ती आणि मी

गरजू पाटिल. जे न देखे रवी...
(हे अगदी असं असायचं, म्हणून तसंच कवितेत लिहायचा प्रयत्न केलाय. ह्या सप्त्यातलं माझं भविष्य वाचलेलं असून देखील) तिच्या नी माझ्या एकच वाटा, फरक इतकाच... मी जायचा त्या वाटेने आणि ती यायची... आमच्या दिशा वेगळ्या होत्या. तिचे नी माझे थांबे ही एकच, फरक इतकाच... मी उतारु व्हायचो जिथे तिथेच ती चढायची... आमच्या वेळाही वेगळ्या होत्या. तिच्या नी माझ्या आवडी-निवडी ही सारख्याच, फरक इतकाच... मला काय आवडतं हे तिला जाणवायचं अनं तिला काय हवं ते मला. तिचं नी माझं मन ही एकाचं धाग्यानं घट्ट बांधलेल, फरक इतकाच... तिनं वेगळ्या गाठी मारलेल्या अन मी वेगळ्या अगदि पार पार, पार गुंता झालेला आमचा, फरक इतकाच... तिला सोडवता आला गुंता मी मात्र गुंतून गेलो पुरता... :गपा. ------------------ लेखन संपादित केलेले आहे
वर्गीकरण
लेखनविषय:

2 टिप्पण्या 848 दृश्ये

Comments

मिसळलेला काव्यप्रेमी नवीन

छान