बहर
लेखनविषय:
काव्यरस
पाऊस
गारवा
संध्याकाळ
निवांतपणा
गुलजार-बिलजार
सगळं आहे
.
.
.
.
कागद मात्र....कधीचा कोरा
काही शब्द
एखाद् दुसरी ओळ फार तर फार....बास्स
तडफड
थोडीशी भिती
जमणार आहे की नाही?
पेन टेकवायचं कागदाला नुसतंच...अनेकवेळा
छ्या...
तुला नाही तर त्या पारिजातकाला,
विचारलंच पाहीजे एकदा
कसं जमतं रोज बहरून येणं?
वाचने
5122
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
क ड क
अवांतरः
कागद मात्र....कधीचा कोराअगदी खरयं..
तुला नाही तर त्या पारिजातकाला, विचारलंच पाहीजे एकदा कसं जमतं रोज बहरून येणं?....सुरेख.
हं मस्तय!!!
सुंदर!
जमलय अगदि
खासच !
'रायटर्स ब्लॉक' छान रंगवलाय.
आवडली.
मनातलं योग्य शब्दात लिहिणं ही फार मोठी कला आहे
छान.. आवडले! :)
मस्त आहे!
+११११११११११११११११११११११११११
आह! खास....
तिचं किंवा पारिजातकाचं उत्तर असं असू नये कधीच-
वाटतो/ते ना तुला बहरल्याप्रमाणे?
वा-ट-तो/ते ना तुला बहरल्याप्रमाणे...
जमते अताशा मलाही तोल सांभाळणे,
का दाखवावे जगा घाव माझ्या उरीचे
उगा देखले फुंकारणे अन मागून हासणे
In reply to आह! खास.... by प्यारे१
मस्त प्यारेभाउ
प्रगती आहे ;)
In reply to आह! खास.... by प्यारे१
In reply to आह! खास.... by प्यारे१
जमलंय...
In reply to हाहा by चाणक्य
@ चाणक्य
@ मिकासेठ,
धन्स.
In reply to हाहा by चाणक्य
@ चाणक्य
@ मिकासेठ,
धन्स.
वा ! छान कविता.
वा!
क ड क