मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी होतो किनारा.................

झंडुबाम · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मी होतो किनारा आणि ती होती उधाणलेली लाट थांबवावं वाटलं खूप तरी निसटून जायची स्पर्श करून . येताना यायची धावत,खळखळत अल्लड मुलासारखी जाताना जायची माझ्याजवळ आठवणींचे शिंपले सोडून तिचं येणं ,कधी अलगद कधी बेभान होऊन आदळणं झिजवत होतं मला कणकण जाणीव करून देत होतं काय ठेवलय वाढून आता उरलोय कणाकणातून , अंगावर घेऊन भरावाची ओझी आठवणींचे मोती घेऊन उरलोय तळाशी तिच्या परत येण्याची आशा घेऊन …………

वाचने 948 वाचनखूण प्रतिक्रिया 4

येताना यायची धावत,खळखळत अल्लड मुलासारखी जाताना जायची माझ्याजवळ आठवणींचे शिंपले सोडून हे आवडल