एक काम करण्याची परवानगी दे फक्त
लेखनविषय:
काव्यरस
रागाने झिडकारशील
स्वतःपासून दूर करशील
पण एक काम करण्याची परवानगी दे फक्त
मी बांधलेल्या मंगळसूत्राची वाटी
तुझ्या नकळत गळ्यात होईल पलटी
ती सरळ करण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.
केसांच्या बटांची ती रेशीमडोर
लटक्याने येईल डोळ्यांसमोर
ती मागे सारण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.
घाईत कधी हळूवार
फसेल कुठेसा पदर
तो सोडवण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.
रात्री एकांती कधी चमकेल वीज
दचकून अचानक तुटेल नीज
कुशीत घेऊन थोपटण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त.
तुजवीन सखे काय ठाव
कधी अर्ध्यावर मोडेल डाव
आठवणीत येण्याची परवानगी दे फक्त
हे एक काम करण्याची परवानगी दे फक्त
(भावानुवाद / प्रेरणा : गुलजार - मुझको_इतने_से_काम_पे_रख_लो)
वाचने
1681
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
सुंदर...!!!
चायला परवानगी?? बायको स्वतःची
In reply to चायला परवानगी?? बायको स्वतःची by टवाळ कार्टा
तुमचे लग्न झालाय का ?
In reply to तुमचे लग्न झालाय का ? by कहर
खिक्क...कै संबंध
In reply to खिक्क...कै संबंध by टवाळ कार्टा
लग्न झाल्यावर कोणत्या कोणत्या
In reply to चायला परवानगी?? बायको स्वतःची by टवाळ कार्टा
टक्या लग्न कर..
'विवाह' शिणेमातल्या 'मुझे हक