मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिबिंब

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मेघ सावळा का नभी एकटा? तो वाट प्रियेची बघ, पाहतसे विरह वेळा ही असह्य झाली प्रियेवीण जगणे ते व्यर्थ असे सखी प्रिया तव दूर वसुधा आतुर मिलना मनी कळवळे सरतील कधी, क्षण विरहाचे? नभास वेड्या कधी ना कळे... शल्य त्याचे कुणा ना कळले हलकेच कसे नभ ओघळले? विरह वेदना जळी बुडाली.. प्रतिबिंब नभाचे धरेस भेटले... बघतो आपले प्रतिबिंब जळी दूर उभा तो नभमंडलावरी.., नसेच नशिबी भेट प्रियेची... प्रतिबिंबे भेटती परी ऊरा-ऊरी विशाल... अ फ़ोटो आंतरजालावरून साभार

वाचने 2237 वाचनखूण प्रतिक्रिया 9

बघतो आपले प्रतिबिंब जळी दूर उभा तो नभमंडलावरी.., नसेच नशिबी भेट प्रियेची... प्रतिबिंबे भेटती परी ऊरा-ऊरी Class