पाऊस
लेखनविषय:
रांगडे घोंगावले रे सागरावर मत्त वारे !
निसटले आता नभाचे राज्य हातातून सारे !!
सूर्य हरला काजळाशी डाव ते नाकाम सारे !
अन नभावर बरसले रे घन तमाचे सुंद धारे !!
जोर इतका वादळाचा सांडले आकाश सारे !
लोपले सारे निवारे पांगले सारेच तारे !!
बरसला बेधुंद ऐसा बुडवुनी सा-या खुणा रे !
धुंद आवेगात न्हाउन पेटले गात्री निखारे !!
या धरेच्या मीलनाचा सोहळा तृप्ती बघा रे !
जिंकल्या या पावसाच्या कीर्तीचे गाणे करा रे !!
वाचने
1682
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
पाऊस कविता आवडली!
कवितेच्या मांडणी मधला आवेग अवडला. आणि त्यामुळेच शब्द मनाला स्पर्शुन गेले.
In reply to कवितेच्या मांडणी मधला आवेग by अत्रुप्त आत्मा
धन्यवाद. आवेग हा पावसाचा आत्मा आहे असे माझे मत आहे. सुरुवातीला सतत जाणवणारा आवेग त्रुप्तीकडे जाताना शांत, संयत होताना बघायला फार छान वाटते.
In reply to धन्यवाद. आवेग हा पावसाचा by सटक
स्पष्टीकरणा बद्दल, धन्यवाद..
आवडली!
आवडली
पैजारबुवा,
ज्जे ब्बात ! जियो...
क्या बात ! नुसताच आवेग नाही, वेग आहे कवितेला. सहीच.
सर्वांना धन्यवाद! हुरूप आला!
छान!