टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवा - अगदी सोप्या पद्तीने (फोटोसहीत)
टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवा - अगदी सोप्या पद्तीने (फोटोसहीत)
- १) आपल्या घरातील रिकाम्या झालेल्या ५ किलोच्या तेलाच्या डब्या पासून "केरकचरा सुपली (dust Pan" बनवता येईल. ती कशी बनवायची ते तुम्हाला खालील फोटोवरून कळेल.
- २) आपल्या गच्ची मधील किवा जवळच्या बागेतील झाडाच्या कुंड्या फुटल्या असतील तर त्या फेकून न देता त्याचा कल्पना शक्ती चा वापर करून आपल्या बागेची किवा गच्ची ची शोभा वाढवू शकतो. अशीच एक कल्पना खालील चित्रात दाखवली आहे.
- ३) उन्हाळा आला कि आपलं शीतकपाट पूर्ण पणे शीतपेयाच्या आणि पाण्याच्या बाटल्याणी भरून जातो. पण उन्हाळा संपला कि रिकाम्या झालेल्या ह्या प्लास्टिक च्या बाटल्यानचे काय? त्याचा पण उपयोग घर-शेती करण्यासाठी होऊ शकतो. त्या फेकून न देता मधोमध कापून त्या मध्ये माती भरून कोथांबीर, मेथी च्या बिया टाकून त्या वाढवू शकता. ह्याला जागा पण कमी लागते. अधिक स्पष्टीकरणा साठी खालील चित्र पहा.
- ४) तुटलेल्या छत्री चा उपयोग पण खालील प्रमाणे वस्त्रे लटकवण्या साठी होऊ शकतो.
- ५) रिकाम्या झालेल्या शाम्पूच्या बाटल्याचा उपयोग भ्रमणध्वनी अडकवण्यासाठी होऊ शकतो. त्यासाठी फक्त थोडेसे कापून आकार द्यावा लागेल. त्याला तुम्ही मनाप्रमाणे सजवू पण शकता. खालील चित्र पहा.
- ६) तुमच्या कडे खाली झालेल्या शाम्पूच्या बाटल्या नसेल तर त्यासाठी फाटलेल्या जीन्सच्या खिशाचा उपयोग करू शकता. खालील चित्र पहा.
- ७) तुम्हाला जर ५ रुपयात बायकोला किवा प्रेयसीला उपहार देऊन खुष करायचे असेल. तर खालील प्रमाणे अंड्याचा बनवलेला बदाम देऊ शकता. एक गंमत म्हणून घरी बनवायला काय हरकत आहे.
- ८) गेलेल्या विजेच्या बल्ब चा असापण चांगला उपयोग होऊ शकतो.
- ९) घरी आम्लेट करून तुम्ही खाल्लेच असेल. मग ते फुल फ्राय किवा हाफ फ्राय असेल पण कधीतरी गोल फ्राय करून पण खात जावा. त्यासाठी फक्त एक अंडे आणि मोठा कांदा लागेल. पूर्ण कांदा पण नाही फक्त कांद्याची निघणारी गोल चकती लागेल. खालील चित्र पहा.
- वरील सर्व कल्पना किवा कला आंतरजालावरून गोळा केल्या आहेत. हा धागा काढण्यामागे कारण कि अश्याच अनेक कल्पना तुमच्या मनात किवा तुम्ही कुठे तरी पाहिलेल्या असतील तर त्या इतर जणांना पण कळल्या पाहिजेत. म्हणून तुमच्याकडे पण अश्या काही कल्पना असतील तर या धाग्याच्या प्रतिक्रियेच्या रुपाने येऊ द्या. मग त्या लेखणीच्या , फोटोच्या रूपाने असू द्या किवा चलचित्र च्या रूपाने असू द्या त्याचा सर्वाना त्याचा लाभ होऊ द्या. धन्यवाद !!
वाचने
118620
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
+१
छत्री तर लै भारी!!!
In reply to +१ छत्री तर लै भारी!!! by जडभरत
अईला मी पईला?
जडभरत तुम्हि पहिलेच. :)
छान माहितीपूर्ण धागा.
तुमच्याकडे पण अश्या काही कल्पना किव महिति असतील तर येथे देउ शकता. धन्यवाद!!
सगळ्या कल्पना आवडल्या. करून बघण्यासारख्या आहेत खरेच!
मी सुद्धा आताच एक टाकाऊतून टिकावू वस्तु बनवत आहे. पूर्ण झाली की धागा टाकेन फोटोंसकट.
कुंडी अतिशय सुंदर झाली आहे.
आता घरातली धडधाकट फोडावी म्हणते.
In reply to कुंडी अतिशय सुंदर झाली आहे. by स्पंदना
आजच पाच लिटर तेलाचा डबा, १ शांपूची मोठी बाटली, एक स्वस्ताताली जीन्स घेऊन येणार आहे .
In reply to आजच पाच लिटर तेलाचा डबा, १ by उगा काहितरीच
तुमचे तर सगळे उलटे आहे राव !!
In reply to शाब्बास !! by राजकुमार१२३४५६
+१.
In reply to +१. by एस
हा प्रतिसाद राजकुमार ह्यांच्या मार्मिक ह्यांच्या फोटोंच्या खालील प्रतिसादाला होता. चुकून इथे पडला.
छान माहितीपूर्ण धागा. आजच तेलाचा डबा रिकामा झाला. केराच्या सुपलीची कल्पना आवडली. आजच करुन बघनार.
क्लास ! जबरदस्त आवडलं !
काही माहिती होत्या तरीही तुम्ही स्वतळ्त्र धागा काढलात हे मस्त केलंत. खूप छान ! यात अजून भर पडावी अशी आशा.
मोबाईल लटकवायची कल्पना जास्त आवडली गेल्या आहे.
मस्तच , इनोवेटीव्ज आयडीयाज आहेत सगळ्या.
फोटो दिसत नायत. घरी गेल्यावर बघतो.
कापलेल्या डब्याचा वापर आगोदर तयार केलेल्या मिरचीची रोपे ठेवण्यासाठी केला. In reply to करून बघितलं by मार्मिक गोडसे
तुम्ही तर फोटो पेक्षा झक्कास केले आहे
In reply to झक्कास !! by राजकुमार१२३४५६
+१.
(प्रतिसादाची जागा सुधारली आहे).
In reply to झक्कास !! by राजकुमार१२३४५६
धन्यवाद.
In reply to करून बघितलं by मार्मिक गोडसे
लेख आवडला. सुपले छानच जमलेय मार्मिक.
जीन्सच्या खिशाचे मोबाईल होल्डर मी बनवले होते, फोटोत कितीही चांगले वाटले तरी प्रत्यक्षात तितके चांगले वाटत नाही. धुळ बसुन खराब होते, धुवायला लागते. मोबाईलच्या रिंगचा आवाज दाबला जातो बर्याचदा रूमच्या बाहेर असल्यास रिंग ऐकायला येत नाही. नुसत्या व्हायब्रेटर मोडवर असेल तर कळतच नाही, टेबलवर निदान घरघर तरी ऐकायला येते. शेवटी टाकुन दिले.
जीन्सचा खिसा आवडल्या गेल्या आहे (मिपाचं व्याकरण असच आहे ना?)
In reply to जीन्सचा खिसा आवडल्या गेल्या by टवाळ कार्टा
असं का आहे व्याकरण? मला पण प्रश्न पडतो अनेक वेला! व्यनि करा की टकाराजे!!!
In reply to असं का आहे व्याकरण? मला पण by जडभरत
कोणाला? कशाला? गरज असेल तर मला व्यनी करतील...त्यासाठी मी माझ्या इंटरनेटच्या बायटी का वाया घालवू?

In reply to फुटलेल्या टेनिस चेंडू चा असा ही उपयोग होऊ शकतो. by राजकुमार१२३४५६
णविण!

In reply to णविण! by अत्रुप्त आत्मा
तुम्ही दोघेही अवलिया! नमस्कार!
अर्रर्र !! कालच एक शांपूचा डबा फेकून दीला..
या आणि अशा बर्याच ट्रिक्स 'जिनियस लाईफ हॅक्स' आणि Distractify या दुव्यांवर उपलब्ध आहेत. टेनिस बॉल्स पासून करता येणार्या कित्येक गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. पिंटरेस्ट वरही अशा अनेक गंमतीदार कल्पना मिळतात.
मला आवडलेल्या काही करामती:
शर्टची घडी अशी सहज घाला:
आईस क्रीम सँडविच
कॅसेट कव्हर पासून फोन स्टँड
मायक्रोवेव्ह मध्ये दोन मोठे बाउल्स असे ठेवा:
आंब्याच्या फोडींची सालं अशी काढा:
पाण्यात बुडवलेला स्पंज प्लास्टिक पिशवीत ठेवून तयार करा न वितळणारा आईसपॅक:
वस्तू अडकवण्यासाठी भिंतीत अचूक ठिकाणी छिद्रे पाडण्यासाठी त्या वस्तूच्या मागील भागाची फोटोकॉपी करून घ्या आणि तो कागद 'गाईड' म्हणून वापरा:
आईस क्रीम सँडविच
कॅसेट कव्हर पासून फोन स्टँड
मायक्रोवेव्ह मध्ये दोन मोठे बाउल्स असे ठेवा:
आंब्याच्या फोडींची सालं अशी काढा:
पाण्यात बुडवलेला स्पंज प्लास्टिक पिशवीत ठेवून तयार करा न वितळणारा आईसपॅक:
वस्तू अडकवण्यासाठी भिंतीत अचूक ठिकाणी छिद्रे पाडण्यासाठी त्या वस्तूच्या मागील भागाची फोटोकॉपी करून घ्या आणि तो कागद 'गाईड' म्हणून वापरा:
In reply to आणखी काही by बहुगुणी
खुप उपयोगी :)
In reply to आणखी काही by बहुगुणी
आंब्याचा गर वेगळा करण्याची कल्पना आवडली!
वाखुसा.
आयडीयेच्या कल्पना मस्त आहेत.
वा खा सा आ
छानच.
जीन्सची आयड्या येकदम जब्बर.
मस्तच
राजकुमार यांचे फोटो दिसत नाहीत.
दिसले दिसले
+१ छत्री तर लै भारी!!!