सर्वांना नमस्कार!
मी एवढ्यातच मिपा वर अलोय. काही दिवसांपासून वाचतोय. भन्नाट आहे मिपा!
एक कविता (भीत भीत) प्रकाशित करतो आहे. माझी भाषा, व्याकरण, साहित्याची जाण हे सगळं जेमतेमच आहे. तेव्हा चुका होतील त्यांच्यासाठी आधीच माफी मागतो.
पिंपळ
पिवळ्या उन्हात
मनाचा पिंपळ
सळसळत राहतो
पिवळ्या उन्हासोबत
येतात काही पाखरं
नाव-गाव नसलेली
आणि फांदी फांदीत खेळतात
गातात
एखादं घरट बांधतात
उन्हं पानापानात भिनून जातात
स्वप्न बनून आनंद बनून हुरहूर बनून
वारा पानांच्या कानी सांगतो
दूर देशीच्या कहाण्या
धूसर क्षितिजाच्या पलीकडले सांगावे
रात्री
चांदण्या चमचमतात
पानं सळसळतात
एकमेकाला गुपितं सांगतात
स्वप्नांची देव-घेव करतात
उन आणि वारा
आकाश आणि चांदण्या
पिंपळाशी बोलत राहतात
आणि पिंपळ सळसळत राहतो
प्रतिक्रिया
1 Jun 2015 - 3:50 pm | एस
'पिवळ्या उन्हा' ऐवजी 'सोनेरी उन्हा' असा बदल केल्यावर कविता अजून छान होईल असे वाटते. बाकी कविता मस्त आहे. आवडेश. पुलेशु.
1 Jun 2015 - 4:57 pm | पथिक
धन्यवाद! 'पिवळ्या' ऐवजी 'सोनेरी' शब्द वापरावा का असं मलाही वाटलं होतं… तुम्ही त्यावर शिक्कामोर्तब केलंत.
1 Jun 2015 - 8:45 pm | अत्रुप्त आत्मा
सुंदर रचना.
आणि मिपावर स्वागत तुमचे.
2 Jun 2015 - 8:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त आवडली कविता. मिपावर स्वागत आहे.
लिहित राहा. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
2 Jun 2015 - 2:49 pm | पथिक
सर्वान्चे मनःपुर्वक आभार!