बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स
थोडक्यात, ओमेगा ३ सप्लिमेंट्स व मिथायलेशनची गरज आहे. म्हणजे Methylcobalamin (बी१२ चा एक प्रकर्र) याची गरज आहे.
दुसर्या रिपोर्टमध्ये आहेत खालील गोष्टी :
व्हिटॅमिन सी, व्हीटॅमिन डी याचबरोबर डॉक्टरांनी एझाईम्स, काही इतर सप्लिमेंट्स सांगितले आहेत. तसेच मुलाला mitochondrial dysfunction नावाचाही प्रकार असल्याचे सांगितले त्यामुळे त्यावरही एक औषध सांगितले आहे.
तिसर्या रिपोर्टमध्ये आहे IgG Food Antibody Assessment & IgG Spice Profile, IgE Inhalants profile, IgE Mold profile, Celiac & Gluten Sensitivity..
-> तुम्हाला फुड अॅलर्जीज माहीतीच असतील.उदा: सतत पाहण्यात, ऐकण्यात आलेली पीनट्स वा इतर नट अॅलर्जी. मग त्यात श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो तर कधी स्वेलिंग, कधी हाईव्ह्ज(रॅशेस) होते. हा जो प्रकार आहे तो IgE (or immunoglobulin E) यामध्ये मोडतो. हा जो दुसरा IgG (Immunoglobulin G)हा जरा सटल प्रकार आहे, त्यामध्ये तुम्ही अमुक एक पदार्थ घेतल्यावर तुम्हाला अॅलर्जिक रिअॅक्शन अॅज सच रॅशेस वगैरे होणार नाही, परंतू काही ना काहीतरी बिहेविअर चेंजेस, हायपर अॅक्टीव्हिटी, ब्लोटींग, डोकेदुखी असे सिम्प्टम्स दिसू शकतात. थोडक्यात फुड सेन्सिटीव्हिटी. अॅलर्जीमध्ये फुड बरोबरच मोल्ड्स, पोलन याची अॅलर्जी तुम्ही ऐकली असेल. तो झाला IgE Inhalants profile, IgE Mold profile. पदार्थांमध्येच मसाले देखील आले. तेई टेस्ट करण्यात आले - IgG Spice Profile मध्ये. याचबरोबर सेलिआक डिसिजची / ग्लुटेन सेन्सिटीव्हीटीचीही टेस्ट घेण्यात आली. (येथे अधिक माहीती वाचा) माझ्या मुलाला मोल्ड , पोलन अशी किंवा रॅश्/स्वेलिंग होणार्या अॅलर्जीज नाहीत. परंतू चिक्कार फुड सेन्सेटीव्हिटीज सापडल्या. त्याचा तक्ता देते.
येथे लाल रंग अथवा ३+ जिथे लिहीले आहे ते सगळं माझ्या मुलासाठी अपायकारक आहे. ते पदार्थ निदान ६ महिने तरी अॅब्सोल्युटली टाळायचे आहेत. त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात रि-इंट्रोड्युस करून त्याची रिअॅक्शन कशी येते ते पाहून पुढील कोर्स ऑफ अॅक्शन ठरवावी लागेल. पण तुम्ही पाहीलंत तर दिसेल, आपल्या भारतीय स्वयपाकातले कितीतरी पदार्थ त्याला चालणार नाहीत. उदा: म्हशीचे दूध, दही, बीट्स, कोबी, काकडी, लसूण, ढोबळी मिरची, लेट्युस, कांदा, रताळे, पालक, टोमॅटो, ग्लुटेन (पोळी, ब्रेड), गहू, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, प्लम... परंतू फिशचे बरेचसे प्रकार व पोल्ट्री त्याला चालणार आहे जी तो मुळीच खात नाही. बाकीचे नॉन्व्हेज प्रकार आम्हीदेखील खात नसल्याने घरी बनले अथवा आणले जात नाहीत.
ग्लुटेन सेन्सिटीव्हिटीच्या रिपोर्टमध्ये देखील ग्लुटेन/व्हीटला ३+ असल्याने तेही टाळण्याची गरज आहे. मी गेले ३-४ महिने त्याची पोळी कम्प्लिट बंद केली आहे. :( आणि माझ्या मुलाला पोळी खूपच आवडते. थोडासा समजूतीत फरक वाटतो पण अजुन आम्ही पूर्णपणे १००% जीएफ्/सीएफ डाएट करत नसल्याने याबद्दल मी नंतरच लिहीलेले बरे.
अशा रीतीने वरील रिपोर्टसवरून एक कळते, की आमच्या मुलाला जीएफ्/सीएफ डायेट व काही सप्लिमेंट्स (ओमेगा ३, एम्बी१२, झिंक) याचा फायदा होऊ शकतो. आता दुसरा अडथळा येतो. आमचा मुलगा मुळीच औषध घेत नाही. त्याला दोन माणसांनी पकडले तर तिसरा कसातरी औषध तोंडात ढकलू शकेल - तेही तो थुंकून टाकतो. आम्हाला सप्लिमेंट्स रोजच्या रोज देणे सध्यातरी स्वप्नवतच आहे. परंतू मी जेव्हा शक्य आहे व मुलाच्या मूडनुसार झिंक वगळता सप्लिमेंट्स देऊन पाहीली आहेत. ओमेगा ३ व एम्बी१२ याचा फायदा बोलण्यात वगैरे झाला नसला तरी आय काँटॅक्ट सुधारण्यात मात्र झाला. अचानक आपण जे बोलत आहोत ते मुलापर्यंत पोचत आहे असा दिलासा कुठून तरी आम्हाला मिळाला, मेबी त्याच्या एक्स्प्रेशन्सवरुन? हे सगळं जरी असलं तरी औषधं जर त्याच्या पोटात गेलीच नाहीत तर काय फायदा व तोटा. इथे आम्ही अजुनही स्ट्रगल करतो. त्याला अजुन इतकी समज नाही, की आम्ही सांगितले हे तुझ्यासाठी चांगले आहे - घे, तर तो गपचुप घेईल. त्यासाठी बहुधा थोडी वाट पाहावी लागेल. परंतू वरील रिपोर्ट्सवरून व मुलाच्या रिस्पॉन्सवरून आम्हीदेखील म्हणू शकतो की याचा फायदा होऊ शकतो!
अजुन एक मार्ग आहे जे तुम्ही करत आहात त्याचा किती फायदा होतो हे बघण्याचा. http://www.surveygizmo.com/s3/1329619/Autism-Treatment-Evaluation-Checklist-revised येथे एक चेकलिस्ट्/प्रश्नपत्रिका आहे. वरची कुठलीही मेडीकल ट्रीटमेंट चालू करण्याआधी व नंतर तुम्ही प्रश्नमालिका सोडवून स्कोअर काढला तर ऑटीझमची लक्षणे कमी जास्त होत आहेत किंवा कसे हे कळून येते.
मुलाच्या रिपोर्टवरून तसेच माझ्या काही लक्षणांवरून मलाही जाणवले की मला देखील फुड सेन्सिटीव्हिटीज असणार आहेत काही. मी काहीदिवस जीएफ्/सीएफ डाएट ट्राय केले असता मला अतिशय चांगले रिझल्ट मिळाले. पोटभर जेऊनही हलके वाटणे - सुस्ती न येणे, पचनसंस्था सुधारल्याचे समजणे इत्यादी फरक जाणवले. शिवाय मुलाच्या थेरपीस्ट्स, स्पीच थेरपीस्ट यांच्याशी बोलताही असंच समजले की ग्लुटेन सेन्सिटीव्हिटी इज अ बिग डील. तुम्ही ते ट्राय केले तर फरक जाणवेल नक्की. त्यामुळे ती एक आशा आहेच. अतिशय कष्टाचा रोड आहे हा, पण मी त्या वाटेला नक्कीच जाणार!! :)
ह्या सगळ्या टेस्ट्स आम्ही करून आता वर्ष होईल. आमचं मुळात तो खाण्याबाबतीत खूप स्ट्रगल असल्याने जीएफ्/सीएफ डायेट ट्राय करण्याचा प्रश्नच नव्हता. तो काहीच खात नाही तर निदान त्याला आधी २ वेळेस खाण्याची सवय लागूदे या विचाराने गेल्या वर्ष-२वर्षाचा बराच वेळ गेला. नेहेमीच्या डॉक्टरांनी जीएफ्/सीएफ हाणून पाडल्याने आम्ही परत कन्फ्युजनमध्ये गेलो. अशा रीतीने हो नाही हो नाही करत परत एकदा जीएफ्/सीएफची सुरवात गेल्या ३-४ महिन्यांपासून केली आहे. नशीब जीएफ्/सीएफ मध्ये भात येतो.
सप्लिमेंट्स जेव्हढी जायला पाहीजेत तेव्हढी गेली नाहीत, परंतू त्याचा नव्याने प्रयत्न चालू केला आहे. हा खूप मोठा प्रवास आहे. परंतू याचबरोबर आम्ही बाकीच्या थेरपीज( स्पीच, एबीए, ओटी) अर्थातच चालू ठेवली आहे. भारतातून आईबाबा, नातेवाईक यांच्याकडून होमिओपथी, फ्लॉवर रेमेडी याही गोष्टी कळतात. काही औषधं घरात आहेतही, परंतू रात्र थोडी सोंगं फार सारखे, आमचा मुलगा छोटा अन त्याचे मेडीसीन्/सप्लिमेंट कॅबिनेटच मोठे असा प्रकार होतो. त्याखेरीज त्याचे रूटीन अतिशय व्यस्त असल्याने हे सगळं जमवणे अवघड जाते. परंतू हॉलिस्टीक अॅप्रोचचाच फायदा होईल असं आम्हाला वाटते.
** हे नंतर एका मैत्रिणीशी इमेलवर बोलताना जाणवलेले. ते डिस्क्लेमर म्हणून ठेवते इथे. **
हे थोडेसे डिस्क्लेमर :
I have missed many many points while writing that article. I am not a writer and also I write and publish it right away because of time constraints. Even when writing I had a feeling, this article needs lot of editing.
First, the cause of Autism. personally, I don't care what the cause is. Because damage is already done. It could be MMR vaccine at the 1.5 or HepB at the birth, or maybe where we were living was agricultural area. so I'm sure the air filled with the pesticides might have some role. It could also be Mercury amalgam in my teeth, or it could be toxins from tap water. Also genetic mutation. I have mentioned all these 'so called causes' in my previous articles or comments on them. But yes I'm guilty of not mentioning them in the Biomedical article. I kind of got carried away and lost the thought process.
Also, my whole point was, whatever may be the cause of autism and toxins in your body, if these simple methods, lifestyle changes and support of supplements are making positive changes somehow, I am going to try them. It will at the least give the satisfaction of 'I tried whatever I can'. I cannot get past and deny all the recoveries read from all the books I have on this topic. :)
But yes, I also know, that this being spectrum disorder - one particular thing worked for A would not necessarily work for B. But Mother warrior has to fight first to see if she is winning or losing. :)
http://marathi.journeywithautism.com/In reply to काय लिहू? वरिल लेख वाचून मनात by रेवती
In reply to काय लिहू? वरिल लेख वाचून मनात by रेवती
In reply to माझ्या नातूसाठी उपचार by जयन्त बा शिम्पि
In reply to माझ्या नातूसाठी उपचार by जयन्त बा शिम्पि
In reply to तुम्हाला योग्य उपचार सापडो ही by मधुरा देशपांडे
In reply to तुम्हाला योग्य उपचार सापडो ही मनापासून इच्छा! by मुक्त विहारि
In reply to तुम्हाला योग्य उपचार सापडो ही मनापासून इच्छा ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to व्हॅक्सीनेशनने फरक पडलेला by स्पंदना
In reply to व्हॅक्सीनेशनने फरक पडलेला by स्पंदना
In reply to सर्वसामान्यपणे व्हॅक्सिनचा by आनन्दा
In reply to व्हॅक्सीनेशनने फरक पडलेला by स्पंदना
In reply to फिश खात नाही by मित्रहो
In reply to तुम्हाला योग्य तो उपाय सापडो by सूड
In reply to +१११ by सखी
In reply to +१ by सुचेता
In reply to हम्म by पैसा
In reply to बघा.. by स्वमग्नता एकलकोंडेकर
ओके, मुळात व्हॅक्सिन्स व ऑटीझम हा अतिशय वादाचा मुद्दा आहे.......
प्रेग्नन्सीत इकडे आवर्जून कोणते फिश खा/ खाऊ नका ते सांगतात कारण त्यात मर्क्युरी असतो. पण फ्ल्यु शॉटमधला मर्क्युरी कसा चालतो मग?
बघा.. :(वरील मते वाचून लसीकरण तोट्याचे आहे, असा (गैर)समज होण्याची शक्यता आहे. निव्वळ या कारणासाठी प्रतिसाद देत आहे. एम्.एम्.आर. लशीचा आणि ऑटिझमचा संबंध आहे, असा एक मतप्रवाह आहे जो आजवरच्या पुराव्यानुसार आणि CDC च्या मतानुसार चुकीचा आहे. ऑटिझमसाठी मोठी लॉबी कार्यरत आहे हेसुद्धा लक्षात घ्यावे लागेल. One of the loudest broadcasters of this supposed link between vaccines and autism is actress Jenny McCarthy, who has campaigned in support of Wakefield's findings as recently as 2011. वेकफिल्डचा रिसर्च पेपर चुकीचा होता हे सिद्ध झाले आहे आणि तो मागे घेण्यात आला आहे. लशीकरणामुळे जगभर खूप फायदा झाला आहे. देवीसारख्या रोगाचे १००% निर्मूलन झाले आहे. पोलियो आणि मलेरियासारख्या रोगांचे निर्मूलन होण्याच्या मार्गावर आहे. इतर अनेक रोगांसाठी लशीकरण उपयुक्त ठरत आहे. पण अश्या परिस्थितीतसुद्धा लशीकरणाच्या विरोधात चळवळ सुरू होत आहे, हे खेदकारक आहे आणि त्याचे परिणाम दिसत आहेत. टीपः मी डॉक्टर नाही आणि माझ्या अख्ख्या खानदानात कुणीही डॉक्टर नाही. मी डॉक्टरकडे एक प्रोफेशनल म्हणून सल्ला मागतो, प्रश्न पडले तर त्याला विचारतो, त्याचा सल्ला मानतो, पटले नाही तर दुसर्या प्रोफेशनलकडे जातो. पण आजकाल तर गूगल वापरून आणि इंटरनेटवर माहिती वाचून आपण डॉक्टरपेक्षा हुशार, इंजिनीयरपेक्षा तज्ञ, राजकारण्यांपेक्षा धूर्त वगैरे समजण्याचा जमाना आहे. तसे होऊ नये म्हणून हा प्रपंच.
In reply to SHANK3 जीनमधील संरचना बदलामुळे ऑटीझम होतो by आयुर्हित
In reply to मराठीत भाषांतर करणे अवघड आहे by पॉइंट ब्लँक
काय लिहू? वरिल लेख वाचून मनात