(चालवून टाक चीप)
लेखनविषय:
काव्यरस
चालवून टाक चीप, जागतीक अर्थ मंद
राजना रिसेशनात कोण बैंक होय बंद
त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीस
बाय तू करू नकोस, एक वर्ष स्टॉक बंद
गीत गात 'टू बिगा'चं, बेलआउटी उगाच
सावकार आधुनीक, की मती असेल मंद
गार गार एक्सपोर्ट चीन मोरली सपोर्ट
गाउनी गुलाबगीत खात जा गुलाबकंद
ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल
सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद?
हाय ते इझी मनीत, क्यूइने कबर खणीत
सांग घेउनी बुडेेल, सैमला अनर्थछंद
-- स्कैमी संकेतानंद ;)
नवी दिल्ली,
०८ जुलै , २०१५
वाचने
10044
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
वावावा! संकेतानंद इज बॅक.
In reply to वावावा! संकेतानंद इज बॅक. by एस
सध्या आयुष्याचे आणि इन्टरनेटचेही ग्रीस लागले असल्याने मिपावर येणे होत नाही. एकूणातच ऑनलाइन कमीच असतो, त्यात हेवी साइट्स बाद होतात.. आज मौका मिळाला तर चौका मारला.:)
In reply to धन्यवाद by स्वामी संकेतानंद
मिपा हेवी ? कायपण ! ही
आमचा नंबर पयला ?
एनी वे लाईक बटन क्लिक केले
In reply to आमचा नंबर पयला ? by माहितगार
स्वारी पयला नंबर गावला नै !
छान
कं लिवलंय! कं लिवलंय!! जै हो स्वामीजीकी!
देवा.... त्रिवार दंडवत स्विकारा.
मस्त !
वा!वा!लय झ्याक!
लै झ्याक गीत!!!!
In reply to लै झ्याक गीत!!!! by बॅटमॅन
महाराजा !!!!!
मस्त चाललीय कविता !!
क्या बात, क्या बात!! पर्फेक्ट मीटरमध्ये!!
लोल! काय जबरदस्त जमलंय विडंबन.
मला प्रथम वाटलं की कोणीतरी (संगणकाची) डुप्लिकेट चिप विकत घेतली आहे, आणि तीच आता नाईलाजाने चालवून घेण्याबद्दल काव्य आहे. =))
त्या युरोकुली भरीस, भांडते अजून ग्रीसपर्फेक्ट मीटर!
In reply to लोल! काय जबरदस्त जमलंय विडंबन by आदूबाळ
हो राव. पूर्वीची अनेक दर्जेदार विडंबनं आठवली.
In reply to लोल! काय जबरदस्त जमलंय विडंबन by आदूबाळ
अगदी 36"-24"-36" विडंबन.
=)) लई ब्येस !
@ते तुलाच रे कळेल, कोण कोण रे जळेल
सांग ना अता खरेच, टोकियो कि ताशकंद?>>
वारलो हो स्वामिज्जी! वारलो! 
वारलो हो स्वामिज्जी! वारलो! 
त्रिवार दंडवत स्वामी,
समजायला थोडा उशिराचा लागला,
पण च्यायला भन्नाट आहे.
पैजारबुवा
जबरी विडंबन. चपखल
थोडं ऑफ होईल पण...
वाह वा संकेतानंद, क्लिष्ट हा विषय सबंध
त्यावरी ग़ज़ल रचून, तू दिला आम्हा आनंद
खत्तरनाक लिहिलीय ! वाह ! शेअर करू का? अर्थात नावासकट.
In reply to थोडं ऑफ होईल पण... by वेल्लाभट
वृत्तात दाद! क्या बात है!
संमती शेयर कुठे करणार त्यावर आहे.. :)
In reply to वृत्तात दाद! क्या बात है! by स्वामी संकेतानंद
कायप्पा वर काही निवडक लोकांना (ज्यांना यातल्या टर्म्स कळू शकतील)
In reply to कायप्पा वर काही निवडक लोकांना by वेल्लाभट
हरकतनाही. सहसा तिकडे नावानिशी पोस्ट गेली तरी पुढे २-३ फॉरवर्ड्सनंतर नाव गायब होते असा अनुभव आहे. पण ढ़ापाढापी काय कुठेही चालते, सो नो इश्यूज. होऊ द्या वायरल:);)
In reply to चालेल by स्वामी संकेतानंद
मला जे इतरांना वाचायला सुचवावेसे वाटते तेव्हा त्या लेखनाचा दुवा देतो.
मजकूर कॉपी पेस्ट करून कधीच कुणाला पाठवत नाही.
लेख मुळातच जाहीररित्या प्रकाशित केला असल्याने त्याचा दुवा इतरांना पाठवण्याबाबत परवानगी घ्यायची गरज वाटत नाही. नंतर लेखकाने लेखन अप्रकाशित केल्यास किंवा बदल केल्यास त्या दुव्यावरून लेखाची सद्यस्थिती दिसते.
क्या बात हैं.... एकदम मीटरमध्ये :) :)
एकदम समायोचित अन मार्मिक.
स्वामी फॉर्मात परत आले आहेत आज ईथे ह्या क्षणी!!!! लैच मज़्ज़ा आहे राव तुमच्या कवटीत
In reply to स्वामी फॉर्मात परत आले आहेत by कैलासवासी सोन्याबापु
आज ईथे ह्या क्षणी ते 'तत्सम' वगैरे शब्दांचा वापर करायचं पण बघत जा बापु ! बाकी स्वाम्या, फॉर्म टिकू दे रे बाबा.
आवडेशच ! In reply to आज ईथे ह्या क्षणी ते 'तत्सम' by विशाल कुलकर्णी
++++++११११११ टू विशाल.
स्वामिज्जिंच्या फॉर्म ला क्लोरोफ़ोम बसू नये हीच विच्छा!
In reply to ++++++११११११ टू विशाल. by अत्रुप्त आत्मा
स्वामिज्जिंच्या फॉर्म ला क्लोरोफ़ोम बसू नये हीच विच्छा!
हो ना, एवीतेवी ग्रीसच्या निमीत्ताने बोळा निघालाच आहे तर वाहू द्या गंगा ;) एकदम मीटरमध्ये आणि भन्नाट !!विडंबन जमलेय..
Pan tumi asa amachya doctoranchya
Kalajaala hath ka ghatala ओ ?
वावावा! संकेतानंद इज बॅक.