गुलाल
जरी देवळात उडवला मी गुलाल काल काही,
तरी पायरीत आज भेटले दलाल काही
मदिरेतच झिंगतात लोक असे नाही
देवळातही होतात हलाल काही,
उगाच वाहतो का ओझे फुकाचे,
जीवना मी तुझा हमाल नाही
का विझावे पणती परी,
अजूनही पेटवु मशाल काही.
#Gypsy
gypsykavita.blogspot.in
वाचने
1253
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
तुम्ही विषय खुप छान हाताळता.
प्रयत्न करतोय
छान!
मस्त!!!