२. भानावर येण्यापूर्वी
|
'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. त्याचे तात्त्विक उत्तर शोधताना लक्षात येते की, जाणीव म्हणजे मनुष्याची ज्ञानशास्त्रीय चेतना, आत्मभान. ही अशी जाणीव मनुष्याकडे आहे म्हणून नीतिशास्त्र निर्माण होऊ शकते, 'योग म्हणजे चित्तवृत्तीनिरोधन'याचा अर्थ माणसांना कळू शकतो, धर्म- धर्माज्ञा आणि राज्यघटनाही निर्माण होऊ शकते..
|
या लेखात 'जाणीव' ही संज्ञा मराठीतील अथवा कोणत्याही भाषेतील विशिष्ट शब्द म्हणून नाही तर 'एक तात्त्विक संकल्पना' या अर्थाने आणली आहे. 'जाणीव म्हणजे काय?' हा तात्त्विक प्रश्न आहे. तिचे उत्तर मानसशास्त्र, मज्जातंतूशास्त्र इत्यादी विज्ञानशाखांकडून दिले जाते. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्र तर हा स्वत:चा क्षेत्रसिद्ध अधिकार समजते. उदाहरणार्थ, जाणीव-राणीव-नेणीव किंवा बोध-अबोध मन, इत्यादी. पण तो अर्थ इथे अपेक्षित नाही. प्रश्न तात्त्विक असल्याने उत्तर तात्त्विक शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
या विश्वाविषयी माणसाला अपार कुतूहल आहे. विश्वाचे निरीक्षण करताना माणसाला दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात. काही गोष्टी निर्जीव आहेत, तर काही सजीव आहेत. जिवंत असणे ही सजीवता आणि जिवंत नसणे ही निर्जीवता.
माणूस, प्राणी हे सजीव तर दगड, धोंडा निर्जीव. सजीवता ही विशिष्ट घटना आहे. काही वेळा तिची मिसळण झाल्याचे वाटून निर्जीव वस्तूही सजीव असल्याचा भास होतो. रेडिओचा शोध लागला तेव्हा गाणारी बाई आत बसली आहे, यावर अनेकांचा विश्वास होता. रेल्वेचा शोध लागला त्या काळात सुरुवातीला 'हा माणसांना खाऊन टाकणारा राक्षस आहे', असे वाटून रेल्वे ओस पडली होती. वनस्पतींनाही सजीव मानले जाते, पाणी जिवंत समजले जाते. आज संगणकाला 'विचार करणारे यंत्र' हा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यंत्रमानव, उपमानव या अत्याधुनिक; तर यक्ष, किन्नर या जीवयुक्त मानवाच्या प्राचीन कल्पना आहेत. वनस्पती सृष्टी, पाणी यांना सजीव मानल्यामुळे निसर्गही सजीव बनतो. एवढेच काय, पण अखिल ब्रह्मांडात पृथ्वी हाच एकमेव सजीव ग्रह मानला जातो.
या साऱ्या ठिकाणी सजीवतेचा अर्थ चेतना असणे असा समजला जातो. पण चेतना आणि जाणीव यात फरक करणे गरजेचे आहे. खुर्ची आणि खुर्चीत बसलेला माणूस यात फरक काय? खुर्ची जिवंत नाही, माणूस जिवंत आहे; माणसात चेतना आहे. चेतना ही काय गोष्ट आहे? ती देहाशिवाय स्वतंत्र असणारी की देहाशीच निगडित असणारी गोष्ट आहे? या चेतनेचे स्वरूप काय? बेशुद्ध माणूस आणि मृत माणूस यांच्यात चेतनाचे स्वरूप काय?
येथे चेतना (consciousness) आणि जाणीव (awareness) असा फरक शक्य आहे. मृतात चेतना नसते आणि बेशुद्ध माणसात चेतना असते, पण 'जाणीव' नसते. येथे मृताविषयी विचार करावयाचा नसून जिवंत माणसाविषयी विचार करावयाचा आहे. बेशुद्धावस्थेतील माणसातील चेतना ही 'जीवशास्त्रीय चेतना' आणि शुद्धीवर असलेल्या माणसातील चेतना ही 'ज्ञानशास्त्रीय चेतना' होय. या दुसऱ्या ज्ञानशास्त्रीय चेतनेलाच 'जाणीव' (awareness) म्हणता येईल.
आता, दुसऱ्या चेतनेबद्दल- ज्ञानशास्त्रीय जाणिवेबद्दल अधिक विचार करावा लागेल. बेशुद्धावस्थेत माणसाला कळत नसतेच, पण 'आपल्याला कळत आहे की नाही' हेही त्याला कळत नसते. म्हणून कळणे आणि आपल्याला कळणे, यात फरक करता येतो. या दुसऱ्या गोष्टीलाच बहुधा स्वजाणीव म्हटले जाते. अर्थात प्रत्येक वेळी 'आपल्याला कळत आहे' हे स्पष्टपणे कळलेच पाहिजे, असे नाही. काही वेळेला तरी 'आपल्याला कळत आहे' किंवा 'आपल्याला कळत नाही' हे त्याला नक्कीच कळत असते. हे दुसरे कळणे, हेच माणसाचे मुख्य सामथ्र्य आहे. ते ज्ञानाचे ज्ञान होय. स्वजाणिवेची जाणीव अशी पुढची पायरी असू शकते. .
माणसाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीवच त्याला आत्मभान देते. 'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते. ही ज्ञानशास्त्रीय जाणीव प्राण्यांमध्ये नसते. प्राणी आणि माणूस यांच्या आहार, निद्रा, भय, मथुन या प्रेरणा सारख्याच असतात. पण प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.
काय कळते आहे, यात स्वत:ची जाणीव समाविष्ट असल्याने माणूस 'स्व'चा शोध घेतो. हा 'स्व' म्हणजे भाषिक पातळीवर ज्याला 'मी' म्हटले जाते ते आत्मभान असते. बुद्धिमान प्राणी ते भक्त किंवा 'मी ब्रह्म' हा आत्मभानाचा कल्पनाविस्तार असतो.
आत्मभानाची ही ज्ञानशास्त्रीय जाणीव कोणते मानवी कार्य घडवून आणते? ही जाणीव अनघड, भरड अशा निसर्गातून मानवी जगाची निर्मिती करण्याची प्रेरणा माणसाला देते. हे सामाजिक जग असते. पृथ्वी या खगोलशास्त्रीय जगावर सामाजिक जगाचे आरोपण होते. अन्न, वस्त्र, निवारा, संगीत, साहित्य, सौंदर्य, नीती, तत्त्वज्ञान, धर्म, विज्ञान, तंत्रज्ञान या मानवी निर्मिती रूपात आत्मभानाचे प्रकटीकरण घडते.
लक्षात हे घेतले पाहिजे की, रोज अन्नाची गरज असली तरी प्राणी पाकशास्त्र निर्माण करीत नाहीत, माणूस निर्माण करतो आणि माणूस पाकशास्त्र, कामशास्त्र निर्माण करतो तसा धर्मशास्त्र, धर्मग्रंथही निर्माण करतो. धर्माज्ञाही माणूसच निर्माण करतो, लिखित-अलिखित भाषा माणूसच निर्माण करतो. संयम बाळगण्याची क्षमताही 'माझी'च असते, हेही 'माझे'च भान आहे.
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहे. खगोलीय जगाची निर्मिती आणि तिचा संहार 'मी' करीत नाही, ते 'माझ्या' पलीकडचे आहे; बेभान झालो की सामाजिक जगाचा संहारही 'मी'च करतो. तेव्हा न्याय-अन्याय, पोषण-शोषण, वर्ण-जात-जमात, छळछावण्या, युद्धे, शांतता या साऱ्या व्यवस्था मानवी ज्ञानशास्त्रीय जाणिवेचा आविष्कार आहेत.
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.
हे भान विकसित होणे आधुनिक लोकशाही धर्मासाठी अनिवार्य आहे. 'धृ' म्हणजे धारण करणे (धारयति इति धर्म:) म्हणून धर्म म्हणजे लोकधारणा करणारे तत्त्व. लोकशाही हा आजचा धर्म, 'युगधर्म' आहे. संविधान हीच माझी 'धर्माज्ञा' असते. लोकशाही हा अत्याधुनिक, व्यापक, मानवतावादी धर्म आहे. हा धर्म प्रत्येक माणसासह सर्व सजीवांच्या जगण्याचा मूलभूत हक्क बजावण्याची संधी देतो. संविधान ही 'धर्माज्ञा' ताठर, कठोर नाही, ती बदलता येते, दुरुस्त करता येते. नवा नीतीनियम करता येतो. कालबाह्य गोष्टी वगळून ही 'धर्माज्ञा' कालसुसंगत करता येते.
भानावर येण्यापूर्वी या रीतीचे आत्मभान आपण जागे करू शकलो तर आणखी काही गोष्टींचे भान विकसित करणे सहजी जमेल.
लोकसत्तेत ०७ जानेवारी २०१४ रोजी पूर्वप्रकाशित.
In reply to अगाबाबौ ! (भान आले कि by उगा काहितरीच
आपल्या कृत्याची जाणीव असल्यानेच माणूस एखाद्या कृत्याकडे प्रवृत्त किंवा निवृत्त होतो. जाणिवेचा हा घटकच त्याला आत्मसंयम देतो. पतंजलींनी 'योग म्हणजे चित्तवृत्ती निरोध' असे म्हटले आहे. वनस्पतींमध्ये चित्त (चेतना) असते, प्राण्यांमध्ये चित्तवृत्ती (चेतना आणि विकार) असतात, पण नियंत्रण नसते. माणसात मात्र (चेतना आणि विकार आणि) नियंत्रण असते. ते 'निरोध' या शब्दाने व्यक्त होते. वनस्पतीबाबत निरोधाचा प्रश्न उद्भवत नाही आणि प्राण्यांना निरोधाचे भान नसते. 'निरोधनाचे' भान हे नीतीचे भान असते, ते केवळ माणसात असते. ज्या व्यक्तीत हे 'निरोध' सामथ्र्य विकसित होते, तो योगी, संन्यासी. बौद्ध विचारातही 'दु:खनिरोध' आढळतो, तो याच भानातून.आवडले. जो असा निरोध करू शकत नसेल तो माणूसपणाच्या एक पायरी खाली आहे असे समजावे का? कारण हे "भान" बहुसंख्यांना नसतेच.
In reply to छान! by पैसा
In reply to खरे आहे ! by निरन्जनदास
In reply to हम्म by पैसा
In reply to शेवटचे दोन पॅरा by सुधीर
In reply to @ माणसाची ही ज्ञानशास्त्रीय by अत्रुप्त आत्मा
In reply to अजून सविस्तर वाचायला आवडेल . by स्वीत स्वाति
In reply to सध्या तरी लेख चाळत आहे.... by मुक्त विहारि
In reply to तुम्हाला समजल्यावर आम्हा by टवाळ कार्टा
In reply to सध्या तरी लेख चाळत आहे.... by मुक्त विहारि
In reply to सध्या तरी बर्याच गोष्टी by सुबोध खरे
In reply to ओके! by पैसा
In reply to पैसा ताई by सुबोध खरे
In reply to सध्या तरी लेख चाळत आहे.... by मुक्त विहारि
In reply to ?? by चौकटराजा
In reply to अतिशय छान ! by निरन्जनदास
In reply to अतिशय छान ! by निरन्जनदास
सायकल दुरुस्त करायची तर आधी टोपली, त्यात पाणी, चिकटपट्टी, फेविकॉल, पंप इत्यादी घ्यावे लागेल; तसे तत्त्वाचे, तत्त्वज्ञानाचे भान म्हणून काहीएक जाणीव विकसित करावी लागेल, ती करू. मग तुम्ही ज्या तत्त्वज्ञानाकडे जावयाचे आहे त्याची निवड करू शकता. माझे सारे प्रतिपादन सुधारणेसाठी खुले आहे, हे वेगळे नमूद करायला नको.आणि
प्रथम हे पहिल्या लेखात मी हे अधोरेखित केले आहे की तत्त्वज्ञान ही कुणा एकाची मक्तेदारी नाही, त्यावर प्रत्येक माणसाला बोलण्याचा अधिकार आहे.हे मस्तच.. :) असो, आज हे वाचायला आमचे "सर" इथे हवे होते असे नमूद करतो. ;) (नेमाडे सर, तुम्हाला हे "सर" माहित नसतील तर तुम्ही या "सरांची" चिंता करु नका. चर्चेत कधीतरी ते येतीलच. )
In reply to अभिनिवेशरहित लेखन आणि हा by अस्वस्थामा
In reply to वा, खूप सोपे करून सांगितले by सस्नेह
In reply to प्रेरणेचं विश्लेषण म्हणजे आत्मभान... by अर्धवटराव
निर्मिती ही आत्मभानाचे आणि संयमाचे निदर्शक आहे, तसे त्या उलट संहार, विध्वंस हे बेभानाचे लक्षण आहेजर येथे विध्वंस करणे म्हणजे एखादी गोष्ट नष्ट करणे असेल तर ज्या शक्तीने हा खेळ रचला आहे ती शक्तीसुध्दा विध्वंस करताना दिसतेच ना? (महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स इत्यादी.) वरील विधान काही काळासाठी बाजूला ठेवले तरी सुध्दा जिवंत रहायचे असेल तर विध्वंस करावाच लागतो. विध्वंस केल्या शिवाय तुमच्या पोटात अन्न जाणार नाही. मग विध्वंस बेभान कसा? या पुढे जाउन जर मी असा दावा केला की "विध्वंस करणे ही नैसार्गीक प्रवृत्ती आहे आणि संयम हा निसर्गनियमाच्या विरुध्द आहे." तर माझ्या विधानात काही चुक आहे का? यापुढे जाउन असेही म्हटले जाते की या जगात कोणीच कशाचीही निर्मिती करु शकत नाही आणि त्याचा विध्वंसही करु शकत नाही. जे काही आपण जगतो, बघतो, अनुभवतो ती केवळ एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. उदा. सुर्यापासून पृथ्वी निर्माण झाली, आणि त्या पासून जीवसृष्टी. याच न्यायाने निर्मीती आणि विध्वंस म्हणजे एखाद्या उर्जास्वरुपाचे दुसर्या उर्जास्वरुपात रुपांतर करणे. जर असे असेल तर मग निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा? हे कसे ठरवले जाते?
प्राण्यांना ज्ञानशास्त्रीय आत्मभान नसते.असा दावा करणे ही केवळ एक आत्मप्रौढी आहे असे वाटते. कारण असा दावा केवळ मनुष्यप्राणी इतर मनुष्यप्राण्यांपुढे करताना दिसतो. इतरांनी ते मान्य करावे यासाठी सुध्दा मनुष्यप्राणी इतरांशी संवाद साधताना दिसत नाही. जणू या विश्र्वातला एकमेव सजीव मनुष्यच आहे. (इथे मला जी.ए. कुलकर्णी यांची हंस आणि कावळे ही गोष्ट आठवत आहे.) जेव्हा मनुष्य या कोशामधुन बाहेर पडेल / फेकला जाईल तेव्हा कदाचीत त्याला प्रचंड मोठा धक्का बसेल.
'मी' ज्ञान घेणारा ज्ञाता, ज्ञान निर्माण करणारा निर्माता आणि स्वत: 'मी'च ज्ञानाचा विषय असणारा विषयीही आहे, असे या आत्मभानाचे स्वरूप असते.मी वर म्हणालो आहे की या जगात आपण जे काही अनुभवतो ती एकाच उर्जेची विविधरुपे आहेत. ज्ञान हे देखिल त्याच उर्जेचे एक रुप आहे. हे जर मान्य केले तर ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते. (हे लिहीताना माझ्या डोळ्यासमोरुन मॅट्रीक्स मधला "निओ" आहे. मॉर्फियस त्याला जाणीव करुन देत नाही तो पर्यंत तो मॅट्रीक्स मधे सुखाने रहात असतो. ) माझ्या या शंकांची उत्तरे तुमच्या लेखमालेच्या पुढच्या भागांमधे येणार असतील तर इथे दिली नाहीत तरी चालु शकेल. पैजारबुवा,
In reply to सर तुमचा या क्षेत्रातला अधिकार मान्य करुन..... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to माझ्याही मनात असे विचार आले by मराठी_माणूस
In reply to सर तुमचा या क्षेत्रातला अधिकार मान्य करुन..... by ज्ञानोबाचे पैजार
निर्मीती म्हणजे आत्मभान आणि विध्वंस म्हणजे बेभान पणा कसा?यात काय होते पाहा : मानवी संस्कृतीची निर्मिती ही एक सुरचना आहे. निसर्ग रचना करीत नाहीत, निसर्गात केवळ घटना घडतात. त्यांचा आपण अर्थ लावीत असतो. महापुर, दुष्काळ, त्सुनामी, अवकाशातली ब्लॅकहोल्स ही केवळ 'असणे' आहेत. त्यामागे हेतू नाही, नसतोही.. निसर्ग विध्वंस करीत नाही. पृथ्वीवर कुणीच नव्हते (किंवा आजही मंगळ, गुरु, प्लुटो या ग्रहांवर कुणी नाही), तेंव्हा काहीही घडले तरी कुणाचेच काही नुकसान घडले नाही. पण माणसाचा निसर्गाशी संपर्क आला आणि निसर्गावर हेतूचे आरोपण सुरु झाले. निसर्ग जणू मानवी (अन्थरोपिक) झाला. बीज फुटणे, त्याचा रोप, वृक्ष होणे ही नैसर्गिक क्रिया आहे, ती हिंसा नाही. त्यात कर्त्याला म्हणजे निसर्गाला "आत्मभान" नाही. त्यामुळे त्याला तो काय करीत आहे, हे कळत नाही. रचना आपण करतो. "आत्मभान" आपल्याला असते. आता, हे विसरणे किंवा दृष्टीआड करणे हा हिंसेचा मार्ग आहे. इतरांनी निर्माण केलेले काहीही नष्ट करणे, ही हिंसा असते. पण अन्न तयार करणे, ही हिंसा नाही, ते पोषण आहे. बॉम्ब इत्यादी युद्ध जनक कृती ही निर्मिती आहे का ? नाही ! कारण ती हिंसेची साधने आहेत. पण स्वयपाकघरातला चाकू ही निर्मिती आहे, आरोग्यविषयक साऱ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया हिंसा नाही, ती निर्मिती आहे. नवीन काही निर्माण होण आणि ते जीवनदायी असणे, ही निर्मिती मानावी. पण नेमकी हीच, म्हणजे निर्मितीला हिंसा समजणे ही चूक जैनांनी केली आणि अहिंसेचा गैरअर्थ लावला, प्रत्यक्षात ते शोषणाचे नेते बनले. तुम्हाला माहित आहे का जैन धर्म भाजी कापणे, शिजविणे इत्यादीला हिंसा मानतोच, पण संभोगाला ही हिंसाच मानतो. त्यामुळे 'ब्रह्मचर्य' नावाची गोची त्यांनी प्रसारित केली. आता, विरोधाभास असा की हे तत्त्वज्ञान जगाला सांगण्यासाठी नवी माणसे हवीत, आपलीच हवीत, जैन हवीत तर 'संभोग' ही हिंसा करावी लागते ! ती त्यांनी केली. पण कशी ? बासुंदी खायची पण त्यात उंदीर पडल्यासारखा चेहरा करून !! आता, पहिल्या जैनाने हि "उन्दिरयुक्त बासुंदी' खाल्लीच नसती, तर त्याच्याबरोबरच जैन संप्रदायाची पर्मनंट हिंसा झाली असती. तसे झाले नाही. कारण .... शोधू आपण.... निसर्गातील उर्जेचे रुपांतर ही सुद्धा हिंसा नाही, ते तुम्ही अधोरेखित करता तसे केवळ "रुपांतर" आहे. "उर्जा अक्षय्यता" हा निसर्गनियम आहे. आता, ज्ञानाला उर्जा समजणे हे रूपक आहे. तेच जी एं नी वापरले आहे. ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे. पण पुन्हा हीच महाभयावह चूक आम्ही ,म्हणजे वैदिक परंपरेने करून एक चिरस्थायी शोषण व्यवस्था आणली. पूर्वमीमांसा या संप्रदायाने ज्ञान अपौरुषेय मानले, त्यावर मूठभरांची मिरास आणली, वेद्वाक्ये सत्य व युक्त समजून ज्ञानवंचित समाज निर्माण केला ! ज्ञानाला आत्म्याप्रमाणे अमर मानून वर्ण-जाती-लिंगभेद आणले गेले आणि एक पांगळा समाज तयार झाला. आता, आपण हे लक्षात घेऊ की ज्ञान ही कृत्रिम घटना आहे, तिचा प्रसार ही जाणीवपूर्वक करावयची कृती आहे.
ज्ञान निर्माणही होत नाही आणि नष्टही. ते असतेच. काही जणांना ते आहे याची जाणीव असते / होते आणि काही जण अजाणतेपणी सुखात असतात. ज्ञानाची जाणीव जिवनात अशांतता निर्माण करते.हे पाहा , ज्ञानाला असे आदर्श स्वरूप देता येत नाही. ते दिले गेले की तुम्ही म्हणता तसे वाटू लागते. ज्ञानाची जाणीव अशांतता कशी निर्माण करेल ? आपले प्राधान्य कशाला ? हा प्राचीन प्रश्न आहे : दुःखी सॉक्रेटीस की सुखी डुक्कर ! कुंती कृष्णाकडे , तुकोबा विठोबाला दु:खाची मागणी करतात. कोणत्या सुखी डुकराची स्मारके, पुरस्कार आपल्यात आहेत? (सध्या ही लाटही आलीय बरे का !! नावे माणसांची असतात, एवढाच फरक.) मुक्ता साळवे, फुले, आंबेडकर, आगरकर, स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई यांना अज्ञानामुळे सुख मिळाले की दु:ख ? अनेक प्रश्न आहेत, सोडविता येतील तितके सोडवू. मालिका जशी पुढे सरकेल, तसा काही खुलासा होत राहील, पण नवे प्रश्न येतील, त्यांचे स्वागत करू. तुमच्यामुळे नवे चिंतन झाले, हा काय कमी फायदा झाला ? निरंजनदास
In reply to अधिकार प्रत्येकाला by निरन्जनदास
In reply to अधिकार प्रत्येकाला by निरन्जनदास
In reply to नाहि पटलं. by अर्धवटराव
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !पण निसर्ग असा दावा करीत नाही, कारण त्याला भान नाही. अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.
In reply to निसर्गभान by निरन्जनदास
निसर्गाला भान असते तर त्याने पृथ्वीवर रेडिमेड माणूस पाठविला असता,असं का वाट्तं तुम्हाला? आणि निसर्गात भान नसतं तर त्याच निसर्गाची निर्मीती म्हणजे जो मानव त्यात भान निसर्गबाह्य पद्धतीने आलं (किंवा डेव्हलप झालं) असं म्हणायचं आहे का? असं असेल तर तुमची निसर्गाबद्द्लची संकल्पना फार मर्यादीत आहे. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल?
रेडिमेड माणूस पृथ्वीवर आला, हाच दावा धर्मसंस्थेचा असतो !धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल.
अखिल ब्रह्मांडात पृथ्वीवर जीवनमान आहे, म्हणून तिला सजीव मानणे आणि तिचा आदर करणे, आई मानणे ही कृतज्ञता आहे. पण म्हणून निसर्ग सजीव मानणे हा तर्कदोष असतो.अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे. शिवाय तुम्ही ज्याला जीवनमान म्हणताहात ते एका विशिष्ट शरीरशास्त्र दृष्टीने एकवेळ ठीक आहे. शिवाय याच शरीराचं घडण ज्या निसर्गात, आणि निसर्गनियमांनी होतं, त्या निसर्गाकडेच मनुष्यशरीरात वावरणार्या (किंवा जाणवणार्या) सजीववत्वाचं प्रेरकत्व जातं. निसर्ग सजीव असल्याशिवाय मनुष्य सजीव असुच शकत नाहि.
In reply to परत असहमत. by अर्धवटराव
माणूस निसर्गाची निर्मिती आहे, म्हणजे नेमके काय आहे ? हे मला कळले नाही. म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ? २.
माझी निसर्गाची संकल्पना फार मर्यादीत आहे, हे तुम्ही अचूक हेरलेत; हे मलाच माहित नव्हते. ते तुम्हाला कळाले. कृपया मला माझी निसर्गाची संकल्पना समजावून द्यावी. ३. निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहित तिथे मनुष्यामधलं भान तरी निसर्गबाह्य कसं असेल? हा प्रश्न खरच महत्वाचा आहे. पण
निसर्ग आणि मनुष्य हेच जिथे वेगवेगळे नाहितम्हणजे नेमके काय ते मला समजले नाही. कृपया समजावून द्यावी. ४. "धर्मसंस्थेबद्दल सध्या न बोललेलं बरं. तो फार वेगळा विषय होईल." हे तुमचे म्हणणे मान्य आहे. याबद्दल आपण निवांतपणे बोलू. ५."अखिल ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवनमान आहे असं मानणं हा तर्कदोष आहे." हे ही माझ्या आकलनशक्ती पलीकडील विधान आहे. कृपया समजावून द्यावे. ६. निसर्ग सजीव असतो, या विधानाचा अर्थही माझ्या आकलनशक्ती पलीकडील आहे. कृपया समजावून द्यावे.
In reply to फारच छान ! by निरन्जनदास
म्हणजे निर्मितीची कोणती प्रक्रिया, कोणत्या क्रमाने, किती काळ, कुठे, कोणत्या नियमांनी आणि का घडली ?ड्जण्ट मॅटर. त्याकरता अनेक थेअरी वैज्ञानीक तपासताहेत. मूळ प्रश्न इतकाच कि मानवाला 'निर्मीती' शक्य आहे काय आणि असल्यास ति येते कुठुन. कारण ति क्षमता मानवाने निर्माण केलेली नाहि. २) निसर्ग म्हणजे मानव विरहीत एक कॉम्प्लेक्स क्रियांचं जंजाळ असं काहिसं वाटलं तुमच्या प्रतीसादातात. ३) अमुक एका ठिकाणि मनुष्य संपतो आणि निसर्ग सुरु होतो (किंवा त्या उलट) असं ठिकाण शोधा. ४) धन्यवाद ५) अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल. ६) मानव, वा इतर कुठलाहि प्राणि सजीव आहे + तो नैसर्गीक प्रक्रियेतुन घडला आहे.
In reply to :) by अर्धवटराव
अखील ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवन आहे असं मानणं म्हणजे आपण संपूर्ण पालथं घातलं असं म्हणावं लागेल.पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात. तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.
In reply to स्पष्टता नाही. by निरन्जनदास
तुमच्या कोणत्याही प्रतिपादनात स्पष्टता नाही. मी विचारलेल्या शंका तुम्ही दूर करीत नाही. मी हतबल आहे. शिवाय पुन्हा एक नवा दावा तुम्ही केला आहेअशा आमच्या आठवणींच्या खपल्या काढु नका हो. जीवाला फार त्रास होतो :)
पृथ्वी सोडून कोणत्या ग्रहावर जीवन आहे, ते तुम्ही पुराव्यासह दाखवित नाही आहात.तर्कदोषाचं उदाहरण म्हणुन ते दिलय.
तुमच्या ज्ञान आम्हाला द्या.नको. तुमचं ब्रॉडकास्टींग उत्तम चाललय कि.
In reply to अधिकार प्रत्येकाला by निरन्जनदास
In reply to माय गॉड, माय गॉड by राही
In reply to नाही by निरन्जनदास
In reply to आत्म याचा अर्थ 'असण्याची by मदनबाण
In reply to मानवेतरांना आत्मभान नाही हे by बॅटमॅन
In reply to मानवेतरांना आत्मभान ?! by निरन्जनदास
तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर बोलत आहेत का ? नाही !हाउ डू यू नो की ते बोलत नाहीत? मानवेतर सजीवांचे आपसातले जे काही संभाषण/संपर्क साधण्याची पद्धत असते ते मानवाला पूर्णपणे समजले आहे का? जर नसेल तर निव्वळ मानवाला कळत नाही म्हणून काही नाही असे म्हणण्यापैकीच आहे. हा तर मानवकेंद्रित दृष्टिकोन झाला!
In reply to तुमच्या आत्मभानाबद्दल मानवेतर by बॅटमॅन
In reply to मानवेतरांना आत्मभान ?! by निरन्जनदास
In reply to मानवेतरांना आत्मभान नाही हे by बॅटमॅन
In reply to भूतदयावाद by निरन्जनदास
In reply to अन्न, पाणी आणि लिंगभाव या by संदीप डांगे
In reply to +1 by ज्ञानोबाचे पैजार
टाचणीच्या टोकाएवढा मेंदू असलेली मधमाशी, सांकेतिक नाचातून इतर मधमाशांशी कामापुरता संवाद साधू शकते. कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसाच्या घ्राणेंद्रियाहून अनेक पट सक्षम आहे. माणूस फक्त विशिष्ट कंपनसंख्येचे ध्वनी ऐकू शकतो. वटवाघळाची ही क्षमता माणसापेक्षा किती तरीपट जास्त आहे
अगाबाबौ ! (भान आले कि