जगावेगळे... !
लेखनविषय:
काव्यरस
जगावेगळे मागणे मागतो मी
तुझी याद नाही विसर मागतो मी
स्मरावे तुला ना प्रभो मी कधीही
तुझ्या दुश्मनांना शरण मागतो मी
नको शाश्वती जीवनाची दयाळा
हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी
किती आजवर मीच केलीत पापे
नको श्वास आता, अभय मागतो मी
इथे माजले धुर्त स्वार्थांध सारे
जमावे मला वाकणे.., मागतो मी
नुरे पात्रता रे तुला प्रार्थण्याची
'हरामीपणा' थोडका मागतो मी
जगाला कळेना विनंत्या मनाच्या
विषाचाच जहरीपणा मागतो मी
कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'?
जगावेगळ्या मागण्या मागतो मी !
विशाल..
वाचने
3348
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
नको शाश्वती जीवनाची दयाळा
हवे त्याच वेळी..; मरण मागतो मी
क्या बात है,वाह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भिगी भिगी भिगी जादु भरी लम्हों की ये राते... :- Thakshakलिहिलि आहे कविता
विकु, मस्तच रे!
अजून एक मस्त कविता
विशाल दा पुन्हा एकदा champion........
सुंदर!
छान आहे.
सुरेख कविता.
जबराट !
अजुन एक दर्जेदार रचना..
विशाल कुलकर्णी
छान लिहिली आहे कविता ........
धन्यवाद मंडळी _/\_
विशालदा...
ला ज वा ब*
सुंदर अभिव्यक्ति.
नको शाश्वती जीवनाची दयाळा हवे त्याच वेळी..; मरण मागतो मीहे विशेष आवडलं.
अप्रतिम....गझलचा बाज आहे..मक्ता छान!
कुणी ना म्हणावे पुरे रे 'विशाला'?
जगावेगळ्या मागण्या मागतो मी ! (मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो मी !)
In reply to अप्रतिम....गझलचा बाज आहे. by सटक
मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो मी !
वाह, क्या बात आवडेश, आवडेश ! लिहायला बसलो तेव्हा गझलच डोक्यात होती, पण नंतर जाणवलं की भुजंगप्रयात वापरून गझलेपेक्षाही सुंदर कविता होवू शकेल. म्हणून मग गझलेचा मोह टाळला. धन्यवाद :)
In reply to मनी रात्र काळी, 'सेहेर' मागतो by विशाल कुलकर्णी
छानच जमली आहे! व्रुत्तरचना नामशेश होण्याच्या मार्गावर आहे आता! पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार _/\_
खास रचना! सुरेख!
नको शाश्वती जीवनाची दयाळा