मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ही "सनी"ची लक्तरे...

दमामि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आमची प्रेर्ना! ही मनाची अंतरे इंच अथवा सेमी ही पडतील येथे तोकडे सांगा कशी मोजायची ही "सनी"ची लक्तरे... प्रत्यक्ष भेट आपली रात्र ती नशिबी कुठे मनात उतरवायची ही "सनी"ची लक्तरे... जन्म घेती नवनव्या फाइल संगणकावरी जागा किती व्यापायची ही "सनी"ची लक्तरे... एकमेका फोन देणया आज सारे टाळती प्रथम ती मिटवायची ही "सनी"ची लक्तरे... लांब आहे जायचे ,अन प्रवासही एकटा सोबतीला घ्यायची ही "सनी"ची लक्तरे...

वाचने 21037 वाचनखूण प्रतिक्रिया 85

नाखु गुरुवार, 07/23/2015 - 12:35
एका डवण्याच्या मायापुरी मिसळ्ळीची चित्तर कथा !!!

पैसा गुरुवार, 07/23/2015 - 12:54
सन्नीतैंबद्दल कविता आहे का! असू द्या असू द्या. माझ्या आवडत्या बजाज सनीबद्दल वाईट साईट लिहिलंय का काय म्हणून बघायला आले होते. अभी तुमको छोड दिया.

वडाप गुरुवार, 07/23/2015 - 14:06
इंचात न्हाइ किमीचं भाडं बसतंय .मागल्या वर्षीच प्लास्टिक बारदान टाकलं हुतं पन आता लक्तरं झालीया.हा पाऊस जावू दे मग बदलीन.रातीचं भाडं जास्त पडंल.कुनालाबी भ्येट .मणाचं वझं वडतो आपला टिंपू.एक फुन केल्ला की येतू.हाल्ली शराकडची प्वारं टिंपूत बसायला का मागत्यात कळंना झालंय म्हागच्या महिन्याला कुरडुच्या वाडीला इक प्वार गुलाबजामचा पाक सांडून गेलतं .

In reply to by वडाप

पैसा गुरुवार, 07/23/2015 - 14:20
हिथं मिपावं ट्यांपूला लै मागणी हाये. हिथंच लावत चला तुमचा ट्यांपू. रेगुलर गिर्‍हाईकांना जरा कन्सेशन देत जावा म्हणजे झालं!

दमामि गुरुवार, 07/23/2015 - 14:14
हो सनी देवलच्या लक्स कोझी बनियनवर ही कविता रचली आहे. संगणकाची मोबाइलची स्क्रीन पुसायला अशी कापडं बरी पडतात. आणि आपला फोन दुसर्या हाती देताना (धुतलेल्या बनियनच्या कापडाने ) स्वच्छ करून द्यावा. हायजिनीक असते ते. प्रवासात देखिल लक्स कोझी बनियनचा फार म्हणजे फारच उपयोग होतो. उकडत असेल तर नुस्त्या बनियनवर कुल वाटते, शिवाय कधी सिट पुसायला,कधी पातळ उशी म्हणून .म्हणून म्हणतो, एकट्या माणसाने प्रवासात लक्स कोझी बरोबर ठेवावे. आणि एवढ्या धिप्पाड छातीच्या सनी (देवल) वरती ते एवढुस्से बनियन लक्तरा सारखेच दिसते ना?????

In reply to by दमामि

पैसा गुरुवार, 07/23/2015 - 14:18
सण्णी बाय नव्हे सण्णी भाय का! मग त्याची भेट रात्री कशाला पाहिजे ओ तुम्हाला? बाकी काही असो. हा टक्या नाही हे आता नक्की! =))

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 07/23/2015 - 15:34
आणि अशाप्रकारे डॉ० पैसलॉक होम्स यांनी केसचा उलगडा केल्याबद्दल पूस्प्गुच देऊण सत्कार करण्यात येत आहे. -बीपी आपलं जेपी आणि कार्यकर्ते.

In reply to by नाखु

पैसा Fri, 07/24/2015 - 11:27
गुल = गायब दस्ता = बंदुकीचा दस्ता -- नाखुंचा पंखा --

कंजूस गुरुवार, 07/23/2015 - 14:42
एक काय ते स्टांडर्ड नक्की करा -गाडी /रेल्वे/टेंपो/बस. तरुणवर्ग उठून 'इतरांना' शीट ओफर करायचे .आता शीट लक्स बनिअनने पुसून ,त्याच बनिअनने फोन साफ करून वापरायला ( बॅलन्स संपला असेल म्हणून हो)देऊ लागले की काय ?मेट्रोमध्येतरी तशी वेळ येणार नाही.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

तुम्हाला दमामि आयडीमालकांची बरीचं काळजी आहे हो? आयडीमालकाला ओळखता वाटतं प्रत्यक्षात =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अजून मिपाचे सगळे आयडी सुधा माहीत नाहीत..... डु आयडी कुठले भेटायला ? ह्यांच्या कट्ट्यात माझा कुठे उल्लेख दिसला का तुम्हाला

अजया Sat, 07/25/2015 - 22:11
अब तक ५०! पन्नाशीनिमित्त दमामिंना लक्स कोझी बनेल देऊन सत्कार करण्यात येत आहे. अखिलभारतीयडुआयडीसंशोधकसंघाकडुन

In reply to by दमामि

टवाळ कार्टा Mon, 07/27/2015 - 12:45
मिपापे तु अचानकसे आया सब्को लग्ता तू है मेरा साया मेरी वजेसे फुटेज भी भोत खाया कट्टे को बुलाया तो क्यू नै आया :)

अप्रतिम कविता !!
काव्यरस: आरोग्यदायी पाककृती
काव्यरस आवडला , येथे पाक ह्या शब्दाचा अर्थ पवित्र असा गृहीत धरण्यात येत आहे ! बाकी काही म्हणा पण सनीतईंचा नुसता उल्लेखही मनाला खुष करुन जातो नै ;)

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ Mon, 07/27/2015 - 22:23
कधीतरी त्यांची सभा ऐक. व्यासपीठावर उपस्थित जेवढ्या स्त्रिया असतील त्यांना 'ताई' हे जोडलेलं असतं. व्यासपीठावर उपस्थित मा. ना. .... ताई, मा. .... ताई, मा. ..... ताई वगैरे!