पाऊस .. तेव्हाचा
लेखनविषय:
काव्यरस
खर्याखुर्या प्रेमासारखा
पाऊस तेव्हा दाटायचा
बरोब्बर सात जूनला
येवून तो भेटायचा....!!
अडचणी होत्या चिकार
सर्व दूर करायचा,
मन हुरहुरलं की
हात तो धरायचा ....!!
तेव्हाचा पाऊस खरा
खरा पाऊस वाटायचा,
प्रत्येकाच्या आठवांत
घर तो थाटायचा ....!!
लहान, थोर, वडीलधारे
आदर तो राखायचा,
सार्यांच्या चेहर्यावर
आनंद तो माखायचा....!!
रसायन, फवारे वगैरे
लाडावलेला नसायचा,
येरे येरे पावसाच्या
गाण्यालाही फसायचा....!!!!
वाचने
2057
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
chan jamali aahe kavita.........
kharach,
aachi paaus asach asayacha !!!!
साधी सरळ. शेवटचा परिच्छेद तर सुरेखच.
@ रसायन ,फवारे वगैरे
लाडावलेला नसायचा,
येरे येरे पावसाच्या
गाण्यालाही फसायचा....!!!!>> ह्हे ह्हे ह्हे! हा साधेपणा आवडला.
आवडली.
बाकी लहानपणीपासून दुष्काळी भागातच आहे. काही वर्षांपूर्वी जिकडे राहायला आले तिथेही पाऊस कमी होत होत आता दुष्काळच आहे!
प्रत्येकाच्या आठवांत
घर तो थाटायचा ....!! >>> आठवांत म्हणजे काय?
In reply to छान कविता! by रुपी
आठवांत म्हणजे आठवणीत /मनात
कविता आवडली.
खर्याखुर्या प्रेमासारखा
पाऊस तेव्हा दाटायचा.
-दिलीप बिरुटे
हौसला अफजाई का शुक्रीया ।
उत्तम ! जम्या है !
chan jamali aahe kavita......