसवलेल्या एका शहरास Panduranga म्हटले जाते ते त्यांच्या भाषेत कोणत्या अर्थाने म्हणतात कुणास ठाऊक ?पांडुरंग/गा (Panduranga) किंवा स्थनिक व्हिएत भाषेत फान रांग (Phan Rang) हे शहर प्राचिन मध्य व दक्षिण व्हिएतनामधील चंपा (२ रे ते १५ वे शतक) नावाच्या सधन शैव हिंदू राज्याची (नगर चंपा उर्फ चंपा राज्य) शेवटची राजधानी होती. चंपा राज्याची राजभाषा संस्कृत होती. राजे-रजवाडे-सम्राटांची (भद्रवर्मन, जय हरिवर्मन, इंद्रवर्मन, इ) आणि शहरांची (इंद्रपुरा,१० वे शतक; विजय/या, १२ वे शतक; अमरावती, इ.) नावे संस्कृतप्रचूर होती. मध्य व दक्षिण व्हिएतनाममध्ये अनेक ठिकाणी हिंदू संस्कृतीचे अवशेष आहेत. व्हिएतनाम युद्धात त्यांचे बरेच निकसान झाले आहे. आताची राजवट त्यांना पर्यटनासाठी विकसित करत आहे. या साम्राज्याच्या शेवटच्या अनावस्थेच्या कालात तेथे बौद्ध धर्माचा प्रसार झाला. नंतर त्यातल्या काही भागांत मुस्लीम धर्मही स्विकारला गेला. आधुनिक फान रांग शहर जरी २० व्या शतकात पुनर्वासित केले गेले असले तरी त्याच जागेवरच्या पांडुरंग/गा शहराचा प्रथम उल्लेख पो नगर येथील इ स ८१७ सालच्या शिलालेखात सापडतो.पुण्डरीकाक्ष
In reply to पुण्डरीकाक्ष by राही
माहितीपूर्ण आणि रोचक प्रतिसाद
माता-पित्यांची सेवा विषयक तौलनिक कथासूत्रे
प्रश्न खूप आहेत