पाऊस आणि 'ती'
लेखनविषय:
रिमझिमणार्या पावसाने मला कुशीत घ्यावे
माझे अस्तित्वही त्या क्षणी हरपावे
अोघळणार्या थेंबाच्या प्रतिबिंबात तुला पहावे
पाहुन मला तू खुदकद गालात हसावे
हरपलेले अस्तित्व मला पुन्हा गवसावे
तुझ्या हातांनी पावसाचे थेंब अडवावे
वेगवान वारयाने पार्श्वसंगित द्यावे
अचानक तुझा हातांना लकवे भरावे
हातातुन निसटून तू उडुन जावे
हाती फक्त तुझे हॅंडल रहावे
गाडीने चिखलाचे चित्र कपड्यांवर काढावे
रिमझिमणार्या पावसाने मला कुशीत घ्यावे..
वाचने
2464
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
मला वाटलं रोम्यांटिक लिहिताय काय! जल्लां, छत्री दुरुस्त करून घ्या लौकर.
In reply to हायला! by पैसा
>>>> मला वाटलं रोम्यांटिक लिहिताय काय!
मलाही तसंच वाटलं. शीर्षक पाऊस आणि ती म्हटल्यावर काय काय चित्र रेखाटून टाकलं होतं आम्ही मनोमन.
आणि इथं तर साचलेल्या पाण्यातून गाडी गेल्यावर स्वच्छ कपड्यावर गढुळ पाण्याचे शिंतोडे उडाल्यासारखं वाटलं.
असो, वाचकांच्या भावनेशी कवीला काय घेणं देणं नसतं म्हणुन सोडून देऊ. लिहित राहा. कविता बरी वाटली. :)
चाँद चेहरा, जुल्फ दरया, बात खुशबु, दिल चमन
इक तुम्हे दे कर खुदा ने दे दिया क्या क्या मुझे
-दिलीप बिरुटे
इथं लय कच्चा माल हय.
टकोजीराव इथे तुमची गरज आहे.
In reply to इथं लय कच्चा माल हय. by रातराणी
खिक्क...म्हैतै...वाखू साठवलेली आहे ;)
बाकी तुम्ची नजरसुध्धा "तयार" झाली म्हणायची =))
In reply to खिक्क...म्हैतै...वाखू by टवाळ कार्टा
हॅ हॅ हॅ
धवल्याशेजारी बांधला पवला : )
In reply to हॅ हॅ हॅ by रातराणी
रातराणी हा डुआयडी असावा असा माझा दाट्ट संशय आहे.
In reply to रातराणी हा डुआयडी असावा असा by दमामि
कुणाचा हो?
In reply to कुणाचा हो? by रातराणी
वळणांवळणांवरती
तव आठवणींची भरती .....:)
In reply to वळणांवळणांवरती by दमामि
एक्सप्लेन. असलं काही समजत नाही.
( आता तरी पटल का मी दु आय डी नाही.) : )
In reply to इथं लय कच्चा माल हय. by रातराणी
यातुन आम्ही कच्चे आहोत ( जे आम्हासही ठाऊक आहे ) असे सांगायचे आहे की हे रॉ मटेरीयल आहे हे सांगायचे आहे ??
@हातातुन निसटून तू उडुन जावे>> खिक्क! :-D
खूप छान. रोमँटीक वाटणार्या कवितेला चांगलंच विनोदी वळण दिलंय.
झक्कास
हायला!