मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चित्रकृती

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
{खुला"सा! :- (माझी १४ वर्षानंतर सुरु झालेली ही चित्र[कला] अजुन अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहे. फक्त एक आयड्या लोकांपर्यंत पोहोचवावी..एव्हढ्याच हेतूने हे सादर करत आहे.. :) त्यामुळे चित्राकडे दुर्लक्ष करावे. __/\__ ) } काय मि.पा.करांनो??? शिर्षक वाचून एकंदर अंदाज आला नसेल ना? किंवा आलाच असेल,तर तो खालिल चित्र-कृती पाहिल्यावर चुकेल! ( कारण ही कोणती विशिष्ट चित्रकृती नसून्,फक्त तेलताटावर चित्र काढण्याची-कृती आहे! ;) ) काय आहे,की चित्रकला हा माझा अवडता विषय.पण प्रसंगचित्र आणि व्यंगचित्र याच्या बाहेर मी फारसा कधिही गेलेलो नाही. (शालेय स्पर्धांमधे वरील दोन्ही विषयात दोनदा ३रा, आणि तिनदा उत्ते-जनार्थ ;) क्रमांक मिळवला आहे मी! ) आणि, ९२ ला दहावी नंतर माझा वेदपाठशाळा..नावाच्या अ'भयारण्यात प्रवेश झाल्यावर पुढे ६ वर्ष ,माझा या सगळ्या (माझ्या ;) ) मूळ जगाशी संबंध तुटलेलाच होता. त्यामुळे ही कला तशी कोपर्‍यातच पडून होती. पुढेही हे भटजीगिरीचे काम करायल्या लागल्या नंतर वास्तुशांतीचे वेळी दरवाज्यावर कुंकवानी शुभ्/लाभ/स्वस्तिक्/ओंकार या पलिकडे उडी मारायला मिळालेली नव्हती! (हां...पण दरवाज्यावरचा ओंकारातला गंपतीबाप्पा मात्र बेश्ट काढायचो हां मी! ) अश्यातच पहिली ३/४ शिकाऊ वर्ष गेली,आणि मग ही सगळी कला फुलांच्या रांगोळ्यांमधून डोकं वर काढायला लागली. यामुळे मात्र माझा एक फायदा झाला .तो असा,की ..माझ्याकडे,बरेचसे कलाआसक्त यजमान वाढले..(किंवा आले त्यांच्यातली आसक्त-कला वाढली! ;) ) त्यामुळे, अश्या अनेक प्रकारच्या गोष्टी ..या लोकांकडे पहायला मिळू लागल्या. अजुनंही मिळत आहेत. एकदा एका गुज्जु क्लायंट कडे एका महिलेनी आरतीचं ताट सजवून आणलं. मी पहिल्यांदा ते पहातच राहिलो. कारण आतली २ कलात्मक निरांजनं मला नविन नव्हती पण त्याखाली वेलव्हेट्चा नाजुक हात लावावा,असं काहितरी दिसत होतं. मी आरती झाल्यावर त्यात सहज हात लावला ,तर बोट चटकन पुढे घसरलं..आणि ते वेलव्हेट् पुसलं गेलं . मला काहि क्षण काहि कळलं नाही. नंतर मात्र माझा प्रश्नार्थक चेहेरा पाहून ,सदर महिलेनी ते ताट बाजुला ठेवलं आणि मला... महिला:- ओ पंडित जी.. ये दोखो मी:- क्या जी? महिला:- ये थाली को ऐसे तेल लगाके उसपर ये कुंकूम ऐसा डाल के... ( वगैरे वगैरे) असं करून मला हे पहिलं काम शिकवलं .. मी ही लगेच त्यावर फुलाच्या डेखानी भला मोठा ओंकार काढून त्यांना गुरुदक्षिणा दिली.. आणि तेंव्हापासून मला मूड आला आणि हतात वेळ असला तर आमच्या कामात मी असली काहितरी चित्र (वि)चित्र पद्धतीनी जमतील तशी काढून माझी ही,मागे पडलेली चित्रकलेची हौस भागवून घेतो... (हुश्श्श्श्श्श्श्श्श्!!!!!!!!!!! झाली एकदाची ती प्रस्ताव'ना! ;) ) आता मूळ गोष्टीकडे वळू या... तर आपण ही छोटीशी चित्रकृती टप्प्या ट्प्प्यानी पाहू... १) हे साहित्य... एक ताट्,तेल,फुल,काडी,हळद/कुंकू (किंवा आपण तसे इतर रंगंही घेऊ शकतो.फक्त ते तेलावर-बसणारे हवे.तेलात--जाऊन बसणारे नको! ;)) https://lh4.googleusercontent.com/-YG9DT9-KLQc/VKuxrAmh1II/AAAAAAAAGqM/GRGgq5H3pgI/w749-h581-no/my%2Bfone%2B2%2B599.jpg २) ताटात २ थेंब गोडेतेल टाकून/फुलानी नीट पसरविणे. https://lh4.googleusercontent.com/OYpbQ2EGoIyKcuFUkISlyvd5DDJ0He4PNWuJNeEWoj8=s148-p-nohttps://lh5.googleusercontent.com/l0EQ5YR8AJKHaCOlLzIHU1khBtmNSpF8afdgdHPaMJ8=s148-p-no ३) आता ,ताटाच्या साइडपट्टीवर हळद पेरुन घ्यायची.पण जास्त मधे अजिबात पडू द्यायची नाही.कारण मग परत ती हळद पुसा..तिथे तेलानी पॅचअप करा..अश्या नसत्या कटकटी होऊन बसतात. https://lh4.googleusercontent.com/-oEjwFy5d2kc/VKuyq3XDb6I/AAAAAAAAGqk/xSPbx6WgTZk/w694-h581-no/my%2Bfone%2B2%2B602.jpg ४)मग कणकेला चाळण मारल्यासारखं,ताट हलकं हलकं हलवायचं. आणि नंतर एकदम पलटी मारून खाली(घेतलेल्या) पेपरावर हलकेच अपटायचं.म्हणजे,एक्स्ट्रो लागलेली हळद -पडते. https://lh4.googleusercontent.com/-jcPqjluWUbo/VKuyw7-7i-I/AAAAAAAAGqs/fFLTiSQFX-0/w621-h581-no/my%2Bfone%2B2%2B603.jpg https://lh3.googleusercontent.com/-0w55B7OC6ck/VKuy6uaHA5I/AAAAAAAAGq0/kD_qjxODltA/w800-h450-no/my%2Bfone%2B2%2B604.jpg ५) आता..हळद-कृती प्रमाणेच ..मधल्या मोकळ्या ग्राऊंडवर कुंकू-लावणी करायची. https://lh3.googleusercontent.com/n5VN-HNtkA7HRiQTyYDpYPzplxseE67O5NEo1uo9Pxs=w769-h581-no https://lh4.googleusercontent.com/hQw4co3M-xI-Wxwp7QyXDWVV4NOm0Ngl7BMgEz6tpY8=w800-h558-no https://lh6.googleusercontent.com/TsKRqnoWUWESvg7ehNhFUNBYqbAkSR3S5UAvKs2-tio=w714-h581-no ६) मग हळद/कुंकवाच्या मधून बोट मारून... https://lh6.googleusercontent.com/ut6vUP0eRiXAb8-bPzLEJwD3D_S6MBEGf35rU5XJy-4=s148-p-no घेतलं.. की ही अशी तयार होते..ती आपली चित्रखरडपाटी! https://lh4.googleusercontent.com/3jvVh37_3Rt1uTTMLXpCbnfBWsqePOMnbnlMbFscHRk=w723-h581-no ७) आणि मग काय.. ? जसा आपला हात तसा सापडेल जगन्नाथ.. करायची मग खेळायला सुरवात https://lh4.googleusercontent.com/-sD1u4aUuJ8E/VKu1UTIb_ZI/AAAAAAAAGrw/-3vwzbucNno/w800-h450-no/my%2Bfone%2B2%2B611.jpg https://lh3.googleusercontent.com/-es86nWhC8UY/VKu1MwkFxjI/AAAAAAAAGro/TX1NP_UBCPI/w326-h580-no/my%2Bfone%2B2%2B610.jpg https://lh4.googleusercontent.com/-52t7U1fFpTI/VKu1ZleILUI/AAAAAAAAGr4/I4PYZ3nLsBE/w528-h581-no/my%2Bfone%2B2%2B612.jpg ८) "आता ह्याचं करायचं काय हो मग???" सांगतो ना..! एकतर त्यात निरांजनं ठेऊन आरतीसाठी वापरा,अथवा अगदी ओवाळणीचं ताट म्हणूनही वापरा... किंवा मग आंम्ही करतो तसलं काहि तरी करा. "काय करता हो तुम्ही?" :- पहा खाली... (लघुरुद्र असल्यामुळे शंकराच्या फोटो ऐवजी पुजे मागे ठेवणे ) https://lh6.googleusercontent.com/-bDLDJKcl5oQ/VKu1q7WMKQI/AAAAAAAAGsI/wo3exIiqBpQ/w326-h580-no/my%2Bfone%2B2%2B614.jpg ९)आरती करताना प्रसन्नतेत भर पडायला हे ही एक..उपयोगी! https://lh4.googleusercontent.com/-igcxxlBeSDk/VKu1hIEpVpI/AAAAAAAAGsA/n6_70b9mRP0/w326-h580-no/my%2Bfone%2B2%2B615.jpg १०) निसर्गही का नाही बरं प्रसन्नतेत सामिल होणार मग? :) https://lh3.googleusercontent.com/-4txUlsn9gEQ/VKu12mjqJ6I/AAAAAAAAGsQ/CrhgZnvysmg/w326-h580-no/my%2Bfone%2B2%2B613.jpg 1 no ००००००००००००००००००००००००००००========================०००००००००००००००००००००००००००००० म्हणा बरं मग आता....

हरं हरं महादेव!!!!!!!!!!!!!!!!

https://lh5.googleusercontent.com/-uDu6F8Bc4jc/VKvHq9jc3nI/AAAAAAAAGsg/6r-60jD9oJY/w800-h450-no/my%2Bfone%2B2%2B592.jpg

वाचन 19060 प्रतिक्रिया 67