प्रेम करुन करुन दमावं

चिन्ट् जे न देखे रवी...
प्रेम करुन करुन दमावं असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही, आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही. प्रेमात होकार मिळवणार्‍याची गावात मोठी वट आहे, समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय, त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय. आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत, तरी सुध्दा नकार मिळणार्‍याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत. आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे, लग्नानंतर येईलच की बायको, फिर यारो डरना कायको? ------------------- लेखन संपादित केले आहे
वर्गीकरण
लेखनविषय:

15 टिप्पण्या 3,545 दृश्ये

Comments

गवि नवीन

..पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी. .कॉपीराईट रजिस्टर करुन घेणे.. :) ..हा विनोद झाला.. लिहीत रहा.शुभेच्छा.

चिगो नवीन

In reply to by गवि

.पहिलीच ओळ काही हर्बल औषधांच्या जाहिरातीत फिट्ट बसावी.
ROFL =)) साष्टांग दंडवत, गवि.. 'आजकल के असंतुष्ट पारीवारीक जीवन का कारण है स्ट्रेस' टाईपातल्या ताकाला जाऊन भांडं लपवणार्‍या जाहिराती आठवल्या..

सतिश गावडे नवीन

In reply to by संदीप डांगे

अगदी असंच काही नाही. मराठी आंतरजाल सर्व प्रकारच्या वयोगटातील, सर्व प्रकारच्या शैक्षणिक थरांतील लोकापर्यंत पोहचलंय याची ही निशाणी आहे.

खमक्या नवीन

चिन्ट्, ही कविता आधी कुठे प्रकाशित केली होती का?

नाव आडनाव नवीन

व्वा ! पहिल्याच लायनीत अख्ख्या कवितेचा अर्थ समजला. एकदम भारी लाईन. प्रेम करुन करुन दमावं दमल्यानंतर परत प्रेम करावं. मला पण जमली कविता !