होता एक उस
लेखनविषय:
माझी पहिलीच जिलबी आहे. गोड मानुन झ्या.
होता एक उस
मला उंडरताना पाहुन
पाठीवर फुटनारा
डांबरट हुडपणावर माझ्या
कचकटून बसनारा
होता एक उस
बापाच्या हातात
उगिचच रेंगळणारा
ओल्या फोकासारखा
चिवटपणा जपणारा
होता एक उस
उद्धट उफरट बोलल्यावर
मला फोडणारा
हेरून उघड्या पोट-या
अलवार सपकावनरा
हवा एक फड उस
गावापासून दुर कोप-यात
तिच्यशी झोंबताना
फटफटीत चांदण्यातही
मला लपवणारा
होता एक उस
फक्त मला अन
मलाच हाननारा
सगळ्या भावंडांतून फक्त
माझ्याच पाठीवर बसणारा
-( उसाच्या दांडक्यानी मार खाल्लेल्या सर्व समदुःखींना समर्पित )
वाचने
2192
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान आहे , फक्त "ण" च्या ऐवजी "न" टाईपलंय तेवढं शुद्ध् लेखनाचं बघा.
आजकाल ऊस म्हटलं की उसगाव आठवतं.
कविता छान.
उस की यादों मय!! =))
शेवट शेवट उस ग्वाड लागला! :-D
समांतर:- फ़ळाचि आठवण आली! ;-)
खूपच भारी!
गावापासून दुर कोप-यात तिच्यशी झोंबताना फटफटीत चांदण्यातही मला लपवणाराहे जास्तच भारी. लै डेरिंगबाज!
मस्त कविता.
मजा आली वाचून.
छान आहे
पण विडंबन कुठल्या मुळ कवितेच आहे बरं!!!
आपल्याच कवितेचे आहे मालक
दुवा द्यायला विसरलो
हवा एक पाऊस
In reply to आपल्याच कवितेचे आहे मालक by सोंड्या
धन्यवाद
खतरनाक जबरी जमलय.......
यक नंबर...........
छान आहे , फक्त "ण" च्या ऐवजी