मला आवडलेले संगीतकार :- १. मदनमोहन
हिंदी चित्रपटसृष्टीला ज्या अनेक संगीतकारांनी सजविले त्या प्रत्येकाची शैली स्वतंत्र होती. मदनमोहन यांचे वेगळेपण अगदी ठळकपणे डोळ्यात भरते. मदनमोहन हे आर्मीमध्ये काही वर्षे सर्विस केल्यामुळे शिस्तप्रिय आणि अचूक कामासाठी प्रसिद्ध होते. गजलसम्राट म्हणून ते ओळखले जायचे. अनेक नितांतसुंदर अजरामर गाणी विशेषत गजल्स त्यांनी आपल्याला दिलीत.
हिंदी चित्रपट गीते आवडत नाहीत असे म्हणणारा विरळाच. जसे मला आंबा आवडत नाही असे म्हणणारा असेल इतकी ही गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंग होऊन बसलेली असतात. आणि त्यातून आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगावर, घटनेवर पूरक गाणी असल्यामुळे ती आपल्याला आवडीची वाटतातच. विशेषता तारुण्यात पदार्पण करताना प्रत्येकजण चित्रपटातील प्रसंगात, गाण्यात स्वताला शोधत असतो. एखादा तरुण मग आपल्या मनातील स्वप्नसुंदरीला साद घालताना कदाचित हे गाणे म्हणेल “ हर तरफ अब यही अफसाने है ! हम तेरी आखोंके दिवाने है !” एखादी अल्लड नवतरुणी आपल्या मनात उठणारी हुरहूर अन भावना या शब्दात व्यक्त करेल “ नगमा और शेर की सौगात किसे पेश करू?” मीनाकुमारीने या गाण्यात जी अदाकारी दाखवली आहे ती निव्वळ अप्रतिम.
आणि जेव्हा दोन प्रेमी एकमेकाला भेटतात तेव्हा त्यांच्या भेटीतून जो स्वर्ग फुलतो त्याचे ही अप्रतिम वर्णन मदनमोहन यांच्या अनेक गाण्यातून दिसून येते. वानगीदाखल माझ्या आवडीची काही गाणी इथे देत आहे. प्रियकराने आपल्या प्रेमाचा स्वीकार केल्यानंतर प्रेयसी त्याला कृतज्ञेतेने म्हणते “ आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे ! दिल की ए धडकन ठहर जा मिल गई मंझिल मुझे ! “ पहिल्या मिलनाच्या वेळी आतुर पण लज्जित ती त्याला विनवते की “ बैय्या न धरो ओ बलमा , ना करो मोसे रार “ किंवा एखादी प्रेमविव्हळ ललना जिला आता समोर असलेला प्रेमाचा क्षण भरभरून जागून घ्यायचा आहे. कल क्या हो किसे पता ती आपल्या प्रियकराला बाहू पसरून मिठीत येण्यासाठी पुढे सरसावते आणि म्हणते “ लग जा गले के फिर ये हसीन रात हो न हो ! शायद फिर इस जनममें मुलाकात हो न हो ! “ तर कधी दोघेही एखाद्या लॉंग ड्राईव्ह ला निघताना गाडीत “ तुम जो मिल गये हो तो ये लगता है के जहां मिल गया ! “ नक्कीच गुणगुणतात. आणि जर तो पाउस सखा नेमक्या वेळी धावून आलाच तर सोनेपे सुहागा. आणि मग त्या सोनेरी आठवणी उरलेल्या संपूर्ण आयुष्यात सोबत करतात.
आयुष्यात मनाजोगते प्रेम मिळाल्यानंतर ती त्याला एक आश्वासन देते की आयुष्यात तू कुठेही असलास तरी मी तुझ्या सोबत आहे. हे सांगताना ती म्हणत असते “ तू जहा जहा चलेगा मेरा साया साथ होगा ! “ आयुष्यात आपली साथ देणारे आपली कायम काळजी करणारे कुणीतरी आहे ही जाणीवच खूप मोठी असते. आयुष्यातल्या अनेक प्रसंगातून निभावून जाण्याचे बळ ती देते.
आणि जेव्हा आयुष्यात कधी कर्तव्यापोटी त्याला तिच्यापासून दूर व्हावे लागले तर तो म्हणतो “ होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा ! जहर चुपकेसे दवा जानके खाया होगा ! “ तर कधी गैरसमजुतीमुळे ताटातुटीचे प्रसंग येतात तेव्हा तिला असे वाटते की “ जाना था हमसे दूर बहाने बना लिये ! अब तुमने कितनी दूर ठिकाने बना लिये ! “
कधी ही ताटातूट संपून पुन्हा पेमीजीव एकत्र येत. तर कधी उरलेले आयुष्य एकमेकाविना काढताना तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंतून तिच्या जखमा उघड्या पडत जेव्हा ती म्हणत असे “ नैना बरसे रिमझिम रिमझिम ! पिया तोरे आवन की आस ! “ मनात एक वेडी आशा घेऊन ती जगत असते की तो कधीतरी परत येईल. तर तो तिकडे उदास तलतच्या आवाजात हळुवार आपले दु:ख सांडत असतो. “ फिर वही शाम वही गम वही तनहाई है ! दिल को समझाने तेरी याद चली आई है ! “ किंवा एखादा तिच्याविना जगणे व्यर्थ आहे असे म्हणत वेडा होऊन रानोमाळ भटकत असतो अन म्हणतो “ ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही ! “
अशा तऱ्हेने आयुष्य पुढे सरकत जाते. विरहाची अनेक वर्षे जगताना तिच्यात एक अबोलपणा आलेला असतो. जगाच्या व्यवहाराकडे अलिप्तपणे पहात ती जगत असते. तिच्या आजूबाजूचे तिला बोलते करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अचानक एक दिवशी ती म्हणते. “उनको ये शिकायत है के हम कुछ नही कहते ! अपनी तो ये आदत है के हम कुछ नही कहते ! “ आयुष्यातले अनेक बरे वाईट प्रसंगातून गेल्यानंतर अनेक भावभावनांचे कडूगोड आठवणींच्या मनात उठणाऱ्या लाटा मनातच दाबून जगणाऱ्या लोकांचे ती प्रतिनिधित्व करते. त्यांना ती आपली वाटते. प्रत्येकाचेच आयुष्य कमीअधिक फरकाने असेच असते. पण अनेकजणांना त्या त्या वेळी व्यक्त होऊन मोकळेपणाने जगणे जमत नाही. अशावेळी मदनमोहनची गाणी मनाला खूप दिलासा देऊन जातात. जगात आपल्यासारखेच अनेक जण आहेत याची जाणीव करून देतात.
कोणतेही गाणे गीतकाराने आपले संपूर्ण कसब लावून लिहिलेले असते. पण त्या गाण्याला योग्य संगीतात सजवून गायकाच्या गळ्यातून परीणामकपणे गाऊन घेण्याचे कसब हे संगीतकाराचे असते. त्यामुळे कोणत्याही गाण्याच्या चांगले किंवा वाईट ठरण्यात मोलाचा वाटा हा संगीतकाराचा असतो.
एक छोटासा किस्सा. पूर्वीच्या संगीतकारात सुध्दा आपसात स्पर्धा होतीच. पण ती फक्त आपापल्या कामाच्या दर्जाबाबत होती. इतर बाबतीत सगळ्यांच्यात खेळीमेळीचे वातावरण असे. अनेक प्रसंगात तर ते एकमेकांना मदत सुध्दा करत. नौशाद आणि मदनमोहन यांच्यात सुध्दा खूप चांगली मैत्री होती. नौशाद साहेब नेहमी मदनजीना म्हणायचे की तू मला “अदालत” ची गाणी दे. बदल्यात मी माझी सगळी गाणी तुला देऊन टाकतो. इतके नौशाद साहेबांना मदनमोहन यांचे काम आवडत असे.
जाता जाता एक साईट मदनमोहन यांना समर्पित आणि संकलित केलेली. मदन मोहन यांच्या चाहत्यांसाठी खूप काही आहे इथे. http://www.madanmohan.in एकदा नक्की भेट द्यावी अशी.
मला आवडलेले संगीतकार :- २ सी रामचंद्रIn reply to लेखन आवडले by श्रीरंग_जोशी
In reply to छान लिहीत आहात.... by मुक्त विहारि
In reply to लेख आवडला! by किसन शिंदे
In reply to छान लेख. पण थोडक्यात by विशाल कुलकर्णी
In reply to विशाल.. by किसन शिंदे
In reply to किसन by विशाल कुलकर्णी
In reply to क्या बात है विशाल!सुरेख by अजया
In reply to छान लेख. पण थोडक्यात by विशाल कुलकर्णी
In reply to छान लेख. पण थोडक्यात by विशाल कुलकर्णी
In reply to मूळ लेखापेक्षा प्रतिक्रिया by दमामि
In reply to छान लेख. पण थोडक्यात by विशाल कुलकर्णी
In reply to छान लेख. पण थोडक्यात by विशाल कुलकर्णी
.कधीकधी मला प्रश्न पडतो की लताबाईंच्या दैवी आवाजामुळे मदनमोहनच्या चाली खुलायच्या की मदनमोहनच्या हॉंटींग मेलडीमुळे लताबाईंचा आवाज अधीक गुढगंभीर वाटायचा. मी फ़ार विचार करत नाही, माझं मत बिनधास्त मदनमोहनच्या पारड्यात टाकून रिकामा होता. पण हे ही तितकंच सत्य आहे की लताबाई आणि तलतमिया यांच्याशिवाय मदनमोहन नावाचा अध्याय अधूरा आहे. लता आणि तलत हे मदनमोहनच्या संगीताचे अविभाज्य घटक होते जणुकाही. त्यांच्याशिवाय मदनमोहनच्या गाण्यांचा विचारही करवत नाही. आणि या दोघांच्या गाण्यांतून मदनमोहनचं संगीत काढून टाकलं की फ़टक्यात त्यांचं पारडं जमीनीपासून खुप वर जातं...आपण प्रतिसाद चांगला दिला आहे वरील काही मुद्द्यांबाबत लिहीताना आपण खरोखरच काहीच विचार केलेला दिसत नाही म्हणुन हा माझा प्रतिसाद. श्री. मदनमोहनजी हे त्याकाळचे 'हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाचे' एक खंदे मानकरी होते यात वादच नाही, एकापेक्षा एक अप्रतिम अशी शेकडो गाणी देणारे असे संगीतकार याबाबत दुमत नाहीच, परंतु भा. लताबाईंबद्दल लिहिताना त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटते विषेशता पहिल्या परिच्छेदातील शेवटची ओळ ( आणि या दोघांच्या गाण्यांतून मदनमोहनचं संगीत काढून टाकलं की फ़टक्यात त्यांचं पारडं जमीनीपासून खुप वर जातं...). जी माझ्या वरच्या परिच्छेदात ठळकपणे ती ओळ मी दाखविली आहे. यावर मी काही अधिक विस्ताराने लिहावे असे नाही, आपण जाणकार दिसताय विचार करा म्हणजे मी काय म्हणतोय ते समजुन येइल. लताबाई त्यांच्याही पुर्वीपासुन अनेक संगीतकारांकडे गात होत्या व एकापेक्षा एक हिट गाणी देत होत्या. लताबाईंच्यासाठी म्हणुन विशेष अशा कठिण चाली तेव्हा रचल्या जायच्या कि ज्या केवळ त्या आणि त्याच गाऊ शकत. त्यांच्या गाण्याबददल मी अधिक काही लिहावे असे काही नाही, आपण सगळे अगदी आपल्या अगोदरच्या दोन पिढ्यांपासून त्यांना एकत आलो आहोत. तुमच्या त्या ओळीतुन असे ध्वनीत होते की "जर मदनमोहनांकडे जर लताबाई त्याकाळी गायल्या नसत्या तर त्या इतक्या मोठ्या झाल्याच नसत्या किंवा त्यांना नंतर तशी मोठी गायिका होण्याची संधीच मिळाली नसती किंवा दुसर्या शब्दात असे म्हणता येइल की त्या केवळ मदनमोहनांकडे गायल्या म्हणुन आज या उंचीवर पोहोचल्या". पहा विचार करून मी म्हणतो तसा त्याचा अर्थ निघतो की नाही ते ?? कोणाचा गैरसमज होउ नये म्हणुन हे इतके लिहीले.
In reply to मदनमोहन आणि लता by मित्रहो
In reply to वाचतो आहे.. पुढील भागांच्या by मोदक
In reply to चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जसे by अन्या दातार
In reply to चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जसे by अन्या दातार
In reply to चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जसे by अन्या दातार
In reply to आमचाही एक आणा ... by चौकटराजा
In reply to मदनमोहन by कपिलमुनी
In reply to कपिलमुनी by शशांक कोणो
In reply to लेखमालेची सुरुवात छान झाली आहे. by पद्मावति
In reply to चांगल्या लेखांवर मिपाकर पडी by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मदनमोहन यांनी उगा चढ्या उंच by स्पंदना
In reply to जंत्री by प्रदीप
In reply to जंत्री by प्रदीप
In reply to अजून काही विचार by प्रदीप
लेखन आवडले