राग
लेखनविषय:
जेव्हा चिडतो मी माझ्यावर
रागवतो तेव्हाच तुझ्यावर
जेव्हा जेव्हा माझे चुकते
चूक मला तुझियातच दिसते
ओरडतो ठोकर बसल्यावर
सावर ना आता तू लवकर
जेव्हा माझा सुटतो ताळ
तुलाच म्हणतो संयम पाळ
म्हणून करतो मी कांगावे:
माझे चुकले तूहि म्हणावे
वाचने
967
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
क्या बात!
मस्त