मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फस्ट साईट लव....

चेतन677 · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
राहुल एकदा कोथरुड डेपोवरुन चिंचवडला येत होता...पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती.थोड्याच वेळात डेक्कन आलं.तिथुन एक तरुणी बस मध्ये बसली.तिने बाकीच्या मुलींप्रमाणे पुर्ण चेहरा स्कार्प मध्ये लपवला होता.बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती.थोड्याच वेळात तिने स्कार्प काढला.ती अतिशय देखणी मुलगी होती.का कोणास ठाऊक राहुलच्या ह्रदय अजुन जलद गतीने धडधडायला लागलं.त्याच्या कंटाळवाण्या चेहर्‍यावर हास्य फुलले.क्षणभरात ती मुलगी राहुलला हवीहवीशी वाटत होती. मित्रांनो बर्‍याच जणांच्या आयुष्यात अस काहीतरी घडत असतं.या विषयावर काही चित्रपटही बनवले गेलेत.हे नक्की प्रेम असतं की आकर्षण?अशामध्ये किती लव स्टोरीज सक्सेस होतात आणि किती फेल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं.??

वाचने 15857 वाचनखूण प्रतिक्रिया 41

अभ्या.. 18/08/2015 - 19:04
+१ . . आमच्या मिक्याच्या शब्दात " यु आर लेट, यू फूल" ;)

जिन्क्स 18/08/2015 - 19:07
फस्ट साईट लव.... मला वाटल लेखक गवंडी आहे आणि तो काम करत असलेल्या पहिल्या साईटच्या प्रेमात पडला.

अस्वस्थामा 18/08/2015 - 19:10
चेहरा स्कार्फच्या आड असताना प्रेमात पडला असतात तर ते तुमचे शाश्वत चिरंतन प्रेम. स्कार्फ काढल्यावर तोंड पाहून पयले तो आकर्षणच होयेगा ना भौ.. (प्रेमाच्या बाबतीत डोपमिन रोल बाबत कुठलीही शंका नसलेला)

In reply to by अस्वस्थामा

भीमराव 19/08/2015 - 11:44
म्हण्जे? नुसतीच फिगर बघुन होतं ते प्रेम शाश्वत प्रेम का? बराय बराय, आम्ही ऊगाच त्याला आयटॉनिक समजत होतो

संदीप डांगे 18/08/2015 - 19:22
अशा तर्हेने आजवर १,२४,३४५ वेळा प्रेमात पडलोय. कदी कदी तर एका सायटीत चार चार वेळा पडलोय चार जणींच्या. तेबी बिनास्कार्पवाल्या पोरींच्या. त्येनी आमची 'साईट' पवून पटपट स्कार्प चडवले हे येगळं. काय कथा सांगायच्या तुमाला आणि तुमी बी आयकायच्या... मिपाचं सर्वर परत डाऊन व्हइल आणि पोर्न कोनतं फायला पायजेल त्याची चर्चा ऐन्वेळंला बंद पडंल...

In reply to by संदीप डांगे

बॅटमॅन 19/08/2015 - 17:44
कदी कदी तर एका सायटीत चार चार वेळा पडलोय चार जणींच्या
"सायटीत" चा नेहमीचा अर्थ घेतल्यामुळे अर्थ समजलासे वाटले पण नंतर कळालं की इशय वेगळाच आहे. =))

In reply to by बॅटमॅन

संदीप डांगे 19/08/2015 - 17:57
;-) तुमची ती साईट वेगळीच है दादा...! अहो, लोक एका 'फायटीत' चार चार जणांना लोळवतात, आम्ही एका सायटीत चार चार जणींच्या प्रेमात ळोळतो. खी खी.

In reply to by प्यारे१

चेतन677 18/08/2015 - 20:25
सोप्या भाषेत म्हणजे मुली ज्याने आपला पुर्ण चेहरा आणि डोके झाकतात फक्त डोळे ऊघडे ठेवतात तो म्हणजे स्कार्प

In reply to by द-बाहुबली

नाव आडनाव 20/08/2015 - 22:14
हां ... हे मत्वाचं! "घालमेल" शबूद याया पायजे ष्टूरीत, तर कुढं गोष्ट पुढं सर्कती... र्‍हावल्याला यकदा इचारून यावा लेकक शेट...

रातराणी 18/08/2015 - 20:04
पीएमटी मध्ये तशी जास्त गर्दी नव्हती .बसमधील गर्दी वाढण्याऐवजी कमी होत होती ही वाक्य वाचून मीच काय घोड मारलं होत पी एम टी च असं वाटल. :(

जडभरत 18/08/2015 - 21:26
प्रेम = आकर्षण आकर्षण = प्रेम पोपशास्त्री यांच्या सिद्धांताचा अनुयायी!!!

मी-सौरभ 19/08/2015 - 18:49
हे लव बिव सगळ झूट असतं. आपल्या मुठीत जोर असला की सगळं व्यवस्थित होतं
आमच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये मुली फारच कमी होत्या याचा परिणाम म्हणून कि काय मुले बाहेरील गार्डन मध्ये गवत कापायला येणाऱ्या मुलीना बघून लांबून खिडकीतून उगीचच शिट्या मारीत असत य़ाला तुम्ही कसले आकर्षण म्हणणार. त्यात उन्हाळ्यात सर्व सरदारजी मुले सुटीच्या दिवशी त्याचा डोक्यावरून नाहण्याचा कार्यक्रम असायचा.अंघोळ झाली कि ती पाठीवर केस सोडून सुकवण्यासाठी बाहेरच्या गार्डन मध्ये ओळीने बसत होते . बघणाऱ्या व्यक्तीला असे वाटायचे कि या सर्व गवत कापणाऱ्या मुलीच ओळीने बसल्या आहेत . मग शिट्यांचा सिलसिला जोरात चालू होत असे . या वर मात्र एक शेर आठवणीने म्हणत होतो "दूर से देखा दिल बेकरार था,दूर से देखा दिल बेकरार था, नजदीक से देखा साला सरदार था