मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाटली आणि दारू.....

माम्लेदारचा पन्खा · · जे न देखे रवी...
खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना... डुआयडीने आता सगळे.... "स्कोअर सेटल" करू.....!! उपद्र्व हा अनंत काळचा... मिपाबरोबर कायम रहायचा... घरात चारच माणसे आणि... दारात चारशे चपला सारू..... नव्या आयडीच्या बाटलीत भरली शिळ्या विचारांची जुनीच दारु.... त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही... मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !! आडून आडून सगळे करिती हल्ला... भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला.... एकटा दुकटा कोणी लागता हाती.... चला त्याला आडवे करू !! येता जाता शरसंधान..... मिपाकरांचे कार्य महान.... संस्थळ घेतले साफ कराया.... कोळी,झुरळांची लगबग सुरु !! ---(सगळ्या डुआयडींना चारोळी अर्पण)

वाचने 4758 वाचनखूण प्रतिक्रिया 10

पैसा Sat, 05/23/2015 - 13:46
लै भारी! यातले काहीजण आपला एक आयडी धराशायी झाला की परत दुसरा घेऊन येतात. त्यांचं मिपावर एवढं प्रेम की कितीही वेळा बॅन झाले तरी परतून येतात आणि येताना आपण कोण आहोत हे लपवायचा प्रयत्नही करत नाहीत. आणि दुसरा प्रकार म्हणजे पकडले गेले तरी त मी नव्हेच वाले!

द-बाहुबली Sat, 05/23/2015 - 19:29
याच कारणासाठी माझे हात जोडून सर्वांना सांगणे आहे, नेहमी ओरीजनल राहा. म्हणजे पहिला आयडी बॅन झाल्याशिवाय दुसरा काढायच्या फंदात अजिबात पडु नका. *
खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना...
खिक्क... मिपाबद्दलच हे भाष्य आहे की आणखी कशाबद्दल हे जरा विस्कटुन सांगाल काय ?