मालगाड़ी
लेखनविषय:
मला आय नाय, बाप हाय.
आगीवाले डोळे त्याचे,
अन जबान चाबुक हाय.
निघतो रोज सकाळपारी
धूर सोडत इंजनवाणी,
जणू पटरी पायाखाली.
ठरली ठेसनं ठरलं काम,
येगळी माणसं येगळा दाम.
येतो झिजून रातपारी
धूर सोडत इंजनवाणी,
वेडीवाकडी पटरी घेउन पायाखाली.
पाठ लाऊन भिताडाला
घाम पाजीत बसतो अन,
'काय केलस दिसभर?'
जणू इचारतो सोताला..
'काय नाय' जवाब मातूर माझा हाय.
आगिवाले डोळे ओकतो,
चाबुकवाली जबान ठोकतो,
हातालाभी लई जोर,
हाणतो मात्र आंगचोर.
विडी-चूल पेटवून आत,
रोजच्यावाणी डाळ-भात,
खाऊन पडतो गपगार..
पाहत राहतो उदयापार.
'काय करणार?'इचारल्यावर,
बापावाणी अडाणपण,
चढलं मुखडयावरती अन,
'मालुम नाय' गेलो बोलून..
रातभर कुशीत तेच्या,
कान लावून छाताड़ाला..
मालगाड़ीची सारी धड-धड ऐकत राहिलो..
बिगर सपनांची खाली गाड़ी, बघत राहिलो.
सकाळच्याला...
बाप माझा, निघाला जवा,
धूर सोडत इंजनवाणी...
बोट धरून जूडलो मीबि,
जणू तेच्या डब्यावाणी...
वाचने
2893
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
काही कळले नाही. :(
In reply to काही कळले नाही. :( by प्राची अश्विनी
आईवेगळ्या पोराची कथा
In reply to आईवेगळ्या पोराची कथा by पैसा
सहमत
In reply to सहमत by Vimodak
ओह! चुकून "आय नाय, बाप नाय"
In reply to ओह! चुकून "आय नाय, बाप नाय" by प्राची अश्विनी
: )
आवडली.
चटका लावून गेली.
आशयगर्भ अभिव्यक्ती!
पाहत राहतो उदयापार.
In reply to पाहत राहतो उदयापार. by अंतरा आनंद
पाहत राहतो उदयापार.
फार सुंदर, आशयघन कविता आहे.
In reply to फार सुंदर, आशयघन कविता आहे. by एस
+१
खूप छान!
कविता आवडली मोडक साहेब. अशाच
In reply to कविता आवडली मोडक साहेब. अशाच by किसन शिंदे
आभार
मनाला चटका लावणारी कविता.
आवडली! धन्यवाद..!!
फारच
अप्रतिम काव्य ! अप्रतिम
वा! सुरेख.