Skip to main content

सई

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 12/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
माझी सई तशी समजूतदार किती थकलो आहे ते पाहून किती गोड हसायचं ते निट ठरवता येतं तिला --- माझी सई तशी शहाणी आई आजारी असेल तर आईची आई होणं जमतं तिला --- माझी सई तशी डँबिस बाबा आईचे ऐकत नसेल तर बाबाची सासू होणंही जमतं तिला --- माझी सई तशी लब्बाड किती अन् कोणाला लोणी लावल तर किती अन् काय मिळेल हे पक्क ठावूक तिला --- माझी सई तशी बदमाष कोण रागावल्यावर किती भोकांड पसरायचे हे व्यवस्थित माहीतीये तिला --- माझी सई तशी निरागस शुभ्र केकवरची लालचुटुक चेरी मिळवायला किती रुसायचं हे कळतं तिला --- माझी सई तशी हुशार बाबा रागवला तरी बाबाचं प्रेम समजतं तिला --- माझी सई आज आठ वर्षांची झाली.... |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१२/०५/२०१५)
लेखनविषय:

वाचने 7200
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

आवडली! सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)

In reply to by खेडूत

+१

माझी सई तशी हुशार बाबा रागवला तरी बाबाचं प्रेम समजतं तिला वाह्ह... :) गोड आणि निरागस सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ब्रिक्स बँकेच्या अध्यक्षपदी के. व्ही. कामत

मुलगी म्हणजे बापाचा जीव की प्राण ... शब्दांपलिकडले भाव छेदून ओतप्रोत मायेचा झरा .... सई ला वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा !

मस्त कविता! सई ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

डँबिस सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

माझी सई तशी निरागस शुभ्र केकवरची लालचुटुक चेरी >>> लै मत्त मत्त !!! ही घ्या आता सईला वाढदिवसानिमित्त माझ्याकडून एक तसलीच लालचुटुक भेट. https://scontent-lhr.xx.fbcdn.net/hphotos-xpa1/v/t1.0-9/s720x720/11223763_840189099400711_1212327753963760351_n.jpg?oh=8c9376dce3cd8b56ea811855b5bcf159&oe=55D6BC5C

अगदी आवडली मुलीच्या वाढदिवसाला बाबाची उत्तम भेट

सर्वांचे मनापासून धन्यवाद!

सईला खूप शुभेच्छा...

बर्‍याच दिवसांनी तुमची सुंदर कविता वाचून मनापासून आनंद झाला. सईला बिलेटेड हॅपी रिटर्न्स !! मध्यंतरी बर्‍याच तोतया कवींनी अशी काव्ये प्रसवली होती की डोके भंजाळले होते. तुमची कविता वाचून तहान भागली.

मस्त लिहिलंय, छानच. माझी सई तशी डँबिस बाबा आईचे ऐकत नसेल तर बाबाची सासू होणंही जमतं तिला हे मात्र एक्दम खरं.