शीर्षक सुचले नाही
लेखनविषय:
काव्यरस
कधी कधी निरर्थका लिहा बघू ज़रा उगा
असाच मी लिहूनिया प्रसिद्ध जाहलो जगा
असाच खेळ खेळलो पिळून शब्द काढले
अजून केस ओढतो कशास काव्य वाचले
इथून चार चोरले तिथून चार ढापले
करून भेळ चट्पटी विका म्हणून आपले
म्हणेल तो बळेबळे, "कळेल त्यांस चांगले"
छळेल प्रश्न हो मला, "कशास लोक पांगले?"
तुम्ही मला बघूनिया कशास दूर भागता
तुम्हास सोडणार का न काव्य हे सुनाविता?
पळा पळा छळेन मी विडंबने करेन मी
उदार काव्यप्रेमिका कशास लाइका कमी?
-- स्वामी संकेतानंद
आता मी पळतो..........
वाचने
2083
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
प्रतिसाद सुचला नाही :-) .
बाकी ___/\___.
In reply to प्रतिसाद सुचला नाही by श्रीरंग_जोशी
मांडवली करू. तुम्ही शीर्षक सुचवा मी प्रतिसाद सुचवतो. ;)
In reply to मांडवली करू. तुम्ही शीर्षक by स्वामी संकेतानंद
घ्या:- "निरर्थकांचे-स्वामी-अ भंग!" ;-)
In reply to घ्या:- "निरर्थकांचे-स्वामी-अ by अत्रुप्त आत्मा
अभंग नसल्याने निरर्थकांचे अभंग म्हणता येणार नाही. पण मी आता ब्लॉगवर टाकताना 'निरर्थक कविता' हे शीर्षक दिले आहे. :P
In reply to अभंग नसल्याने निरर्थकांचे by स्वामी संकेतानंद
ल्लुल्लुल्लुल्लुल्लु :-/ दुष्ट दुष्ट स्वामिज्जी! :-/
ळॉळ! अद्भुत काव्य आहे हे! शीर्षक पण ढापायचे होते ना! हाकानाका!
In reply to =)) by पैसा
तैशी शमत हे ;)
In reply to तैशी शमत हे ;) by विशाल कुलकर्णी
ढापण्यायोग्य शीर्षक दिसलेच नाही.
=)) =)) =))
:)
प्रतिसाद सुचला नाही