“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!
शेतकरी नेते मा. शरद जोशींचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १९८० पूर्वी शेतकर्यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. "कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकर्यांची संघटना होणार नाही" असे त्या काळी म्हटले जायचे. पण शरद जोशी नावाच्या एका ज्ञानेश्वराने शेतकर्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा मुका असलेला शेतकरी समाज ज्ञानेश्वराच्या रेड्याप्रमाणे बोलायला लागला. नुसताच बोलायला लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा शेतकरी चक्क मूठ आवळून रस्त्यावर उतरला. सरकारशी दोन हात करायला सज्ज झाला. शेतकरी संघटनेने शेतकर्याला त्याच्या गरिबीचे आणि दारिद्र्याचे मूळ कारण सांगितले. शेतीत गरिबी आहे याचे कारण शेतीतला माल स्वस्तात स्वस्त भावाने लुटून नेला जातो, हेही शिकविले.
जोपर्यंत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला बरकत येऊच शकत नाही. मग तुम्ही निसर्ग शेती करा, सेंद्रिय शेती करा, कमी खर्चाची शेती करा, जास्त खर्चाची शेती करा, पारंपरिक शेती करा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा. शेती कशीही करा; जोपर्यंत शासनाचे शेतकरीविरोधी धोरण बदलत नाही तो पर्यंत शेतकर्याचे मरण अटळ आहे. कोरडवाहू शेती केली तर बिनपाण्याने हजामत होते आणि ओलिताची शेती केली तर पाणी लावून हजामत होते, या पलीकडे फारसा काहीही फरक पडत नाही.
शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढे भाव मिळायला पाहिजे, हे सर्वांनाच मान्य आहे. तसे कोणीच नाकारतही नाही पण; कृती मात्र हमखास उलटी करतात. कुणी अज्ञानापोटी करतो तर कुणी जाणूनबुजून करतो. कुणी स्वत:ला शेतीतज्ज्ञ म्हणवून घेत असले तरी शेतीच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत बहुतांशी तज्ज्ञ निव्वळ अज्ञानीच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही.
शिवाय या स्वनामधन्य शेतीतज्ज्ञामध्ये आपसात एकजिनसीपणा नाही. प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. उठसूठ ज्याला जसे वाटते तसे सांगत सुटतो. कुणालाच खोलवर जाऊन विषयाचा पडताळा घ्यावासा वाटत नाही. कुणी म्हणतो निसर्गशेती करा, कुणी म्हणतो झिरो बजेट शेती करा, कुणी म्हणतो मार्केटिंग करायला शिका तर कुणी म्हणतो प्रक्रिया उद्योग उभारा. आता तर काही लोकं मानवी मूत्र वापरायचा सल्ला द्यायला लागलेत. ज्याला जसे वाटते तसेतसे बोलत राहतात. बोलायला माझी हरकत नाही. तोंड त्यांचे आहे व जीभही त्यांचीच आहे पण शेतमालाचे भाव म्हटलं तर यांची दातखिळी का बसते? हा प्रश्न शिल्लक राहतोच आणि इथेच खरी ग्यानबाची मेख आहे.
निसर्गशेती म्हणजे काय? आमचे बाप-आजे निसर्गशेतीच तर करत होते. रासायनिक खते वापरत नव्हते, कीटकनाशके फवारत नव्हते, संकरित बियाणे लावत नव्हते आणि घरी संडास नसल्याने संडासला शेतातच जात होते आणि तरीही देशाची लोकसंख्या कमी असूनही जनतेला जाऊ द्या; त्या शेतकर्यालाच पोटभर खायला अन्न मिळत नव्हते. धान्याच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, ओलिताची व्यवस्था निर्माण झाली, फ़वारणीसाठी किडीनुरूप कीटकनाशके निर्माण झाली आणि चमत्कार झाला. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यामागे रासायनिक खतांनी मोलाची भूमिका बजावली. आजही जर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर थांबवला तर देशाचे शेतीतील उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटेल, अशी परिस्थिती आहे. निसर्गशेतीचा सल्ला देणार्यांनो, मुंह खोलनेसे पहले कुछ तो शर्म करो!
झिरो बजेटशेती हा शब्द ऐकला की मला ओकार्या व्हायला लागतात. झिरो बजेट शेती हा शब्द मला काही केल्या पचवून घेताच आला नाही. शून्य खर्चाची शेती करायची म्हणजे नेमके काय करायचे? शेतीला बियाणे लागले ते चोरून आणायचे का? गोड गोड बोलून खतं उधारीत आणायची मग त्याचे पैसे बुडवायचे का? खर्च शून्य करायचा म्हटलं तर शेतकर्यांनी वस्त्र परिधान करणे सोडून झाडाच्या वल्कली अंगाभवती गुंडाळाव्यात का? मजुरांकडून फुकटात काम करून घ्यायचे म्हटले तर मग या देशात वेठबिगारी व गुलामगिरीची पद्धत नव्याने सुरुवात करायची का? कसली आली बोडक्याची शून्य खर्चाची शेती?
अनेकदा शेतकर्यांनी मार्केटिंग करायला शिकावे, असा सल्ला घाऊकपणे दिला जातो. आता या उपटसुंभांना कोणी सांगावे की, कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन आणि विपणन हे दोन स्वतंत्र भाग असतात. शेतीमध्ये सुद्धा जो शेती कसून उत्पादन करतो तोच शेतकरी असतो. शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. शेती करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला मार्केटिंगसदृश अन्य व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो शेती सोडून केवळ मार्केटिंगमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो शेतकरी नोकरी, पुढारीपणा किंवा व्यापार करायला लागतो तो अल्पावधीतच नोकरदार, पुढारी किंवा व्यापारी होतो; शेतकरी म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. सातबारा नावाने असला तर त्याला शेतमालक म्हणता येईल, शेतकरी म्हणता येत नाही. अर्थात शेतकरी फक्त तोच जो शेती कसून उत्पादनाचा विभाग हाताळतो. एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” भलेही मग सातबारा त्याच्या नावाने असो किंवा नसो. तो भूधारक असो किंवा भूमिहीन असो! आपण जेव्हा शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा शेती कसून उत्पादन करणार्याविषयी बोलत असतो; व्यापारी, उद्योजक, दलाल यांच्या विषयी बोलत नसतो. शेती कसणे सोडून सार्यांनीच व्यापार सुरू करणे अशी कल्पनाच करणे शक्य नाही. इतके साधे गृहितक आमच्या शेतीतज्ज्ञांना कळत नाही, ही अद्भूतआश्चर्याच्या तोडीची बाब आहे.
तरीही शेतकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ मार्केटिंग करणे, शेतकर्याला वावगे नाही. अनादिकाळापासून शेतकरी शक्य होईल तसे किरकोळ मार्केटिंग करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी गुजरी भरायची. आठवडी बाजार भरायचा. तिथे शेतकरी आपला शेतमाल स्वत: दुकान मांडून विकायचे. ही शेतमालाची मार्केटिंगच होती ना? आपल्या जवळचा शेतमाल विकून येणार्या पैशात अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करणे, शेतकर्यांच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? कुठे मध्यस्थ होता? कुठे दलाल होता? मग मार्केटिंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? आणि तरीही बरेचशे उपटसुंभ तज्ज्ञ शेतकर्यांना जणू काही फार मोलाचा आणि क्रांतीकारी मूलमंत्र सांगतो आहोत, अशा थाटामाटात मार्केटिंगसारखा बोजड शब्द वापरून शेतकर्याला सल्ले द्यायला उतावीळ असतात.
पूर्वी गावागावात बाराबलुतेदारांचे व्यवसाय चालायचे, गावागावात तेलघाण्या होत्या. गुळाची गुर्हाळं होती, हातमाग होते, कवेलू बनविण्याच्या भट्ट्या होत्या, कुंभारांचा कुंभारवाडा होता. तेलबियांपासून तेल, तूर-चण्यापासून डाळ, धानापासून तांदूळ, ज्वारी-बाजरी-गव्हापासून पीठ गावातच तयार होत होते. ही तेव्हाची शेतमाल प्रक्रियाच होती ना? आता शासकीय धोरणांच्या कृपेने गावात पिठाची चक्की हा एकमेव कुटीरोद्योग उरला आहे. बाकी सारंच शहरात-महानगरात पळालं आहे. हा बदल आपोआप घडलेला नाही. याला शासनाची इंडियाला पूरक आणि भारताला मारक शेतकरीविरोधी धोरणेच जबाबदार आहेत. इस्रायली शेती, शेतकरी व त्यांचं तंत्रज्ञान या विषयी बोलणारे चिक्कार आहेत. रस्त्याने चालायला लागलं की जागोजागी ठेचा लागतात इतके मार्गदर्शक गल्लोगल्ली झाले आहेत पण; इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणाविषयी कुणीच “माईचा लाल” बोलायला तयार नाही. शेतीविषयात भरारी घेण्यात इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा सिंहाचा वाटा आहे. तिथले शेतीधोरण शेतीला पूरक आहेत भारतासारखे मारक नाहीत, हे मात्र जाणीवपूर्वक मांजरीच्या शेणासारखे या तज्ज्ञाकरवी झाकून ठेवले जाते.
स्वातंत्र्योत्तर काळात शहरातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी शेतमाल स्वस्तात लुटून नेणारी धोरणे राबविली गेली त्यामुळे गावात बचत निर्माण होणे थांबले आणि खेडी भकास होत गेली. शेतमाल स्वस्तात मिळाल्याने आणि पक्का माल महाग विकण्याची मुभा मिळाल्याने शहरात-महानगरात बचत निर्माण झाली. बचत निर्माण झाली म्हणून शहरात कारखानदारी वाढली आणि शहरे फुगत गेली. जेथे बचत निर्माण होत नाही तेथे प्रक्रिया उद्योग उभे राहू शकत नाही. गाव ओसाड झाले आणि गावात प्रक्रियाउद्योग निर्माण होत नाही याचे कारण येथे दडले आहे. आमचे शेतकी तज्ज्ञ वैचारिक पातळीवर खुजे असल्याने त्यांना हे कळत नाही. त्यामुळे ते शेतकर्यांना दोष देत फ़िरत असतात. शासकीय योजनांचा लाभ शेतकर्यांना घेता येत नाही असा “वड्याचे तेल वांग्यावर काढणारा” राग आळवत बसतात. धोरणे आखताना चक्क शेतकरी विरोधी आखायची आणि वरून पुन्हा शेतकर्यांनी प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत असे सल्ले देत फिरायचे हा चक्क वाह्यातपणा आहे.
मी निसर्गशेती, कमी खर्चाची शेती, पारंपरिक शेती, सेंद्रीयशेती वगैरे कोणत्याही शेतीपद्धतीच्या विरोधात अजिबात नाही, याउलट शेतकर्यांसमोर शेती पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे, या मताचा आहे. शेतकर्याला जे सोयीचे वाटेल, त्याच्या खिशाला परवडणारे असेल तसे तो स्वीकारेल. हा त्याच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा भाग म्हणून मान्य केले पाहिजे. पण होते असे काही मंडळी स्वत:ला ब्रम्हदेवाचा अवतार समजून किंवा ऋषी-महाऋषी भासवून आम्ही सांगतो तसे केले तर तुझ्या शेतीत करोडो रुपयाचे उत्पन्न येईल आणि तू मालामाल होशील, अशी बतावणी करून फीच्या माध्यमातून पुन्हा शेतकर्यांची लूटच करून जातात. शेतकरी देशोधडीला लागतो आणि यांची दुकानदारी मात्र “दिवसा दुप्पट आणि रात्रीची तिप्पट” या वेगाने बहरत जाते. त्यालाही माझा आक्षेप नाही मात्र शेतमाल लुटीच्या व्यवस्थेबद्दल ही मंडळी तोंडामध्ये चक्क बोळे कोंबून असतात, यावर माझा आक्षेप आहे.
पगारी शेतीतज्ज्ञांचे तर बरे असते. काही वर्ष रासायनिक खतांचा वापर करा म्हणून सांगत सुटतात, त्याचाही ते पगार घेतात. मग रासायनिक खतांचा वापर टाळा म्हणून सांगत सुटतात. त्याचाही पगार घेतात. यातच त्यांच्या नोकरीचे आयुष्य निघून जाते. पण पुन्हा मरेपर्यंत पेन्शन आहेच. कर्तृत्व काय तर एकदा ’करा’ म्हणून सांगीतले आणि एकदा ’टाळा’ म्हणून सांगितले. मला असे वाटते की शेतकर्यांना आता सल्ले वगैरे देण्याची अजिबात गरज उरलेली नाही. शेतमालाच्या भावाचा मुद्दा बाजूला ठेवून अन्य उपचार करण्याची तर अजिबातच आवश्यकता नाही. जर तुम्हाला शेतीच्या भल्यासाठी प्रयत्न करतो आहोत, असा आव आणायचा असेल तर निदान शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली निघेपर्यंततरी सर्वांनी मिळून आपले लक्ष्य शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावरच केंद्रित केले पाहिजे.
मी एक उदाहरण सांगतो. ४ वर्षापूर्वी माझा एक जवळचा नातेवाईक आजारी पडला होता. आजार तसा साधा होता. पण त्याला सतत ताप यायचा. ताप आला की १०५ डिग्री सेल्सियसच्याही पुढे जायचा. ताप चढला की पॅरसिटॉमालसहित कुठल्याही औषधाने उतरतच नव्हता. फक्त गार पाण्याच्या कापडीबोळ्याने अंग पुसून काढले की ताप उतरायचा पण तोही तात्पुरताच. काही मिनिटातच पुन्हा चढायचा. सर्व उपचार केलेत पण यश येत नव्हते. १५ दिवस लोटले पण काहीच सुधारणा होत नव्हती. हिंगणघाटचे डॉक्टर झाले, वर्ध्याचे शासकीय रुग्णालय झाले, सेवाग्राम इस्पितळात उपचार करून झाले पण ताप उतरायचे नावच घेईना उलट आजार आणखी गंभीर होत गेला. शेवटी पेशंट घेऊन आम्ही नागपूरला एक्स्पर्ट डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने तपासल्यानंतर आजवर केलेल्या औषधोपराची माहिती घेतली आणि म्हणाले की जितका औषधोपचार करायला तेवढा करून झाला आहे. आता मी आणखी कुठले औषध देऊ? काहीही द्यायचं बाकी राहिलेलं नाही. हे ऐकून आम्ही अक्षरश: हादरलोच. मग थोडा विचार करून डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे. आम्ही म्हणालो, काय खर्च येईल तो येऊ द्या साहेब चिंता करू नका पण उपचार कराच. त्यावर डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे “उपचारच न करणे.” पुढील ७२ तास रुग्णाला अजिबात औषधच द्यायचे नाही. मला खात्री आहे की पेशंटवर तोच एकमेव उपचार आहे. आम्ही होकार दिला. औषधोपचार बंद केल्याने कदाचित जर काही अघटित घडले तरी आम्ही डॉक्टरला दोष देणार नाही, असेही लेखी स्वरूपात लिहून दिले.
रुग्णाला औषध देणे बंद केले आणि पाच-सहा तासातच ताप उतरायला लागला. १५ दिवसापासून न उतरलेला ताप सातव्या तासाला ताप पूर्णपणे उतरला. पुन्हा फिरून ताप आलाच नाही. रुग्ण पूर्णपणे बरा झाला तो सुद्धा औषधी देणे थांबवल्याने. शेतीचेही तर असेच होत नाही ना? गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. शेती नावाचा पेशंट एकच आहे आणि त्यावर औषधोपचार करणारे तज्ज्ञ आहेत लक्षावधी. संपूर्ण भारतवर्षात शेतीचे मुख्य दुखणे एकच आहे आणि तेही सार्वत्रिक समान आहे मात्र सुचविण्यात येणारे इलाज नाना तर्हेचे आहेत. जो येतो तो शेतकर्याला वाटेल तसा डोज पाजूनच जातो. शेतीची मुख्य बिमारी एकच; शेतमालास योग्य भाव न मिळणे. पण इलाज मात्र भलतेच चालले. कदाचित नको त्या उपचारानेच तर शेती व्यवसाय आणखी दुर्दशेकडे ढकलला जात नाही ना? याचाही प्रामुख्याने विचार करायची वेळ आली आहे.
शेतकरी हा मुळातच उत्पादक आहे. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे त्याच्या रक्तामांसातच भिनले आहे. सोबत पिढोनपिढ्यांकडून चालत आलेला वारसा आहे आणि बालपणापासूनच शेती कशी करायची याचा त्याला अनुभव आहे. तरीही त्याला पावलोपावली सल्ले देण्याची आवश्यकता आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. बीटी आली तेव्हा संशोधकांचे म्हणणे असे होते की, देशभरात बीटी वाण लागवडीखाली यायला वीस-पंचेविस वर्षे लागतील. प्रत्यक्षात दोन ते तीन वर्षातच देशभर बीटीवाणाचा प्रसार झाला. त्यासाठी शासकीय पातळीवरून काहीच प्रयत्न करायची गरज पडली नाही. चांगलं असेल ते ते अंगिकारण्याची क्षमता शेतकर्यांना निसर्गानेच दिलेली आहे.
उत्पादन कसे घ्यावे, हे शेतकर्यांना सांगायची गरजच नाही. फक्त शेतमालाचे भाव ठरवणे त्याच्या हातात नाही म्हणून शेती तोट्यात जात आहे. शेतीत सुबत्ता येऊन बचत निर्माण करायची असेल तर सर्व शेतकरी हितचिंतकांनी “शेतमालास उत्पादन खर्चावर रास्त भाव” मिळण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर सरकार राबवू शकत नसेल तर शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------
दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित माझा लेख
वाचने
133887
प्रतिक्रिया
258
मिसळपाव

प्रतिक्रिया
गंगाधर मुटे साहेब,
In reply to मला माझे १००-१२५ Clone बनवून by गंगाधर मुटे
नको - नको..
In reply to मला माझे १००-१२५ Clone बनवून by गंगाधर मुटे
धन्यवाद
विधायक पुन्हा लिहितो विधायक
करू देत नाही हे निर्विवाद सत्य. आता सांगू नका सगळेच शेतकरी कुटुंबातील सदस्य २४ तास बारा महिने व्य्स्त असतात त्यामुळे त्यांना सहकारी तत्वावर एकत्र येऊन किमान नाशवंत माल तरी थेट ग्राहकाला किफायतशीर किंमतीत विकता येणार नाही. आपले दुखणे हेच आहे की शेतकर्यांकडून घेतलेले रू १७ प्रती लिटर दूध ग्राहकांपर्यंत रू ५० प्रती लिटर का होते याचा शोध घेण्याची तसदी कुठलीही शेतकरी संघटना घेत नाही !! याउप्परही आपली अपेक्षा मूळ दर १७ चा २५ झाला तरी त्याचा बोजा (मधल्या दलालांचा मलिदा कायम ठेऊन ग्राहकाने ६० रू प्रती लिटर घेण्यास कुरकुर करू नये अजब न्याय? शेतकरी संघटना दलालांची सा़खळी तोडायचा प्रयत्न करताना दिसत नाहीतच. सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समीती यांचे सभासद कोण असतात त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते. त्यांना कोण निवडून देते ?शहरी ग्राहक का? मी चिगोंच्या धाग्यावर दिलेल्या लिंकमध्ये तज्ञांच्या मदतीने केलेले भरीव विधायक कामाचा दुवा (लिंक) दिला आहे असेच भरीव आणि कायापालट करणारे काम शेतकरी संघटनेने केले असेल तर सर्वात प्रथम मी आपले अभिनंदन करीन अन्यथा या धाग्यावरील अंतीम प्रतीसाद.सगळ्या कृषी उत्पन्न बाजार
In reply to धन्यवाद by नाखु
शेतकर्यांनी आपला माल APMC
In reply to सगळ्या कृषी उत्पन्न बाजार by अभिजित - १
असे असेल तर...
In reply to शेतकर्यांनी आपला माल APMC by गंगाधर मुटे
कम्युनिस्ट व्यवस्था
In reply to असे असेल तर... by अर्धवटराव
अन्नान्नदशा झाली.
In reply to कम्युनिस्ट व्यवस्था by श्रीरंग_जोशी
अगदी बरोबर
In reply to असे असेल तर... by अर्धवटराव
>>>> सहकारी तत्वावर एकत्र
In reply to धन्यवाद by नाखु
शेतीत गरिबी आहे याचे कारण
उत्पादन खर्च
In reply to शेतीत गरिबी आहे याचे कारण by मार्मिक गोडसे
शेतकर्याला आपला माल इतर
शेतकर्यांनी आपला माल APMC
In reply to शेतकर्याला आपला माल इतर by अभिजित - १
संपादक मंडळास
संपादक मंडळास शिसानाविवि.
खालील दोन्ही प्रतीसाद संकलीत्+एकत्रीत करून धागाकर्त्याचा कुठलाही धागा आला की (प्रतीसादकाने आवर्जून वाचावे असे म्हणून वैधानीक इशारासारखे आपोआप प्रकट व्हावेत अशी व्यवस्था सोय करावी ही विनंती)थयथयाट कशासाठी?
सल्ले....
चला , शेतकरी बनू या !
ते सोडा हो मुनिवर... कामाचं बोलूया जरा...
In reply to चला , शेतकरी बनू या ! by कपिलमुनी
नक्कीच करेन.
In reply to चला , शेतकरी बनू या ! by कपिलमुनी
अरेवा.. छान.
In reply to नक्कीच करेन. by प्रभाकर पेठकर
छानच
In reply to अरेवा.. छान. by संदीप डांगे
धन्यवाद संदिप डांगे.
In reply to अरेवा.. छान. by संदीप डांगे
काका, पुस्तक मिळाले तर सांगा
In reply to धन्यवाद संदिप डांगे. by प्रभाकर पेठकर
नक्की..
In reply to काका, पुस्तक मिळाले तर सांगा by यशोधरा
+१मला ही
In reply to नक्की.. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to +१मला ही by नाखु
धन्यवाद संदीप डांगे...गच्चीवरची बाग पुस्तकाचा उल्लेख केल्याबद्दल
In reply to अरेवा.. छान. by संदीप डांगे
गच्चीवरची बाग
In reply to धन्यवाद संदीप डांगे...गच्चीवरची बाग पुस्तकाचा उल्लेख केल्याबद्दल by Sandeep chavan
धन्यवाद संदीप डांगे...गच्चीवरची बाग पुस्तकाचा उल्लेख केल्याबद्दल
In reply to अरेवा.. छान. by संदीप डांगे
सगळे मिपाकर दुत्त दुत्त आहेत
सबसिडीचे ठिक आहे, तो हक्कच
In reply to सगळे मिपाकर दुत्त दुत्त आहेत by प्रसाद गोडबोले
मिपावर शेतकर्यांच्या लेखनाला सबसीडी दिली जावी अशी जोरदार मागणी मी करत आहेसबसिडीचे ठिक आहे, तो हक्कच आहे ! पण, लिखाणाच्या बाजूच्या प्रतिसादांचा दुष्काळ आणि विरोधी प्रतिसादांचा महापूर यात होणार्या नुकसानाची भरपाई करण्यासाठीच्या पॅकेजचे काय ? ते पण मान्य करा आधी !आपण नेहमी वाचतो कि सरकारने
पैसे शेतकर्यांसाठीच.
In reply to आपण नेहमी वाचतो कि सरकारने by अभिजित - १
बरोबर...
In reply to पैसे शेतकर्यांसाठीच. by प्रभाकर पेठकर
कर्ज देतानाच हे लोक ५० %
In reply to बरोबर... by संदीप डांगे
असे आहे तर मग शेतकर्यांना
In reply to कर्ज देतानाच हे लोक ५० % by अभिजित - १
म्हणजे शेतकर्याने १००० रूपये
In reply to कर्ज देतानाच हे लोक ५० % by अभिजित - १
कर्जमाफीचा लाभ बँकांनाच!http:
In reply to कर्ज देतानाच हे लोक ५० % by अभिजित - १
शेतकर्यांना सगळ्यात आधी
In reply to बरोबर... by संदीप डांगे
अच्छा तर मग शेतकर्याच्या
In reply to शेतकर्यांना सगळ्यात आधी by वैभव जाधव
या बँक म्हणजे काही SBI /
...
माझे विचार
सध्याच्या केंद्रसरकारची
In reply to माझे विचार by श्रीरंग_जोशी
सध्याच्या केंद्रसरकारची शेतीक्षेत्राविषयीची धोरणे आता पर्यंत तरी आत्मघातकीपणाकडे वाटचाल करणारी वाटत आहेत. पुढच्या चार वर्षांत ती अशीच राहिली तर आपला देश मध्यपूर्वेतील व आफ्रिका खंडातील अनेक देशांप्रमाणे अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी बनण्याची शक्यता आहे.यावर काही विदा आहे का..? १) २६ मे पासून एका वर्षात संपूर्णपणे बदललेली महत्वाची धोरणे. २) त्या धोरणांचे चारच वर्षांमध्येच होणारे घातक परिणाम ३) आगामी चार वर्षांमध्ये होणारे आयात निर्यात धोरणांमधील बदल (संपूर्ण परावलंबित्वासाठी हे आवश्यक असावे) ४) मध्यपूर्वेतील आणि आफ्रिकेतील कोणते देश..? किमान ४ / ५ नावे मिळाली तरी चालतील. अशा स्वरूपात विदा दिला तरी चालेल. "अतीबुद्धीमान व प्रातःस्मरणीय परमपूज्य राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे सदाचारी, सद्विवेकी मनमोहन सिंग यांचे स्वच्छ सरकार दुर्दैवाने जावून आधुनिक हिटलर, क्रूरकर्मा मोदींचे हुकुमशाही सरकार भारतात आले" असे काहीसे तुमचे मत असले तरीही वरचे विधान अत्यंत धाडसाचे आहे.आगामी चार वर्षांमध्ये होणारे
In reply to सध्याच्या केंद्रसरकारची by मोदक
आगामी चार वर्षांमध्ये होणारे आयात निर्यात धोरणांमधील बदलहे बदल भविष्यकालीन असल्याने याबाबत "तुमचे विचार" दिले तरी चालतील. फक्त ते विचार "मागील एक वर्षांच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार असलेले फोरकास्ट" या स्वरूपात असावेत अशी अपेक्षा....
In reply to सध्याच्या केंद्रसरकारची by मोदक
रिवर्स ट्रोलिंग
In reply to सध्याच्या केंद्रसरकारची by मोदक
रिवर्स ट्रोलिंगचे आणखी एक
In reply to रिवर्स ट्रोलिंग by श्रीरंग_जोशी
रिवर्स ट्रोलिंगचे आणखी एक उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद.नाही हो जोशीसाहेब. रिवर्स ट्रोलिंग वगैरे काही नाही. तुमच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादानंतरचे "जाता जाता" मांडलेले विचार प्रत्यक्षात येण्यासाठी UPA 2 सारखे सरकार किमान २० वर्षे सत्तेत यावे लागेल. (हे माझे वैयक्तीक मत आहे.)एखाद्याने भविष्यातील अनिश्चिततेबाबत काळजीपूर्ण शक्यता व्यक्त केली तर ती का केली याचे (विदाधारीत) स्पष्टीकरण मागायचे?साहजिक आहे. राजकारणावर नेहमी अभ्यासपूर्ण मते मांडणार्या तुमच्यासारख्या आयडीकडून (आणखी एक तो क्लिंटन!) असे मत वाचले की "माझ्याकडची माहिती चुकीची / अपुरी आहे का?" असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.माझा वरचा संपूर्ण प्रतिसाद व त्याचा आशय दुर्लक्षून केवळ शेवटी व्यक्त केलेल्या काळजीवरून काहीच्या काही निष्कर्ष काढायचे.मी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. माझे मत विचाराल तर "मोदी सरकार चांगले काम करत आहे की नाही हे ठरवण्यासाठी एक वर्ष हा तुलनेने कमी कालावधी आहे" आणि असे मूल्यमापन किमान ३ वर्षांनी करावे म्हणजे पुढची दोन वर्षे जनतेला आणि सरकारला "स्वतःची निवड योग्य आहे का?" हे कळण्यास पुरेसा वेळ मिळेल.छद्मीपणे अन विखारीपणे काय काय विशेषणे वापरली आहेत. सार्वजनिक जीवनात जगणार्या कुणाबद्दलही असे काही लिहिणे त्यांना तर कमीपणा आणत नाहीह्म्म.. स्वीकार्य मुद्दा. तुम्हाला वाईट वाटले असेल तर क्षमस्व!पण तसे लिहिणार्यांना नक्कीच कमीपणा आणतात.असेल ब्वा.मी व्यक्त केलेली काळजी ज्या विदावर आधारीत आहे तो गेल्या वर्षभरातल्या सार्वजनिक माहितीवरच बेतलेला आहे. त्या माहितीवरून कोणी काय निष्कर्ष काढावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याबरोबर सहमत व्हायलाच हवे असे काही नसते.तेच म्हणायचे आहे. एका वर्षातल्या धोरणांना पार आत्मघातकी ठरवून भारत येत्या चार वर्षात अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होईल इतका टोकाचा निष्कर्ष निघण्यास नक्की कोणती धोरणे जबाबदार आहेत हे माहिती करून घेण्याची उत्सुकता आहे. म्हणून प्रतिसादप्रपंच केला आहे.असहमती नोंदवण्याचीही सकारात्मक पद्धत असते.मी असहमत आहे असा निष्कर्ष कशावरून काढलात..? मी फक्त "तुमचे विधान धाडसाचे आहे आणि त्या विधानाच्या अनुषंगाने तुमचे असे का मत झाले असावे" असे नोंदवून आणखी माहिती मागितली आहे.मूळ धागा व धागाकर्ते हे ट्रोलिंग करताहेत हे स्पष्ट असताना अभ्यासू लोकही रिव्हर्स ट्रोलिंगसारखे काहीसे करताना पाहून वाईट वाटते. किमान एकदा तरी असे धागे अनुल्लेखाने मारले गेलेले पाहायचे आहे.अनेक वर्षांच्या वाचनानुसार तुम्ही जे निरीक्षण मांडले ते अनुल्लेखनीय असावे असे मला वाटत नाही. (किंबहुना कोणाचेच नसावे) तसेच त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांचा योग्य शब्दात आढावा घेतला असूनही शेवटचे निरीक्षण खूपच घिसाडघाईने काढल्यासारखे वाटले म्हणून दुर्लक्ष करावेसे वाटले नाही. बादवे.. हे थोडे हलके घ्या.. माझ्या प्रतिसादाला रिवर्स ट्रोलींगची उपमा देवून तुम्ही असे उघडपणे मान्य करत आहात की तुमचा प्रतिसाद "ट्रोलींग" करणारा आहे. ;)किती कीस पाडायचा
In reply to रिवर्स ट्रोलिंगचे आणखी एक by मोदक
मी व्यक्त केलेली काळजीयुक्त
In reply to किती कीस पाडायचा by श्रीरंग_जोशी
मी व्यक्त केलेली काळजीयुक्त शक्यता एका अज्ञानी व पूर्वग्रहदूषित प्रवृत्तीच्या माणसाने अर्धवट माहितीच्या आधारे काढली आहे असे समजा अन सोडून द्या.हे सोडून देवू शकलो नाही कारण प्रतिसाद तुमच्याकडून होता. मिपावर पडीक असणार्या ट्रोलधाडीपैकी कोणाकडून असता तर सोडून दिला असता. अन्नधान्य परावलंबित्वासंदर्भात तुमचे मत / शक्यता खरी ठरेल अशी सुतराम शक्यता मला दिसत नाही. दुर्दैवाने खरी ठरलीच तर येथे नक्की मान्य करेन. विदा मागण्याचे कारण असे होते की नक्की कोणत्या धोरणांवरून तुमचे असे मत झाले आहे ते अभ्यासणे व ती धोरणे अभ्यासण्यात माझा किंवा तुमचा गैरसमज झाला असल्यास तो दूर करणे व शक्य असेल तर आणखी माहिती मिळवणे. कमांडो ऑपरेशन संदर्भातली चर्चा आठवत असेलच. त्या दरम्यानही आपल्यामध्ये "एखाद्या विधानावर इतके खोलात जाण्याची गरज आहे का?" या मुद्द्यावर बोलणे झाले होते. त्यावेळी कदाचित अनावश्यक असलेल्या परंतु खोलात जावून केलेया चर्चेचे फलित सर्वांसमोर आहेच! बाकी मुद्दे वाचले. माझे प्रतिसाद अस्थायी, अस्थानी किंवा संदर्भ सोडून असल्यास कोणताही अनमान न करता प्रतिवाद करावा ही माझीच आग्रहाची विनंती. तुमच्या (आणि माझ्याही) दॄष्टीने "जबाबदार अशी ओळख असलेल्या" सदस्यांचे प्रतिसाद जर असे भरकटत असतील तर ते वेळच्यावेळी दुरूस्त करणे हे संस्थळावरील सकारात्मक वातावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. तुमच्या प्रतिसादाचा प्रतिवाद करताना मी याच प्रयत्नात होतो. बाकी व्यनीत बोलूच!!आपला प्रतिसाद पूर्णपणे वाचला.
In reply to माझे विचार by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to आपला प्रतिसाद पूर्णपणे वाचला. by सव्यसाची
अतीबुद्धीमान व प्रातःस्मरणीय
ओ... युवराजांना काय बोलायचे
In reply to अतीबुद्धीमान व प्रातःस्मरणीय by होबासराव
आयकर अन शेतकर्यांना दिली जाणारी पॅकेजेस
कर कुठलाही असो, जातो सर्वसामान्यांच्या खिशातूनच.
In reply to आयकर अन शेतकर्यांना दिली जाणारी पॅकेजेस by श्रीरंग_जोशी
संदर्भ
In reply to कर कुठलाही असो, जातो सर्वसामान्यांच्या खिशातूनच. by प्रभाकर पेठकर
सहमत
ह्या धाग्यावर प्रतिसाद
In reply to सहमत by मार्मिक गोडसे
यावर प्रतिवाद केला असता पण
In reply to ह्या धाग्यावर प्रतिसाद by कॅप्टन जॅक स्पॅरो
दूध का दूध
दूध का दूध पानी का पानी
दुवा क्र १ आवक वाढूनही बटाट्याचे भाव स्थिर चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक दुपटीने वाढून भाव स्थिर राहिले. तर बटाट्याची आवक चार पटीने वाढूनही भाव स्थिर राहिले. कांद्याला या आठवड्यात प्रतवारीनुसार १२00 ते २000 रुपये असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. बटाट्याला या आठवड्यात ८00 ते १000 रुपये असा प्रतिक्विंटलला प्रतवारीनुसार भाव मिळाला. खरीप हंगामामुळे भुईमूग शेंगांच्या भावात या आठवड्यात वाढ झाली. चाकण बाजाराची एकूण उलाढाल २ कोटी ५0 लाख रुपये झाली असल्याची माहिती सचिव सतीश चांभारे यांनी दिली. येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक ८00 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४५0 क्विंटलने वाढली. तळेगाव बटाट्याची आवक १८00 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १३५0 क्विंटलने वाढली. बटाट्याला १000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळून भाव स्थिर राहिले. जळगाव भुईमूग शेंगांची आवक १0 क्विंटल झाली व भाव ५000 रुपयांवर स्थिरावले. बंदुक भुईमूग शेंगांची आवक ५ क्विंटल होऊन ५000 वरून भाव ६000 रुपयांवर पोहोचले. लसणाची ३ क्विंटल आवक झाली. लसणाला ४000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढील प्रमाणे : कांदा - एकूण आवक ८00 क्विंटल. भाव क्रमांक १- २000 रुपये, भाव क्रमांक २- १५00 रुपये, भाव क्रमांक ३- १२00 रुपये. बटाटा - एकूण आवक १८00 क्विंटल. भाव क्रमांक १- १000 रुपये, भाव क्रमांक २- ९00 रुपये, भाव क्रमांक ३- ८00 रुपये. भुईमूग शेंग (जळगाव) - एकूण आवक १0 क्विंटल : भाव क्र. १- ५000 रुपये, भाव क्र. २- ४५00 रुपये, भाव क्र. ३-४000 रुपये. भुईमूग शेंग (बंदूक) - एकूण आवक ५ क्विंटल : भाव क्र. १- ६000 रुपये, भाव क्र. २- ५000 रुपये, भाव क्र. ३-४000 रुपये. लसूण- एकूण आवक ३ क्विंटल : भाव क्र. १- ४000 रुपये, भाव क्र. २- ३५00 रुपये, भाव क्र. ३-३000 रुपये. फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रति १0 किलोंसाठी मिळालेले भाव पुढीलप्रमाणे - टोमॅटो- ३५0 पेट्या (१00 ते १५0 रुपये), कोबी- ३५0 पोती (४0 ते ६0 रुपये) , फ्लॉवर- २५0 पोती (५0 ते १00 रुपये), भेंडी- ११0 पोती (१५0 ते २00 रुपये) , दोडका -११0 डाग (२५0 ते ३00 रुपये), कारली- ९0 डाग (२५0 ते ३00 रुपये), काकडी- ९५ डाग (७0 ते ११0 रुपये), गवार- ९0 डाग (१00 ते २00 रुपये) , वाटाणा- ६५ पोती (५५0 ते ६00 रुपये ). कोथिंबिरीची जुडी ३५ रुपयांना पिंपरी : महागाईचा नवीन उच्चांक झाल्याचा प्रत्यय सध्या पिंपरी-चिंचवडकरांना येत आहे. मंडईत श्रावणी घेवड्याची (बीन्स) प्रतिकिलोसाठी ३00 रु. दराने विक्री झाली. तर कोथिंबीरची जुडी ३५ ते ४0 रुपयांना खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली. मंडईत बहुतांश भाज्यांचे दर भडकलेलेच आहेत. मागील पंधरा दिवसांपासून भाज्यांचे दर दिवसागणिक वाढतच आहेत. श्रावणी घेवड्याला दहा दिवसांपूर्वी प्रतिकिलोस २२0 रुपयांचा दर मिळाला होता. आता रब्बी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात आवक र्मयादित झाली. मागणी खूपच असल्याने रविवारी हा दर ३00 रुपयांवर गेला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ८0 रुपयांना पावशेर बीन्स खरेदी करण्याची वेळ येत असल्याचे दिसून आले. कोथिंबिरीच्या दरानेही आजवरचा उच्चांक गाठला आहे. मध्यम आकाराची व प्रतीची जुडी ३५ रुपयांना मिळत होती. तर चांगल्या दर्जाच्या कोथिंबीरच्या जुडीसाठी ४0 रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे ग्राहकांना दहा रुपयांना कोथिंबीरीच्या थोड्याशा सुट्या कांड्या विकत घेण्याची वेळ येत होती. काही व्यापार्यांनीही नाईलाज म्हणून जुडीऐवजी सुटी कोथिंबीर विकून ग्राहक जपण्याचा प्रयत्न केला. इतर अनेक भाज्या २0 ते २५ रुपये प्रतिजुडी या भावाने विकल्या जात आहेत. आजवर इतक्या महाग भाजी खरेदी करावी लागण्याची ही पहिलीच वेळ असल्याने ग्राहक पुरते हैराण आहेत. तर आम्हाला महागड्या दराने खरेदी कराव्या लागणार्या कोथिंबीरच्या एकेक जुडीची विक्री करण्यात नाकी नऊ आल्याची प्रतिक्रिया विक्रेते डांगे यांनी दिली. भाज्यांचे किलोसाठीचे रुपयांतील दर पुढीलप्रमाणे : कांदा - २२, बटाटा - १४, आले - ७0, लसूण - ८0, वांगी - ५0, टोमॅटो - २0, भेंडी - ५0, गवार - ४0, पावटा - ८0, राजमा - ८0, वालवर - ७0, वाटाणा - १00, डफळ - १00, शेवगा - ६0, चवळी - ६0, श्रावणी घेवडा - ३00, कोबी - ३0, फ्लॉवर - ४0, मिरची - ८0, ढोबळी मिरची - ५0, कारले - ५0, दोडका - ६0, घोसाळे - ५0, दुधी भोपळा - ३0, डांग्या भोपळा - २५, तोंडली - ५0, पडवळ - ४0, कोहळे - ४0, काकडी - २५, गाजर - ३0, बीट - ३0, रताळी - ५0, सुरण - ४0, कागदी लिंबू प्रतिनग ४ रुपये, डझनास (३0). आता तुम्हीच ठरवा उत्पादकांना कमी भाव कोण देते आणि ग्राहकाला नक्की कोण लुबाडते. जाता जाता दलालांची साखळी तोडण्यात आम्च्या संघटणेला अजिबात रस नाही आणि काकाश्रींनी सत्कार केल्यापासून तर नाहीच नाही.शेतकरी -> घाऊक व्यापारी ->
In reply to दूध का दूध by नाखु
म्हणून्च
In reply to शेतकरी -> घाऊक व्यापारी -> by श्रीगुरुजी
एक अवांतर माहिती
"प्रतिसाद करत्यानों ..थोडी
त्रास करून घेऊ नये
In reply to "प्रतिसाद करत्यानों ..थोडी by जेपी
जे बदलत नाही ते संपुन जात..
In reply to त्रास करून घेऊ नये by श्रीरंग_जोशी
http://maharashtratimes
मिलिंद मुरुगकर यांचा लेख
डाळ वर्गीय पिके
रान डुकरे आणि शेतकरी आणि संरक्षण कायदे
In reply to डाळ वर्गीय पिके by गंगाधर मुटे
रानडुकराना मारण्याची सरकारने
खरेसाहेब, किती झोपेचं सोंग
In reply to रानडुकराना मारण्याची सरकारने by सुबोध खरे
अमेरिकन शेती
भक्त प्रल्हाद
हि समस्या फारच गंभीर आहे आणि
http://moklik.blogspot.in