मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हवा एक पाऊस..........

एक एकटा एकटाच · · जे न देखे रवी...
हवा एक पाऊस मला गाफिल पाहुन अवचित बरसणारा... लटक्या रागावर माझ्या लडिवाळ हसणारा... हवा एक पाऊस ओळखीच्या खुणांवर उगीचच रेंगाळणारा... ओल्या वाटांवरल्या पाउलखुणा जपणारा... हवा एक पाऊस बेधुंद उत्कट सरींनी मला वेढणारा... घेऊनी मिठीत मजला अलवार शहारणारा... हवा एक पाऊस दूर माळरानात रातराणीस छेडणारा... मालवून चांदण्या सार्‍या रात्र नशावणारा........... हवा एक पाऊस फक्त माझ्या अन माझ्यासाठीचा झरणारा पसरलेल्या आभाळातुन ओंजळीत विसावणारा.........

वाचने 2057 वाचनखूण प्रतिक्रिया 9

सटक 14/07/2015 - 22:57
छान!! रात्र नशावणारा........... ऐवजी रात्री धुंदावणारा...

शब्दबम्बाळ 16/07/2015 - 10:18
हवा एक पाऊस भेटीसाठी माझ्या आतुर असणारा, बरसून फक्त माझ्यावरती माझ्यामध्येच विरघळणारा...