थोड्ड्स्स्स्स्सं खोटं...
लेखनविषय:
काव्यरस
थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच मला
तंबाखुतल्या चुन्या इतकं
त्याच्याशिवाय मेली खर्याला कीकच येत नाही,हवी तशी.!
मी लै चांगला आहे, हे जनात.
आणि मनात???
मायला..., कुठंतरी थोडा वाइटंहि आहे की!
हे उत्तर ठरलेलं!
भरपूर खय्रा बरोबर खोट्याचा सूड काढायला येणारं.
देव? धर्म?? आध्यात्म???
छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ!
हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!"
हे कसं येतय बरं अजुन तोंडातून !
( मनात काहीही असलं तरी! )
शाळेतले जुने मित्र भेटतात. काही जुने चष्मे असलेले!
काही नवे धारण केलेले! त्यांना हे दाखवायचि इच्छा होतेच.."मी अजुनही तसाच्च आहे!"
आतून आवाज येतो, "भाड्या..किती बदलतो स्वत:ला...सारखा सारखा!"
अजुनही उमगलेलं नाही हे कोडं!?
मला थोड्डस्सं खोटं का मिसळावं लागतं खर्यात????
सत्य अजुन आळणि आहे ?
का मीच???
वाचने
7546
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
व्वा!
वा!!
अवडल्या गेले आहे.
आवडल..
खूप छान कविता.
देव, धर्म, अध्यात्मावरचं कडवं पटलं
मुक्तक आवडलं.
देव? धर्म?? आध्यात्म???
छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ!
हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!"----हे हे अप्रतिम जमलय.
किती तो फटकळपणा ! आँ ?? =))
अजुनही उमगलेलं नाही हे कोडं!?
मला थोड्डस्सं खोटं का मिसळावं लागतं खर्यात????
सत्य अजुन आळणि आहे ?
का मीच???
हे मस्त
गुर्जी, मस्त हो.. :)
द्या टोले.... फाडा बुरखे...
जमलंय फक्कड...
In reply to द्या टोले.... फाडा बुरखे... by संदीप डांगे
फाडा बुरखेस्वत:चे मुखवटे गळून पडले की मग लोक दुसर्याचे बुरखे फाडायला सरसावतात, आपलं एक निरीक्षण नोंदवलं हो!!
In reply to फाडा बुरखे by सूड
गळुन पडले किंवा फेकून दिले, की असं होतं. याच्याशी सहमत.
मी हल्ली ते सरळ "माझेच आहेत!", म्हणुन स्विकारायाला सुरवात केलि आहे. :)
In reply to गळुन पडले किंवा फेकून दिले, by अत्रुप्त आत्मा
मी हल्ली ते सरळ "माझेच आहेत!", म्हणुन स्विकारायाला सुरवात केलि आहे. :)
"पलटू, शुभ दिन शुभ घडी, याद पडे जब नाम
लगन-मुहुरत झूट सब, और बिगाडे काम"
देव? धर्म?? आध्यात्म??? छ्या! छ्या! आपुन येकदम विज्ञाननिष्ठ! हो का?????? मग मन दमून गेल्यावर ,अजूनही "अरे रामा...पांडुरंगा तूच आहेस रे बाबा!" हे कसं येतय बरं अजुन तोंडातून ! ( मनात काहीही असलं तरी! )एक नंबर लिहिलंय! तसंच मांजर आडवी गेल्यावर, संध्याकाळी पाल चुकचुकल्यावर, एकटी साळुंकी दिसल्यावर, तळहाताला शीत चिकटल्यावर, लहान मुलाने गोल प्रदक्षिणा घातल्यावर...
In reply to देव? धर्म?? आध्यात्म??? by आदूबाळ
कावळा ओरडल्यावर, कुत्रं-मांजर रडल्यावर, केरसुणी उभी ठेवल्यावर
मुक्तक जमलंय, बुवा..
छान जमलं आहे.
खासच.
छान मुक्तक !
मुक्तक आवडलं
यावरून रंगोलीमध्ये लागणारं एक जुनं हिंदी गीत आठवलं.
थोडा थोडा सच और थोडी बेइमानी,
मुझे पानी में आग लगानी आ गई
हाय रे दैया हाय जवानी आ गई... :-)
मला तरी मुक्तक आवडलं, आणखी दोघांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत...
In reply to मला तरी मुक्तक आवडलं, आणखी by किसन शिंदे
मलाही आवडलं.
तसाही मी बुवांच्या कवितांचा फ्यान आहेच.
मुक्तक आवडले,
स्वाती
मस्त .... आवडले
रामा शिवा गोविंदा!
थोड्ड्स्स्स्स्सं खोटं लागतच मला तंबाखुतल्या चुन्या इतकं त्याच्याशिवाय मेली खर्याला कीकच येत नाही,हवी तशी.!संदर्भासहित स्पष्टीकरण द्या. (गुण १०) =))
आवडलं मुक्तक!
आवडलं मुक्तक!
सकाळचे ११.०० वाजलेत ऐकूय एक सुमधूर गीत जवा मर्द धरम
विविधभारती श्रोता
नाखु
गुर्जींना खरे ज्ञान उमगले :)
खोट बोलण खरच इतक वाईट असत का की खोट बोलल्यावर भयंकर अपराधी पणाची भावना मनामधे दाटून यावी?
नेहमी खरे बोलावे या शिकवणूकी मुळे बर्याच वेळा नको तेव्हा फार दडपण येते.
पैजारबुवा,
काहीं खरं, कांही खोटं. कांही आतलं, कांही बाहेरचं. ह्या आंत आणि बाहेरच्या दोन वेगळ्या जगांनीच आयुष्य सुंदर आणि रंगीबेरंगी बनविले आहे. आणि तसेही आपण अंतर्मनाशी प्रामाणिक आहोत हे काय कमी आहे?
कविता/मुक्तकातला प्रामाणिकपणाच भावला.
एक सही पाऊल पडलयं तत्वज्ञानाकडे.
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार व धन्यवाद.
आवडलं. "हम लोगों को समझ सको तो समझो दिलबरजानी" हे गाणं आठवलं.
In reply to वा! by पैसा
हे हे हे हे :) एकदम बरोब्बर गाणं.
व्वा!