(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !
लेखनविषय:
काव्यरस
आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा !
नवमिपाकरा। जपून ऱ्हां जरा।
होशील बकरा। ताजाताजा।।
लेख तू टाकसी । झुंडीने जमती
शिंगे उगारती। जुने नवे ।।
जास्त त्या रे माशा। करिती तमाशा।
पण काही खाशा। भृंग त्यात ।।
रेवा पै अजया। अनाहिता ताया।
कौतुक कराया। येती पुढे ।।
श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे
मधाची रे पुटे। जिभेवरी ।।
मग येई पुढे। चांडाळचौकडे।
ब्याट्या प्रगो सुडे। चिमणा क्याप्टन ।।
चिमटे ते घेती। हैराण करती।
गुर्जीही पळती । तांब्या संगे ।।
चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज।
भारी यांना खाज। जिथे तिथे ।।
अनाहिता येती। घेउनिया काठी।
पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।।
कुणी आयुर्हीत। ज्योतिष सांगतं।
स्वबोल ते सत्य। वाटे यासी।।
दंबुकीचा चाप। पाटलाचा बाप।
डोक्यासी रे ताप। आणील तुझ्या ।।
नाखु आणि टका। वल्ली मापं मिका।
स्वॅप्स आणि बिका। भली मने।।
जेप्या ,खटपट्या। आदूबाळ टक्या।
आयडी लाडक्या। सर्वांच्या रे ।।
जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत ।
ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।।
करिती कहर । माई कुरसुन्दीकर ।
बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।।
ध्यानी सारं ठेव। घट्ट पाय रोव।
चित्त शांत ठेव। दमामि म्हणे ।।
वाचने
19282
वाचनखूण
प्रतिक्रिया
108
In reply to खिक्क...जळ्ळतात सग्गळ्ळे by टवाळ कार्टा
तुम्हाला टेंपोत बसवलं असं एका धाग्यात वाचलं त्याविषयी थोडसं लिहाल का टका सर.
In reply to तुम्हाला टेंपोत बसवलं असं एका by कॅप्टन जॅक स्पॅरो
टक्या लाजू नको, सांग यांना सगळं!
In reply to तुम्हाला टेंपोत बसवलं असं एका by कॅप्टन जॅक स्पॅरो
लिहाल का टका सरस्पा आणि त्याच्या संक्षी सरांची आठवण आली.. (गेले ते दिवस.. !! ते पूर्वीचं मिपा आज रह्यल नै बगा..!! वगैरे वगैरे)
In reply to दोन दोन आयडी घेऊन तरी असे काय by सदस्यनाम
कदाचित मद्यपान करणारे तसे न करणार्याला जो सल्ला देतात तो इथे लागू होईल.
(म्हंजे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्यातली मजा कळणार नाही.)
In reply to दोन दोन आयडी घेऊन तरी असे काय by सदस्यनाम
जळतात बघा लोक माझ्यावर!:)
In reply to जळतात बघा लोक माझ्यावर!:) by दमामि
जळतात बघा लोक माझ्यावर!:)ओ ळ ख लं!!
In reply to जळतात बघा लोक माझ्यावर!:) by कॅप्टन जॅक स्पॅरो
सांगा पाहू कोण?:)
झक्कास!
सर्वच प्रतिसादकांचे आभार.
बाकी चालू द्या.
In reply to धन्यवाद. by खमक्या
हे आभार दमामि यांच्या वतीने मानले आहेत का?
In reply to दमामि यांच्या वतीने का? by श्रीरंग_जोशी
खिक्क...सापडला वाट्टे ;)
In reply to खिक्क...सापडला वाट्टे ;) by टवाळ कार्टा
म्हणजे १ ७ ३ ३?
In reply to म्हणजे by श्रीरंग_जोशी
नै...म्हणजे दमामिचा खरा मालक सापडला वाट्टे :)
In reply to नै...म्हणजे दमामिचा खरा मालक by टवाळ कार्टा
मुखवटे गळून पडतें देर नही लगती :-) .
In reply to बरं बरं by श्रीरंग_जोशी
काहिही......
शंभरी भरल्याबद्दल दमामिचा डुप्लिकेट सिनेमाची डुप्लिकेट सिडी देऊन सत्कार करण्यात येत आहे.
In reply to शंभरी भरल्याबद्दल दमामिचा by अजया
(ओ टै...हे र्हायले ल्हिहैचे)
शुभेच्छूक


In reply to (ओ टै...हे र्हायले ल्हिहैचे) by टवाळ कार्टा
अगागा कहर फोटो टाकलाय.
तुम्हाला टेंपोत बसवलं असं एका