क्षणभंगुरता
लेखनविषय:
आज तूही जगात आहेस
आज मीही जगात आहे
आपल्यात काहीतरी बिनसलंय
हे दोघांनाही ज्ञात आहे
कधीकाळी जुळली होती आपली मने
मग दिसू लागले फक्त एकमेकांचे उणे
वाढत्या अंतराने दुरावतच गेलो
आयुष्याच्या प्रवाहात वहावतच गेलो
आज मागे वळून पाहताना वाटतंय
की नसतं झालं असं तर बरं झालं असतं
दबलेल्या अगणित भावनांचं ओझं
इथपर्यंत वागवावं लागलं नसतं
उद्या कदाचित तूही नसशील …. किंवा मीही नसेन
तरीही असंच अव्याहत चालू असेल जग
क्षणभंगुर आयुष्य आहे हे आपलं
हे राग लोभ कशाला हवेत मग?
सगळं सोडून देऊन बघू एकदाच
जसं काही झालंच नाहीये
मी तयार आहे विसरायला मागचं
पण दोन पावलं तूही पुढे ये !!
वाचने
2653
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मस्त...पण च्यायला वास्तव आहे
In reply to मस्त...पण च्यायला वास्तव आहे by टवाळ कार्टा
हेच म्हणतो...
चांगली आहे
क्षणभंगुर आयुष्यात ही.. त्या
मस्त कविता
छान , आवडली!
आवडली!
नकारात्मक सुरु झालेल्या कवितेचा सकारात्मक शेवट आवडला.+१In reply to आवडली! by बहुगुणी
+++१११
भारी !!!
भापो !
छान कविता.
सगळ्या मान्यवरांचे आभार !
In reply to सगळ्या मान्यवरांचे आभार ! by माम्लेदारचा पन्खा
आवडले
छान आहे.