कैदाला आणि शिबी
तेराव्या शतकात होयसाळांच्या राजवटीत एक महान शिल्पकार होवून गेले जकनाचारी. त्यांचा जन्म झाला तुमकुर जिल्ह्यातील कैदाला ह्या गावात. सोमनाथपुरा आणि बेलुरच्या सुंदर मंदिरांचे ते रचनाकार होते. ही मंदिरे बांधत असताना ते बरीच वर्षे घरी गेले नाहीत. त्यांचा मुलगा दनकाचारी. जो स्वत: एक उत्तम शिल्पकार होता त्याने आपल्या वडिलांना पाहिले नव्हते. त्याने आपल्या वडिलांचा शोध घेण्याचे ठरीवले. तो त्यांना शोधत बेलुरला येवून पोहचला. तिथे केशवाची एक मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येत होती. दनकाचार्याने त्या मूर्तीमध्ये दोष असून त्याची स्थापना करू नये असे सुचवले. ते ऐकून त्या मूर्तीचे मुख्य शिल्पकार जनकाचारी ह्यांना राग आला. ( बाप लेक अजून पर्यंत एक दुसर्याला ओळखत नव्हते) "ह्या मूर्तीत जर दोष निघाला तर मी स्वतःचा उजवा हात कापून टाकेन" अशी प्रति़ज्ञा जनकाचारी ह्यांनी केली.
त्या संपूर्ण मूर्तीवर चंदनाचा लेप देन्यात आला. काही वेळाने, नाभी वगळता बाकी सर्व ठिकाणचे चंदन वाळले. थोडी तपासणी केल्यावर त्यांना त्या ठिकाणी वाळू आणि पाणी असलेली एक छोटी पो़कळी सापडते आणि त्यात एक छोटा बेडूक.
हा दोष पाहिल्यावर जनकाचारी आपल्या हलजर्गी पणावर चिडतात आणि स्वत:चा उजवा हात तोडून टाकतात. नंतर पितपुत्राची ओळख होते.
ह्या घटनेनंतर ते दोघेही आपल्या गावी कैदाला इथे पोचतात. एक दिवस त्यांना स्वप्नात त्यांना विष्णु दर्शन देतात आणि जनकाचार्याने कैदाला इथे आपले मंदिर बांधावे अशी ईच्छा प्रकट करतात. आणि त्यानंतर कैदाला इथे चन्ना केशवा ( सुंदर विष्णु) मंदिर उभारण्यात येते. जनकाचारी आणि दनकाचारी स्वतः ती मुर्ती घडवतात. त्यानंतर ईश्वर प्रसन्न होऊन, वर स्वरूपात, जकनाचार्यांचा कापलेला हात पुनः पूर्ववत व्यवस्थित होतो.
कैदालाची विष्णुची मूर्ती ही बहुदा दक्षिण भारतातील( किंवा कदाचित पूर्ण भारतातील) सर्वात सुंदर मूर्ती आहे. भागवात पुराणातील विष्णुच्या वर्णानाप्रमाणे ही मूर्ती घडवली आहे. मूर्तीचा बाजूने विष्णुचे दाही अवतार कोरले आहेत. मूर्तीच्या एका हातात गदा आहे. पुजारी गदा आणि हाताची पाची बोटे ह्यांच्यातून एक सुई आरपार घालवून दाखावतात. वरील गोष्ट किती खरी ते माहित नाही, पण मी जर ईश्वर असतो तर ती मूर्ती पाहून नक्कीच त्यांच्या सर्व ईच्छा पूर्ण केल्या असत्या.
मंदिरात मूर्तीचा फोटो काढण्याची परवानगी मिळाली नाही म्हणून ही फोटो आंतरजालावरून साभार.
आता मी काढलेले फोटो.
हे मंदिर प्रचंड साधं पण प्रशस्त आहे. मंदिराचे प्रवेशद्वार.
दरवाज्यावर कोरलेली अप्सरा.
कमानीवर कोरलेला विष्णु
दुसर्या बाजूला कोरलेला कृष्ण
मुख्य मंदिर
मागून एक फोटो
मंदिराचे आतले प्रवेश्द्वार
आतील भाग.
केशवा मंदिराच्या बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. दुर्दैवाने ते बंद असल्यामुळे बाहेर जाळीतून फोटो काढावा लागला.
कैदालाहून चाळीस एक किलोमीटर अंतरावर NH4 वर शिबी (seebi) येथे नृसिहाचे मंदिर आहे. हे मंदिर जवळपास ४०० वर्षे जुने असून मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.
मंदिराचे प्रवेश द्वार
मंदिराचा आतील भाग
मंदिरा बाहेर एक मोठी पुष्कर्णी आहे. त्याचे काही फोटो
परत येताना तुमकूरजवळ एक मोठे तळं लागलं, तिथे सूर्यास्ताचे काढलेले काही फोटो
बेंगलोर ते कैदाला ७५ किमी आहे आणि तेथून शिबी ४० किमी. ह्यातील बराचसा प्रवास बेंगलोर-पुणे हायवेवर होतो. त्यामुळे आधी कैदालाला जा, परत तुमकुरला येवून शिबी. जेवण तुमकूरला करणे उत्तम. हा प्रवास अर्ध्या दिवसात करता येतो.
दरवाज्यावर कोरलेली अप्सरा.
कमानीवर कोरलेला विष्णु
दुसर्या बाजूला कोरलेला कृष्ण
मुख्य मंदिर
मागून एक फोटो
मंदिराचे आतले प्रवेश्द्वार
आतील भाग.
केशवा मंदिराच्या बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. दुर्दैवाने ते बंद असल्यामुळे बाहेर जाळीतून फोटो काढावा लागला.
कैदालाहून चाळीस एक किलोमीटर अंतरावर NH4 वर शिबी (seebi) येथे नृसिहाचे मंदिर आहे. हे मंदिर जवळपास ४०० वर्षे जुने असून मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे.
मंदिराचे प्रवेश द्वार
मंदिराचा आतील भाग
मंदिरा बाहेर एक मोठी पुष्कर्णी आहे. त्याचे काही फोटो
परत येताना तुमकूरजवळ एक मोठे तळं लागलं, तिथे सूर्यास्ताचे काढलेले काही फोटो
बेंगलोर ते कैदाला ७५ किमी आहे आणि तेथून शिबी ४० किमी. ह्यातील बराचसा प्रवास बेंगलोर-पुणे हायवेवर होतो. त्यामुळे आधी कैदालाला जा, परत तुमकुरला येवून शिबी. जेवण तुमकूरला करणे उत्तम. हा प्रवास अर्ध्या दिवसात करता येतो.
वाचने
7602
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
छान आलेत फोटो
मस्त माहीती , छान फोटो
सुरेख!
लेख आवडला. कुठून कुठून नवी ठिकाणे शोधता तुम्ही. बंगलोर मध्ये राहूनही बुल टेम्पल न पाहिलेला :((((
मला तिरुपती बालाजीची मूर्ती फार आवडते.अत्यंत प्रेक्षणीय मूर्ती आहे.
In reply to लेख आवडला. कुठून कुठून नवी by विअर्ड विक्स
+१
In reply to लेख आवडला. कुठून कुठून नवी by विअर्ड विक्स
बंगलोर मध्ये राहूनही बुल टेम्पल न पाहिलेलावेळ काढा की राव जरा. तिथं जाण्याचं अजून एक कारण सांगतो. बुल टेंम्पल जवळ कामत हॉटेल आहे. तिथं छान महाराष्ट्रिय ( इथे त्याला "North Karnataka" म्हणतात) जेवण करायला मिळेल :)
तेराव्या शतकात होयसाळांच्या राजवटीत एक महान शिल्पकार होवून गेले जकनाचारी.
ते ऐकून त्या मूर्तीचे मुख्य शिल्पकार जनकाचारी ह्यांना राग आला.नक्की कुठलं नाव योग्य? कारण वर दोन्ही नावं बर्याच वेळा आली आहेत...की दोन्हीही बरोबर आहेत?
In reply to तेराव्या शतकात होयसाळांच्या by असंका
जकनाचारी हे बरोबर आहे. जनकाचारी ही लिहिण्यातील चुक आहे.
छान फोटोज
शेवटच्या फोटोत झुडपाच्या फांद्यांनी सुरेख कुयरी रेखाटली आहे. अगदी हातावरच्या नाजूक मेंदी सारखी.
In reply to शेवटच्या फोटोत झुडपाच्या by स्पंदना
पहिल्यांदा प्रका पहिला तेव्हा दिसली नाही. नंतर दिसली. निरीक्षण उत्तम. बाकी छ्यायाचीत्राकाराचा दृष्टीकोन जाणून घ्यायला आवडेल.
In reply to पहिल्यांदा प्रका पहिला तेव्हा by विअर्ड विक्स
दृष्टिकोन वगैरे काही नाही हो. एक लो अँगल शॉट घ्यायचा प्रयत्न केला होता. ते कोयरी वगैरे तिथ काही दिसलं नव्हत. मटका लागला म्हणायचा. :) एव्हढी निरिक्षणशक्ती चांगली असती तर चित्रकार झालो असतो, उगाच कॅमेरेची बटणं दाबत बसायची वेळ आली नसती!
In reply to शेवटच्या फोटोत झुडपाच्या by स्पंदना
काय निरिक्षण आहे! फोटो आजवर शंभरवेळा पाहून आजपर्यंत हे लक्षात आले नव्हते.
वाखूसा
अप्रतिम मूर्ती आणि झकास मंदिर. अशी हटके ठिकाणे अजून लोकांपर्यंत पोहोचवणे खूप आवश्यक आहे, त्याबद्दल धन्यवाद.
आता काही प्रश्नः
१. ते मुख्य मंदिराच्या आतील भागात एखाद्या चौकोनी ट्रेसदृश आकारात काळसर काय आहे?
२. शिलालेखसदृश काही कुठे दिसले का?
बाकी मूर्ती बघून खरेच डोळ्यांचे पारणे फिटले.
In reply to अप्रतिम मूर्ती आणि झकास मंदिर by बॅटमॅन
ते मुख्य मंदिराच्या आतील भागात एखाद्या चौकोनी ट्रेसदृश आकारात काळसर काय आहे?मातीच्या पणत्या आहेत
शिलालेखसदृश काही कुठे दिसले का?पाहिल्याचे फारसे आठवत नाही. कैदालाला भेट देवून जवळ्पास एक वर्ष होवून गेलं.
In reply to ते मुख्य मंदिराच्या आतील by पॉइंट ब्लँक
मातीच्या पणत्या आहेतअच्छा, धन्यवाद.
अप्रतिम आहेत फोटोज.
नाद खुळा फोटोज! त्या पुष्करणीच्या फोटोला तोड नाही
खूपच सुंदर मूर्ती आहे विष्णूची
फोटो पण मस्त
फोटो आणि स्थान. वास्तू-शिल्प अत्यंत देखणे आहे. बाकी दक्षिणेकडे सगळीच मंदिरे डौलदार वास्तूचा वारसा मिरवणारी आहेत.
पूर्वी दूरदर्शनवर रविवारी दुपारी प्रादेशिक चित्रपट दाखवले जात (आताही दाखवले जात असतील, माहीत नाही) तर मी लहान असताना कन्नड (बहुधा) चित्रपट पहिला होता त्यात तुम्ही जो प्रसंग सांगितला आहे, देवीच्या मूर्तीच्या पोटात बेडूक सापडण्याचा तो अजूनही अगदी डोळ्यासमोर आहे. बाकीचे काही आठवत नाही, पण हा प्रसंग मात्र अगदी स्वच्छ आठवतो.
In reply to पूर्वी दूरदर्शनवर रविवारी by प्रसाद प्रसाद
"अमरशिल्पि जकनाचारी" ह्या नावाचा एक कानडी चित्रपट आहे. बहुदा तो पाहिला असेल तुम्ही :)
सुरेख फोटो
अप्रतीम देउळ, मुर्ती आणि फोटो.
अप्रतिम फोटो, छान माहिती! भेट द्यायचे एकेक नवीन ठिकाण माहीत होत आहे! धन्यवाद!!
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो आणि माहीती!
छान आलेत फोटो