२. नको बोलु बाबा काही

गणेशा जे न देखे रवी...
१. हरवली पोर माझी ---------------------- नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई हातानी तुझ्या जेंव्हा मला भरवला घास कामामध्ये असे तुझ्या फक्त माझाच ध्यास कसे विसरेल बाबा तुझी करुण कहानी फाटलेल्या सदर्‍यात विनलेली नाती धुळीमधी माखलेली तुझी जिंदगाणी आधाराची परि माझ्या प्रेमाची सावली अंगणात विसावता मायेची अंगाई वेड्या या पोरीची बाबा तुच विठाई प्राजक्ताच्या सड्यामध्ये होती ओघळली कविता सासराला जाताना तुझी रडवेली बोली फाटक्या या संसाराला ठिगळाची घाई दूराव्याच्या अंतरात जीव जाळीत राहि नको बोलु बाबा काही नको सांगु काही रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई रडवेली लेक तुझी सांग कुठवर जाई !!
वर्गीकरण
लेखनविषय:

15 टिप्पण्या 3,884 दृश्ये

Comments

प्रचेतस नवीन

अप्रतिम. गणेशाच्या कविता म्हणजे क्या बात...!!!!

नाखु नवीन

रडवून राहीलास रे ! जबहर्या रचना
अंगणात विसावता मायेची अंगाई वेड्या या पोरीची बाबा तुच विठाई
निशब्द बापूस नाखु

श्रीरंग_जोशी नवीन

भावस्पर्शी रचना खूप भावली. जुना गणेशा परतलाय याची खात्री पटली :-) .

अर्व नवीन

खुप सुरेख कविता
फाटक्या या संसाराला ठिगळाची घाई
ही शब्द बांधणी कमालीची प्रभावी वाटली..