Skip to main content

रातराणी

लेखक Vimodak यांनी शुक्रवार, 24/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
डोह काळा डोक्यावरी अन् , तारकाही भरजरी.. एक चन्द्र वाहता अन् एक होड़ी धावती. हिरे माणिक तरंगते, जणू लक्ष दिव्यांच्या मैफिली, कुजबुज त्यांची मोकळी.. 'ति' राहिली ना आपली. निखळले कमजोर तारे, दोष देऊनि मला... मी मूक राहून पळभरी, श्रद्धांजलि त्यांस वाहिली. लोटुनी गुंबज मनोहर, तिज पापण्या मग श्रांतल्या.. भिस्त मजवर टाकुन सारी, ती 'रातराणी' झोपली.
लेखनविषय:

वाचने 1965
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सुरेख कविता!

फार सुंदर रचलीय.

.

सुरेख!