संध्याकाळ
लेखनविषय:
काव्यरस
ती आणि ही,
दोघीही एकाच वयाच्या...जवळपास.
तेच नेहमीचं पाहून न पाहणं,
नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं.
तिची नेहमीची लगबग,
ही निवांत बसलेली.
आजचा दिवस?
जरा वेगळा,
ती नेहमीपेक्षा थोडी टापटीप,
हीच्या नजरेतून ते सुटलं नाहीच!!
पुन्हा तेच नेहमीचं पाहून न पाहणं,
नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं.
ती आज थोडी जास्त लगबगीत
ही मात्र नेहमीसारखीच निवांत, ढिम्म बसलेली.
ती पुढे गेलेली मागे आली,
कनवटीची दहाची नोट काढून हिच्या थाळीत टाकली...
पुन्हा लगबगीत निघाली..
नातवाच्या वाढदिवसाला काय करावं,
हा विचार तिच्या डोक्यात,
ही तिने दिलेल्या दहात पोट कसं भरेल
या विचारात गढून गेली
दुसर्या दिवशी तेच नेहमीचं पाहून न पाहणं,
नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं!!
वाचने
3956
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
चांगली कविता. तो 'ढिम्म' हा शब्द कवितेच्या एकूण संवेदनशील स्वभावाला थोडासा खटकणारा वाटला. ती ओळ जरा वेगळ्या पद्धतीने लिहून पहा.
In reply to चांगली कविता. तो 'ढिम्म' हा by एस
सेम हिअर. +१
In reply to सेम हिअर. +१ by वेल्लाभट
-1.
ढिम्म शब्द बरोबर आहे. चुकीचा तरी नक्कीच वाटत नाही. दोघीन्च्या परिस्थितीतली तफावत आणि त्याचं कारण कदाचित त्याच ढिम्म बसण्यात आहे.
:(
आवडली.
......
आवडली.
छान आहे. "ढिम्म" खटकलं नाही, राहू द्या.
In reply to छान आहे. "ढिम्म" खटकलं नाही, by आदूबाळ
हां मलापण.
:(
कविता आवडली.
In reply to कविता आवडली. by रातराणी
+११
आवडली.
छानच...मुक्तक आवडले. ...
तेच नेहमीचं पाहून न पाहणं,
नजरेला नजर देऊनही अनोळखीपण जपणं........... हे फारच छान लिहिलय.
आवडली!
मस्त...
छानचं......
सुरेख लिहिलंय!
वाह..
चांगली आहे.
कविता आवडली.
छान आहे
हाण तेज्यामारी.
छान आहे कविता ! जळजळीत वास्तव !
चांगली कविता. तो 'ढिम्म' हा