मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

टवाळ कार्टा · · जे न देखे रवी...
पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412) आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे अवधूत गुप्ते यांची माफी मागून… ---------------------------------------------------------- सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS... पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS पुरे झाली ता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता... दगडात माझा जीव होताSSS
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती एकटेच बसावे...इथे नको साथी गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS
डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...
प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

वाचने 23882 वाचनखूण प्रतिक्रिया 109

गवि Mon, 04/27/2015 - 17:39
याच अशा वेळी याच अशा अवस्थेत एखादी म्हैस द्रुतगतीने आपल्याकडे चाल करुन येऊ लागल्याचा अनुभव कोणाला आहे का? अनुभव आणि उपाय, दोन्ही एकातच साधते. असो. हल्ली कोण खेडेगावात जातो हे अनुभव घ्यायला..?

In reply to by सूड

ताब्यांचे प्रकार आणि उपप्रकार ठरवण्यासाठी पेशल कमिटी 'बसवली' आहे. ;) तिचं काम उरकलं की आलेल्या रिपोर्टवरून कोणता तांब्या योग्य ते ठरवता येईल. :)

In reply to by नाखु

टवाळ कार्टा Wed, 07/20/2016 - 15:50
"गुर्जींचे परममित्र" हा मिसळीच्या पाककृतीतलाच एक जिन्नस आहे...त्यामुळे तो नसेल तर मिसळ बनत नाही...तस्मात मिसळीची भूक लोणावळ्याच्या बुवा मिसळीवर भागवावी म्हणतो