सांगून जा ...
लेखनविषय:
सखी सांगूनी जा
काय तुझ्या मनी
हसू लाजरे का
फुले ओठांवरी |
खळी नाजूक गं
खुले गोर्या गाली
बट लाडीक ही
कशी रुळे भाळी |
क्षणी तुज गाली
उमटे का लाली
तुझी पापणी का
झुकली ही खाली |
धरेवर नाही
तुझी पाउले ही
नजरेस नाही |
विश्वाचे भान ही |
अशी चालता तु
वळूनी पाहसी
उगा थांबूनी का
पुढेच तु जासी |
रती होउनी तु
विहरसी वनी
सखी सांगूनी जा
काय तुझ्या मनी |
वाचने
2616
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
हा प्रतिसाद फक्त गंमत म्हणुन घ्यावा :)
In reply to हा प्रतिसाद फक्त गंमत म्हणुन घ्यावा :) by धमाल मुलगा
अरे ..
In reply to अरे .. by मनीषा
ह्म्म
छान कविता
आवडली कविता..
In reply to आवडली कविता.. by प्राजु
नक्की...
In reply to आवडली कविता.. by प्राजु
१+
चांगली कविता
खळी नाजूक
कविता
सुंदर