रिटर्न गिफ्ट
लेखनविषय:
कातरवेळ कधी रिकाम्या हाती येत नाही
आठवणींच्या सुंदरशा कव्हर मध्ये गु्ंडाळलेले खूप सारे प्रश्न आणते ती..
मी काही उघडून पहातो
तर काही तसेच ठेवून देतो
येऊ घातलेल्या रात्रीला भेट देण्यासाठी.
न उघडलेल्या गिफ्टस् दुसऱ्यांना देण्याची पद्धतच आहे हल्ली...
मग लाजत मुरकत पहाट येते,
पाठोपाठ सकाळ... दुपार ...दोघी कामात बुडलेल्या...
आणि नंतर पुन्हा कातरवेळ....
कातरवेळ कधीच रिकाम्या हाती येत नाही,
मी रात्रीकडे पुढवलेले प्रश्न नव्या वेष्टनात पुन्हा मलाच गिफ्ट मिळतात....
वाचने
4014
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
शीर्षक अचूक.
In reply to बहोत खूब! क्या बात है! by बहुगुणी
शीर्षक अचूक आहे.
कविता आवडली.
फार सुंदर विचार आहे हां.
क्या बात है!मस्तच.
व्वाह...! व्वाह...! व्वाह...! व्वा!!!
क्या लपेट लपेट के खोला है रे!!!
मान गये उस्ताद!
सोपी, सुबक तरी अर्थवाही.
आवडली
मस्तच
गुलाबासारखी कविता. पाकळ्या पाकळ्यांत सुगंध भरलेली... मजा आ गया!
चांगली कल्पना. पुढवलेली म्हणजे?
In reply to चांगली कल्पना. पुढवलेली by अंतरा आनंद
Forward केलेली
अचूक!!
क्या बात है...
सुंदर. अर्थवाही.
कल्पना आवडली..
धन्यवाद!
"कातरवेळ कधी रिकाम्या हाती येत नाही"
अगदी बरोबर..
खूप सुरेख कल्पना जी कवीलाच सुचू शकते.
In reply to खूप सुरेख कल्पना जी कवीलाच by नूतन सावंत
धन्यवाद!
खूप छान जमलीय...
खूपच मस्तं कॉन्सेप्ट. कविता खूप आवडली.
मस्तच.
बहोत खूब! क्या बात है!