कहाणी एका पाण्याची !
नविन लुथरा स्वत:ची कहाणी सांगत होते.
“हा प्रवास माझ्या साठी बहुधा अतिशय महत्वाचा ठरायचा होता “
कॅप्टन दीपक मोहन यांनी तेल-वाहतुकीच्या धंद्यात बक्कळ पैसा कमावला होता अन तो पैसा त्यांना इथे भारतामध्ये जमीनीत गुंतवायचा होता.
मुळशीला पोहोचल्यावर दोघांनी जमीन खरेदी साठी जमीनमालक शेतकरयांशी बोलणी सुरु केली.
कॅप्टन साहेबांना जमीन खूपच महाग वाटली. खरेदीचा विचार सोडून देवून ते परत त्यांच्या तेल-वाहतुक धंद्यात व्यग्र झाले. दुर्दैवाने दोनच वर्षात त्यांचे निधन झाले. मला मात्र त्या जमीन खरेदीचा विचार स्वस्थ बसु देईना. मला जागाही छान वाटली होती. रिटायरमेंट नंतर स्थायिक व्हायला बरी म्हणुन मग मी ती १०० एकर जागा विकत घेवून टाकली.
नंतर पाच-सात वर्षांनी लुथरांनी एका पावसाळ्यात परत मुळशीला चक्कर मारली अन तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडून पुढील काही वर्षात आणखी जमीन विकत घेण्याचा सपाटा लावला.
“ सध्या माझ्या मालकीची १५०० एकर पेक्षाही जास्त जमीन आहे. सुरुवातीला रू. ५०० एकर या दराने मी जागा घेतली. नंतर या आणखी खरेदीच्या काळात त्याचा सरसरी दर रू. १०००० (दहा हजार) प्रति एकर इतका होता. त्यावेळच्या मानाने महागच की !
इथे आता पर्यटन व्यवसायतले काही तरी करावे ही कल्पना माझ्या डोक्यात मूळ धरु लागली अन मी भन्नाट असा "केव्ह हॉटेल" प्रकल्प करायला घेतला. स्वतःसाठी बंगलाही बांधायला घेतला. आता या साठी पाणी कुठून आणायचं याचा काही विचारच मी केला नव्हता.
मला जाणवलं की याला, विशेषतः हॉटेल प्रकल्पाला भरपूर पाणी लागणार. मी पाण्यासाठी धावाधाव सुरू केली. अगदी टाटांकडे सुद्धा गेलो. टाटा ग्रुप त्यावेळी मुळशी धरण-जलाशय लीझ वर चालवत होते व पाण्याचे वितरण-व्यवस्थापन करत होते. त्यांनी माझ्या पाणी-विनंतीला नकार दिला ! बोअर खणणं माझ्यासाठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरला असता कारण मला रोज तीन लाख लिटर पाण्याची गरज होती.
अश्या किती बोअर-विहरी खणणार होतो मी ? खुप अस्वथ झालो होतो मी !
असाच एके दिवशी बसलो असताना, जवळच राहणारा एक परिचत गावकरी माझ्याकडे आला. बोलता बोलता म्हणाला" इथे या जमीनीत जिवंत झरे आहेत, तुमची पाण्याची चिंता मिटून जाईल" हे ऐकून उत्साहित झालेले लुथरा लगेचच कामाला लागले. साधारण किती पाणी मिळेल याचा अंदाज घेण्यासाठी दोन पंप बसवून घेतले.
"तो मे महिना होता, अन या ऐन उन्हाळ्यात या झरयातून मुबलक, म्हणजे ३-४ लाख लिटर पाणी आम्ही उपसत होतो, पाण्याची पातळी खाली जायचे नाव घेइना. आमची पुरेपुर खात्री पटली की इथं भरपूर पाणी आहे. मग आम्ही हे पाणी पिण्यायोग्य आहे का याची चाचणी घेतली. एका कडून नाहीतर चार्-चार जणां कडून चाचणी करुन घेतली. हो पाणी नि:संशय पिण्यायोग्य होते. आम्ही खुष झालो. एका मित्राला या पाण्याचे रिपोर्ट दाखवले. हा मित्र पाणी-शुद्धिकरण क्षेत्रात काम करायचा. एक्सपर्ट होता तो त्यातला. म्हणाला " पाणी" बेस्ट आहे, उच्च दर्जाचं आहे. आणि विशेष म्हणजे हे पाणी पेस्टीसाईड-मुक्त होतं !
म्हणजे लुथरांनी जिथं खणलं होतं तो "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” होता ! "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” म्हणजे "जैविक दृष्ट्या संपन्न अन अतिशय “दुर्मिळ” असं ठिकाण होतं !
ब्रिटीश पर्यावरण शास्त्रज्ञ नॉरमन मायर्स यांनी ही हॉटस्पॉटची संकल्पना रुजवली. त्यांच्या अभ्यासानुसार ज्या ठिकाणी ०.५ टक्के किंवा १५०० विविध प्रकारच्या व्हेस्कुलर वनस्पती आहेत व "पर्यावरण-स्त्रोत" च्या इतर अनेक चाचण्यांत जे ठिकाण उत्तिर्ण होते, तो बायो-हॉटस्पॉट ! भारतात अशी दोनच ठिकाणे आहेत, एक मुळशी व दुसरे गुजरातमधील आवा !
• * * * * * *
लुथरांनी मग पुढील चार वर्षे हे अति-शुद्ध पाणी, त्याचा नैसर्गिकक दर्जा न बिघडवता जसंच्या-तसं बाटलीत कसं भरता येईल यावर बरेच प्रयोग केले अन यात पुर्णपणे यशस्वी झाल्यावर सन २००९ मध्ये "मुळशी स्प्रिंग वॉटर" या नावाने बाजारात आणलं.
लगोलग हे पाणी लुथरा यांचे मित्र ओबेरॉय हॉटेल्सचे चेअरमन बिकी ओबेरॉय यांच्या कडे पोहोचवण्यात आले. हे पाणी त्यांच्या पसंतीस उतरले, जेंव्हा त्यांना समजले की याचा स्त्रोत बायो-हॉटस्पॉट आहे, ते आणखी चकित झाले. उत्सुकते पोटी मुळशीला येऊन बायो-हॉटस्पॉट व बॉटलिंग प्लान्ट बघून गेले. मग काही दिवसातच मुळशी स्प्रिंग वॉटरला ओबेरॉय हॉटेल अन ओ-क्वीला ट्रायडंट हॉटेलची मोठी ऑर्डर मिळाली.
सद्ध्या ओबेरॉय ग्रुप रोज १७,००० "मुळशी स्प्रिंग वॉटर" च्या बाटल्या विकत घेतो आहे. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे पॅरीस इथे "कॉलेट" नावाच्या जगातल्या नामांकित "वॉटर बार" जो अति-दर्जेदार पिण्याच्या पाण्या साठी प्रसिद्ध आहे तिथेही "मुळशी स्प्रिंग वॉटर" विकले जाते.
"आम्ही अतिशय जाणीवपुर्वक "कॉलेट वॉटर बार" कडे ऍप्रोच झालो कारण आम्हाला माहित होतं "कॉलेट"नं शिक्कामोर्तब केलं की "मुळशी” जागितक पातळीवर मान्यता पावणार होतं" लुथरा अभिमानाने सांगत होते.
मग "कॉलेट" कडून ऑर्डर मिळायला फारसा प्रयास करावा लागला नाही. अर्ध्या तासातच बोलणी आटोपली, हे पाणी चक्क भारता मधलं आहे या वर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हे पटवायलाच त्यातला निम्म्याच्या वर वेळ गेला, कारण भारतातल्या स्वच्छते बाबत जगात काय प्रतिमा आहे हे आपणा सर्वांना माहित आहे. आता हा भारतीय ब्रॅण्ड "कॉलेट" मेनू कार्ड वरचा एक नंबरचा आयटम आहे.
•
ओबेरॉय व्यतिरिक्त लीला ग्रुप हॉटेल व आयटीसीच्या हॉटेल्स मध्येही "मुळशी" उपलब्ध आहे. तुम्हाला जर मुंबईत मुळशी हवं असेल तर बिग सिनेमाज, "हक्कासन, याऊक्ताचा" या अंतरराष्ट्रीय रेस्टॉरंटस इथे ही उपलब्ध आहे. स्पेन्सर रीटेल हेच पाणी वेगळ्या नावने त्यांच्या स्टोअर्स मध्ये उपलब्ध करुन देणार आहे.
आता लुथरा यांनी बॉटलिंग प्लान्ट ची क्षमता भरपूर वाढवलीय.
७५० मिली. ची "मुळशी स्प्रिंग वॉटर" ची बाटली महाराष्ट्रात रु. ५० ला व राज्याबाहेर रु. ५५ ला आहे.
५२ वर्षीय नविन लुथरा खुप खुष आहेत. रु. १०००० (दहा हजार) प्रति एकर दराने घेतलेली जागेत आज रोज रु. ३० लाख इतकी उलाढाल होतेय. इतक्या कमी पैश्यात इतकं भरघोस उत्पन्न, अजून काय पाहिजे ?
ही आहे कहाणी एका पाण्याची, पाणीथेंबातुन खुळखुळणारया नाण्यांची !
* * * * * * * * * * * * * * * * * * * * *
तीनचार वर्षांपुर्वी डी.एन.ए. हे इंग्रजी वृत्तपत्र वाचता वाचता आशिष तिवारी यांनी लिहिलेली एक मुलाखत कम रिपोर्ताज माझ्या वाचनात आला. ही “पाण्याची कहाणी” मला विलक्षण वाटली. आता ही असली सुरस कहाणी वाचल्यावर, मिपाकर मित्रांना सांगितल्या शिवाय थोडंच राहवेल ? मग या कहाणीचे मराठीत रुपांतर केले. कसा वाटला हा माझा हा अल्पसा प्रयत्न
- चौथा कोनाडा In reply to अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP by एस
In reply to अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP by एस
In reply to +१ by रामपुरी
In reply to अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP by एस
In reply to रिप का म्हंटलं आहे कळलं नाही by अजया
In reply to RIP! by एस
In reply to RIP! by एस
In reply to धन्यवाद स्वॅप्स.मी जिथे by अजया
In reply to शक्य आहे. by एस
In reply to आणि मग ऑनलाईन पीटिशन पाहून by नगरीनिरंजन
In reply to RIP! by एस
In reply to स्वॅप्स खुप महत्वाची व by चौथा कोनाडा
म्हणजे लुथरांनी जिथं खणलं होतं तो "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” होता ! "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” म्हणजे "जैविक दृष्ट्या संपन्न अन अतिशय “दुर्मिळ” असं ठिकाण होतं ! ब्रिटीश पर्यावरण शास्त्रज्ञ नॉरमन मायर्स यांनी ही हॉटस्पॉटची संकल्पना रुजवली. त्यांच्या अभ्यासानुसार ज्या ठिकाणी ०.५ टक्के किंवा १५०० विविध प्रकारच्या व्हेस्कुलर वनस्पती आहेत व "पर्यावरण-स्त्रोत" च्या इतर अनेक चाचण्यांत जे ठिकाण उत्तिर्ण होते, तो बायो-हॉटस्पॉट ! भारतात अशी दोनच ठिकाणे आहेत, एक मुळशी व दुसरे गुजरातमधील आवा !नॉर्मन मायर्स ह्यांनी जी संकल्पना मांडली तिला 'बायोलॉजिकल हॉटस्पॉट' असे नाव नाही, तर ती 'बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट' अशी आहे. त्यांनी दिलेली या संज्ञेची व्याख्या खालीलप्रमाणे आहे - "To qualify as a biodiversity hotspot on Myers 2000 edition of the hotspot-map, a region must meet two strict criteria: it must contain at least 0.5% or 1,500 species of vascular plants as endemics, and it has to have lost at least 70% of its primary vegetation." म्हणजेच, एखाद्या ठिकाणाला जैववैविध्य-संवेदनशील ठिकाण म्हणून मान्यता मिळण्यासाठी मुख्य दोन निकष असे, की एक म्हणजे तिथे त्याच परिसरातील स्थानिक असलेल्या संवाहक झाडांच्या किमान ०.५% किंवा १५०० प्रजाती असाव्यात, आणि त्या परिसरातील किमान सत्तर टक्क्यांहून अधिक वृक्षराजीचा र्हास झालेला असावा. संवाहक झाडांची उदाहरणे म्हणजे मोठाले वृक्ष, उदा. वड, पिंपळ, आंबा, उंबर इत्यादी. अजून सोप्या शब्दांत- 'A biodiversity hotspot is a region of the Earth that is extremely biologically diverse and also under severe threat due to habitat loss, climate change, or extensive species loss. ' (खरंतर जैववैविध्य-संवेदनशील ठिकाण ह्या संकल्पनेवर अनेक आक्षेप आहेत, पण त्यामुळे तेथील पर्यावरणाच्या जतनाच्या निकडीचे महत्त्व कमी होत नाही.) भारतात पश्चिम घाट आणि म्यानमारच्या सीमेवरील ईशान्येकडील वनराई हे दोन प्रदेश अशा जगभरातल्या ३४ ठिकाणांमध्ये मोडतात (केवळ मुळशी वा आवा नव्हे.) ह्या प्रदेशांत संपूर्ण जगातील सुमारे ६०% वनस्पती, पक्षी, प्राणी इत्यादींच्या प्रजाती आढळतात. आणि त्यातही, अनेक प्रजाती ह्या तिथल्या स्थानिक असतात. त्या जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. उदा. चीनमध्ये सापडणारा एक प्रकारचा व्हायपर साप हा केवळ १०० चौरस किलोमीटर इतक्या छोट्या प्रदेशातच आढळतो. त्यामुळे अशा ठिकाणांचे जतन व संवर्धन करणे हे एकूणच उरल्यासुरल्या जैववैविध्याच्या संरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचे असते. म्हणजेच, जैववैविध्य-संवेदनशील ठिकाणाच्या व्याख्येतील दोन निकषांपैकी दुसरा निकष (अधिवास-विध्वंस) हा फार महत्त्वाचा आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की अशी ठिकाणे आधीच धोक्यात आहेत. त्यात तेथील अद्याप तग धरून असलेल्या वनराईमुळे जे फायदे (बायप्रॉडक्ट) मिळतात त्यापैकी एक म्हणजे हे स्प्रिंग वॉटर. पण हे स्प्रिंग वॉटर म्हणजे तेथील अधिकचे पाणी नाहीये. ते पाणी अजूनही शुद्ध आहे ते तिथल्या जैववैविध्यामुळे. पण त्याच जैववैविध्यालाही जिवंत रहायला याच पाण्याची गरज असते. हे पाणी आणि हा बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट हे एकमेकांवर संपूर्णांशाने अवलंबून आहेत. ह्या पाण्याच्या साठ्याचा जर इतक्या मोठ्या प्रमाणावर बेबंद उपसा झाला तर हा हॉटस्पॉट आणखी किती वर्षे टिकू शकेल? हे प्रश्न मला पडले आहेत. आणि आपलं सरकारही GDP दर वाढवण्याच्या नादात उद्योगांपुढे पायघड्या पसरतंय खरं, पण त्यासाठी किंमत दिली जातेय ती आपल्या पर्यावरणाची. त्यामुळे सरकारकडून पर्यावरणासाठी काही होऊ शकेल ही आशा आता तर पारच धुळीला मिळाली आहे. समजा, तरीपण कोणाला हे 'स्प्रिंग वॉटर' काढून जर विकायचेच असेल तर वर डांगेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ते दुर्मिळ ठेऊनही त्यापासून चांगला परतावा मिळवता येईल.
In reply to रिप का म्हंटलं आहे कळलं नाही by अजया
दक्षिणेकडील लोकांनी अश्या प्रकल्पाना विरोध करून थांबवण्यात यश मिळवले आहे.
आजूबाजूच्या परिसराची वाट लागणार असेल, सामन्य माणसांचे जीणे हराम होणार असेल तर अश्या लढाया करणे याला पर्याय उरणार नाही !
यापुढे कार्पोरेटस आणि आम जनता (अर्थात "आहे-रे" अन "नाही-रे" मधला) संघर्ष अटळ असेल. In reply to अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP by हिमु
In reply to अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP by हिमु
In reply to उपसा अजून पाणी, भरा बाटल्यात, by स्पा
In reply to उपसा अजून पाणी, भरा बाटल्यात, by स्पा
In reply to उत्कंठावर्धक लेख by बहुगुणी
In reply to आरसा by चलत मुसाफिर
In reply to आरसा by चलत मुसाफिर
In reply to मुसाफिरभौ, by संदीप डांगे
In reply to वा by चलत मुसाफिर
In reply to सतत फिल्टर्ड पाणीच वापरणारे by संदीप डांगे
In reply to सतत फिल्टर्ड पाणीच वापरणारे by संदीप डांगे
सतत फिल्टर्ड पाणीच वापरणारे आजारांना सतत बळी पडतात असे पाहिले आहे. त्यामुळे होईल तोवर बिन्दास, उपलब्ध असलेले पाणी प्यावे.म्हंजी जर्मनीतले लोकं सतत आजारीच असतील नै? त्यांच्या तर नळालाच फिल्टरचं पाणी येतं म्हणे. :) धट्टी-कट्टी गरिबी वगैरे म्हनतेत ते असलंच कै तरी. पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे ही किमान मान्य होण्याजोगी तरी गोष्ट असावी.
In reply to सतत फिल्टर्ड पाणीच वापरणारे by हाडक्या
In reply to अर्र..... ऐसा नाही बंधो... by संदीप डांगे
पिण्याच्या पाण्याची शुद्धतेचे निकष व्यक्तिगणिक वेगळे आहेत.असे कसे असेल ? किमान शुद्धतेचे निकष हे संशोधनाने ठरवलेले असावेत आणि ते व्यक्ति-निरपेक्ष असावेत.
कारण यात काही खतरा आहे हेच कधी जाणवलं नाही.तुम्हाला जाणवले नाही म्हंजे काय हो ? ई-कोलाय चा जंतू काय उड्या मारताना दिसणारे का ?
आता जर्मनीतले लोक काय पाणी पितात याच्याशी मला काय कर्तव्य.तसे कर्तव्य मला पण नैच हो पण तुम्ही मुद्दा स्वच्छ पाण्याचा घेतला होतात म्हणून मी एक उदा. म्हणून त्यांना मध्ये आणले (तुम्ही फ्रान्स, युके , स्वीडन अथवा जिथे खात्रीलायकरित्या "सर्वत्र" स्वच्छ पाणी नळातून मिळते असे ठिकाण निवडा). आपल्या देशात तुम्ही म्हणाला तसे "तितक्याच" शुध्दीकरणाच्या प्रक्रिया सर्वत्र होतात याची खात्री सरकार देखील देऊ शकत नाही म्हणून तर पाणी उकळून प्या असे अधिकृत पणे सरकारच सांगते. याला कोणताही विदा नाही पण फक्त इतरांना नावे ठेवायची म्हणून काहीही दावे कशाला करायचे ?
बाटलीबंद पाणी घेऊन त्याला स्टेट्स सिम्बल, हेल्थ कॉन्शसनेस सिम्बल करणार्यांना ते पाणी तरी किती शुद्ध असतं याची काही खात्री? शेकडो किलोमीटर उन्हातून प्लास्टीक बॉटलमधून वाहून येतांना त्या पाण्यावर प्लास्टीकचे परिणाम होऊन काहीच धोकादायक होत नसेल असे मानणे भाबडेपणा आहेहे मान्य. पण तो पहिल्या प्रतिसादातला तुमचा मुद्दा नव्हता त्यामुळे हे अवांतर.
सरकारतर्फे आपल्याकडे एकतर पाणी मिळतं किंवा नाही मिळत. पण मिळतं तेव्हा ते पिण्यायोग्य असतं याची अनुभवाने खात्री देऊ शकतो. बाकी शुद्धतेची व्याख्या कितीही ताणता येते.अनुभवाने खात्री तर बुवा-मांत्रिकाची देतात हो, पाण्याचे परिक्षणच याची खात्री करण्यासाठी वापरावे, एका व्यक्तीचा अनुभव नव्हे (ते ही तो सांगतोय म्हणून, तुमच्या शरिराची चाचणी करुन नव्हे) आणि तशी परिक्षणे आपल्या नळातून येणार्या पाण्यासाठी अनेक पातळ्यांवर फेल जातायत. "बाकी शुद्धतेची व्याख्या कितीही ताणता येते." यासाठी मी किमान शुध्दतेचे निकष असा शब्दप्रयोग केलाय. असो.
In reply to संदिप भौ, कधी कधी तुम्ही इतका by हाडक्या
In reply to सरजी, by संदीप डांगे
भारतातली सरकारी व्यवस्था पुरवत असलेले पाणी पिण्यायोग्य नाही असा समज चुकीचा आहे हा माझा मुद्दा.आणि मग म्हणताय,
प्यायला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, आम्ही फिल्टर लावणार नाही असा पवित्रा आपण लोक घेतच नाही. मग जर्मनी, न्युझीलंडची उदाहरणे देतो. त्यांच्या नागरिकांनी या व्यवस्था करून घेतल्या. जर्मनीच्या नागरिकांनी विशेष प्रयत्न करून ते केले असे मी कुठेसं वाचलं होतं. त्यांनी तो अस्मितेचा प्रश्न बनवला होता असं काहीसं.ते जर्मन न्युझीलंड बाजूस ठेवू पळभर. तुम्ही "प्यायला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, आम्ही फिल्टर लावणार नाही असा पवित्रा आपण लोक घेतच नाही." हे तर मान्य करताय पण त्याच वेळी "भारतातली सरकारी व्यवस्था पुरवत असलेले पाणी पिण्यायोग्य नाही असा समज चुकीचा आहे हा माझा मुद्दा" असे पण म्हणताय. जर दुसरा मुद्दा हाच बहुसंख्य जनतेचा मुद्दा असेल तर पहिला चूकच ठरेल ना? म्हणजे बहुसंख्य जनता भारतातली सरकारी व्यवस्था पिण्यायोग्य पाणी पुरवतेय अस्सेच मानत असेल तर ते पहिला पवित्रा कशाला घेतील ?? मग इतर जण जे बाटलीतले पाणी पितात ते लहानपणापासूनच पितात आणि म्हणून त्रास झालाय असे नेहमीच कसे म्हणता येईल? (मी सहसा बाटलीतले पाणी पित नाही पण दुसरे कोणी पित असेल तर त्याला माझी ना नाही. भूजल्संपदा वगैरे मुद्दे मान्यच पण त्याचा तिथे संबंध नाही.)
जिथे पाण्याची काहीच व्यवस्था होऊ शकणार नाही तिथे सोय म्हणून बाटली सोबत बाळगणे वेगळे आणि सरकारी पाण्याबद्दल अविश्वास दाखवून ती विकत घेणे वेगळे.मी सरकारच स्वतः पाणी उकळून प्या वगैरे सांगत असते, त्यामुळे लोकांनी अविश्वास दाखवण्यासारखे काही वाटत नाही. सरकारने पाणी उकळू नका, ते खात्रीलायक शुद्ध आहे असा प्रचार केल्याचे ऐकिवात नाही. (बाटलीबंद पाणी शुद्धच असते असे काही नै त्यामुळे तो ही तसा गैरसमजच पण ते इथे अवांतर)
आपण आपल्याच देशाला पाश्चात्त्यांच्या नजरेने पाहू लागलो आहोत, हे काही लोकांना फार अभिमानास्पद वाटते.हे माझ्या उदाहरणात आलेल्या जर्मनीच्या उल्लेखाने उपरोधिक नसावे असे मानतो. असो, मी माझी भुमिका मागच्या प्रतिसादात स्पष्ट केली आहेच. इथे फक्त तुमच्या या प्रतिसादातली तार्कित विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केलाय इतकंच.
In reply to बाकी सगळे बाजूस ठेवून तुमचीच by हाडक्या
बहुसंख्य जनता भारतातली सरकारी व्यवस्था पिण्यायोग्य पाणी पुरवतेय अस्सेच मानत असेल तर ते पहिला पवित्रा कशाला घेतील ?सरकारी व्यवस्था पिण्यायोग्य पाणी पुरवतेय असं माझं मत आहे. जनतेचं नाही. तसे जनता मानत नाही म्हणून ती फिल्टर्ड पाणी वापरते असे मी म्हटले आहे. जनतेचं असं मानणं चूक आहे असं मला वाटतं. जनतेनं 'सरकारकडे शुद्ध पाण्याचा आग्रह' धरला पाहिजे असं मला वाटतं. त्याऐवजी ती 'फिल्टर व बाटली' वापरते. यात विसंगती कुठे आहे? मी हेच परत एकदा वेगळ्या पद्धतीने लिहून बघतो. माझा काही गोंधळ झाला असेल तर अवश्य सांगा. १. बहुसंख्य जनता सद्यस्थितीत घरी फिल्टर व बाहेर बाटलीबंद पाणी वापरते. कारणः सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही असं जनतेला वाटतं २. सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही हे वाटतं म्हणून जनता हे करते > घरी फिल्टर व बाहेर बाटलीबंद पाणी वापरते. ३. सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही हे वाटतं तर जनतेने हे करावे असे मला वाटते > आम्ही फिल्टर लावणार नाही, प्यायला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, असा सरकारकडे आग्रह करणे. ४. 'मिळतंय तेच पाणी नशिबाने मिळतंय' असं मानून जनता गप घरी फिल्टर व बाहेर बाटलीबंद पाणी वापरते. आता दुसरा भागः सरकार 'पाणी उकळून प्या' असं का सांगते यामागे बरीच कारणं आहेत. आज आपल्याकडे सर्वत्र शंभर टक्के सरकारी शुद्धीकरण केलेले पाणी पोचत नाही. जनतेला वेगवेगळ्या ठिकाणांवरून, स्त्रोतांमधून पाणी मिळवावे लागते, पुरवल्या जाते. झरे, नद्या, विहीरी, हातपंप, तलाव, टँकर इथून जमेल तसा पुरवठा होतो. साथीच्या रोगांच्या दिवसात, पावसाळ्यात यातले अनेक स्त्रोत दूषीत होण्याच्या शक्यता असतात. बरेचदा अवैध नळजोडणीमुळे, फुटक्या पाईपांमुळे नको ते पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळू शकते. त्यामुळे 'पाणी उकळून प्या' असा प्रचार करणे भाग आहे. तो सरकारी प्रचार असल्याने सार्वत्रिक आहे. त्यामुळे तो सरसकट सरकारी पाण्यालाही लागू होतो असा समज झाला आहे. त्याचा 'सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही असं सरकार स्वतःच म्हणतंय' असा अर्थ काढू शकत नाही. सार्वजनिक पाणीपुरवठा व्यवस्था आपल्याकडे अजून ही गर्भावस्थेतच आहे हे खरे आहेच. पण जिथे सरकारी नळातून कुठेही गळती न होता पाणीपुरवठा होतो तिथे तो पिण्यायोग्य पाण्याचाच होतो असं माझं मत आहे. बाकी यावर सरकारी समित्या किंवा परदेशी धनपोषित येन-जीओ यांचे दावे व परिक्षणे कितपत ग्राह्य धरावी हा एक मुद्दा आहे. म्हणून निष्पक्ष परिक्षण झाल्यास सत्य कळेल असे म्हटले होते. फिल्टर कंपन्या आणि खाजगी पाणी कंपन्या यांनी व्यवस्थित प्रचार करून नळाचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबद्दल जनतेच्या मनात गोंधळ निर्माण केला. त्यावर सवयीप्रमाणे किंवा जीभेवर विशिष्ट वजन पडल्यामुळे सरकारी पाण्याच्या शुद्धतेबाबत सरकार जाणून बूजून खुलासा करत नसावे. या व्यवस्थित प्रचारतंत्राबद्दल सविस्तर कधीतरी लिहिनच, फारच मनोरंजक आणि प्रबोधनपर असेल.
इतर जण जे बाटलीतले पाणी पितात ते लहानपणापासूनच पितात आणि म्हणून त्रास झालाय असे नेहमीच कसे म्हणता येईल?एका प्रकारच्या पाण्याबद्दल आलेला टॉलरन्स दुसर्या पाण्याबाबत तोकडा पडतो. सतत शुद्ध पाणी पित राहल्याने काही विषाणूंविरोधात प्रतिकारशक्ती तयार होत नाही. मग अचानक त्या विषाणूमय पाण्याचे सेवन केले तर त्रास होतो. कुणी काय प्यावे काय पिऊ नये हा माझाही मुद्दा नाहीच. फक्त अभ्यास व पुराव्याशिवाय सरकारी पाण्यावर अविश्वास दाखवून बाटलीबंद पाणी किंवा फिल्टर चे पाणी पिऊ नये असे माझे मत आहे. तुम्ही ई-कोलायचं नाव घेतलं म्हणून सतत शुद्ध पाणी पिणार्या जर्मनीत काय झाले होते ते आठवले. जर्मनीच्या उल्लेखाने उपरोधिक नसावे >> नाही ते अजिबात उपरोधिक किंवा तुम्हाला उद्देशून नाही. ते रोजच्या जीवनात भेटणार्या काही लोकांचं निरिक्षण आहे. तुम्ही जर्मनीचं उदाहरण दिलं तेव्हा "तिकडे बघा"वाली लोकं आठवली... तुमचं जर्मनीचं उदाहरण नेहमी स्वच्छ, शुद्ध पाणी पिणार्या लोकांचं होतं, देशाचं नाही हे मला कळलं. आपल्या देशात बर्याच समस्या आहेत. त्यांना आपल्यालाच सामोरे जायला लागेल आणि दूर करायला लागेल. अशा समस्यांवर बाटलीबंद पाण्यासारखे उपाय काढून काही उपयोग नाही. हिवरेबाजार पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाले. पण समोर एवढे धडधडीत उदाहरण असून सुद्धा त्याच्याच आजुबाजूची गावे अजूनही पाण्यासाठी वणवण करतात. पोपटरावांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की कितीही सरकारी योजना असल्या, माझी मोफत मार्गदर्शन करायची तयारी असली तरी त्या लोकांकडे स्वत:ला बदलण्याची इच्छाशक्ती नाही.
In reply to बहुसंख्य जनता भारतातली सरकारी by संदीप डांगे
माझा काही गोंधळ झाला असेल तर अवश्य सांगा. १. बहुसंख्य जनता सद्यस्थितीत घरी फिल्टर व बाहेर बाटलीबंद पाणी वापरते. कारणः सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही असं जनतेला वाटतंबहुसंख्य ? नक्की ?? की तुम्ही तुमच्या आसपासच्या (जे पुरेसे मध्यमवर्गीय अथवा उच्चभ्रू असावे असा आपला अंदाज) लोकांवरुन ठरवलेत हे.. (आमच्या गावच्या पंचक्रोशीत कोणी असले बाटलीतून पाणी पिणारे नैत ओ..) मी भारतातल्या बहुसंख्यांबद्दल बोलत होतो. तुम्ही नाशकातल्या अथवा मुंबईतल्या बहुसंख्यांबद्दल बोलत असाल तर गोष्ट वेगळी. :) तुम्ही "प्यायला शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे, आम्ही फिल्टर लावणार नाही असा पवित्रा आपण लोक घेतच नाही." हे तर मान्य करताय पण त्याच वेळी "भारतातली सरकारी व्यवस्था पुरवत असलेले पाणी पिण्यायोग्य नाही असा समज चुकीचा आहे हा माझा मुद्दा" असे पण म्हणताय. यातील पहिल्या वाक्याचा सरळ अर्थ आपल्याकडे अजूनही किमान शुध्दतेचे निकष पाळू शकेल असे पाणी बहुतेक ठिकाणी उपलब्ध नाही असाच होतो ना. तेव्हाच दुसरे वाक्य काय म्हणते की तरीही ते पाणी पिण्यायोग्य आहे . का ? (तर तसे तुम्हाला वाटते म्हणून)
एका प्रकारच्या पाण्याबद्दल आलेला टॉलरन्स दुसर्या पाण्याबाबत तोकडा पडतो. सतत शुद्ध पाणी पित राहल्याने काही विषाणूंविरोधात प्रतिकारशक्ती तयार होत नाही. मग अचानक त्या विषाणूमय पाण्याचे सेवन केले तर त्रास होतो..याबद्दल थोडेफार बोलू शकेन अथवा दाखले देऊ शकेन पण इथल्या डॉक्टर्सना विचारलेत तर सोप्या शब्दात योग्य उत्तर मिळू शकेल तुम्हाला. पण या थिअरीने आजवर आपल्या देशातले लोक कॉलरा आणि काविळीसाठी अगदी प्रतिकारक्षम बनलेले असावेत नै का ? डांगेसाहेब, तुमचे या बाबतीतले मत हे अशास्त्रीय आहे व चूक आहे असे माझे स्पष्ट मत आहे ( तुम्हाला "हे माझे मत आहे" असे म्हणायचे असल्यास माझी ना नाही पण ते चूक आहे हे ध्यानात घ्याल अशी अपेक्षा.) आणि इथे परत पहिल्या प्रतिसादातले माझे संशोधनाने ठरवलेले किमान शुद्धतेचे निकष यावर सिद्ध होणारे पाणी हेच पिण्यायोग्य पाणी असे म्हणणे उधृत करतो.
आपल्या देशात बर्याच समस्या आहेत. त्यांना आपल्यालाच सामोरे जायला लागेल आणि दूर करायला लागेल. अशा समस्यांवर बाटलीबंद पाण्यासारखे उपाय काढून काही उपयोग नाही. हिवरेबाजार पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाले. पण समोर एवढे धडधडीत उदाहरण असून सुद्धा त्याच्याच आजुबाजूची गावे अजूनही पाण्यासाठी वणवण करतात. पोपटरावांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की कितीही सरकारी योजना असल्या, माझी मोफत मार्गदर्शन करायची तयारी असली तरी त्या लोकांकडे स्वत:ला बदलण्याची इच्छाशक्ती नाही.बाकी मोघम अवांतराबद्दल तशी असहमती असण्याचे काहीच कारण नाही. बादवे, २०११ च्या या लिंकनुसार पोपटराव पवार हे आदर्श ग्राम योजनेचे Executive Director आहेत, तेव्हा सरकार त्यांचे ऐकतेय आणि त्यामार्फत बरेचसे लोकपण ऐकतील अशी आशा करुयात. असो, या धाग्यावरचे हे अवांतर इथेच थांबवू. अजून चर्चेसाठी याचा वेगळा धागा करण्यास हरकत नै (गरज असेल तर).
In reply to माझा काही गोंधळ झाला असेल तर by हाडक्या
आपल्याकडे अजूनही किमान शुध्दतेचे निकष पाळू शकेल असे पाणी बहुतेक ठिकाणी उपलब्ध नाही असाच होतो ना.पण तुमच्या ह्या विधानाने घरपोच नळाने येणारे सरकारी पाणी पिण्यायोग्य नाही हे कसे सिद्ध होते? बहुसंख्य या शब्दावरून शाब्दिक धुळवडीची तशी आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्या कडे नियमीत सरकारी नळाने पाणी येते त्यापैकी बहुसंख्य लोकांकडे फिल्टर आहेत असा माझ्या विधानाचा अर्थ आहे. जनता या शब्दाचा अर्थ सर्व १२३ कोटी लोक असा सरसकट घेऊ नका. माझा कुठेही गोंधळ झालेला नाही. माझा रो़ख ज्यांना सरकारी नळाने घरपोच पिण्यायोग्य पाणी मिळते तरी ते फिल्टर लावून असतात त्यांच्यावर आहे. ते दाखवत असलेल्या अविश्वासावर आहे. तुम्ही सर्व भारतीय जनतेला मिळणार्या पाण्याबद्दल बोलत आहात. हे दोन सर्वस्वी वेगळे मुद्दे आहेत. त्यानुषंगाने ही चर्चा काहीच उपयोगाची नाही.
या थिअरीने आजवर आपल्या देशातले लोक कॉलरा आणि काविळीसाठी अगदी प्रतिकारक्षम बनलेले असावेत नै का ?वादच घालायचा असेल तर कुठलेही शब्द कसेही फिरवून आपण वाद घालू शकतो. त्याला माझी हरकत नाही. पण मी जे म्हटलंय त्याचा विपर्यास होऊ नये असं मला वाटतं. १. अतिशुद्धीकरणाने चांगले जीवाणू व काही आवश्यक खनिजे पाण्यातून नाहीशी होऊन ते पाणी पिण्यायोग्य राहत नाही असा ड्ब्लूएचओचा दावा आहे. त्याउलट पाण्यात ऑक्सीजन + हायड्रोजन शिवाय कशाचीच गरज नाही असे शुद्ध पाणी पुरवणार्या खाजगी कंपन्यांचा दावा आहे. यातला कुठला खरा तो तुम्हीच ओळखा. विशेष म्हणजे दोन्ही दावे शास्त्रीय माहितीवर आधारित आहेत असे दोघांचेही म्हणणे आहे. २. 'काही' विषाणूंचा प्रथम संसर्ग शरिरात अँटी-बॉडीज तयार करतो. त्याच प्रकारच्या विषाणूंचा संपर्क परत आयुष्यात कधीही झाल्यास त्या अँटीबॉडीज चा फॉर्मुला तयार असल्याने त्वरीत आजार थोपवल्या जातो. सर्व आधुनिक लसी याच सिद्धांतावर आधारित आहेत. त्यात मी नवीन किंवा अशास्त्रीय काहीच सांगितले नाही. मी 'काही' शब्दाचा वापर केला आहे, 'सर्व' नाही. ३. कॉलराचा संसर्ग मानवी विष्ठेचा पिण्याच्या पाण्याशी संपर्क आल्याने होतो. तो संपर्क टाळल्याने कॉलराचा धोका कमी झालाय. असा संपर्क होण्याची शक्यता जास्त असणार्या वस्त्यांमधे फिल्टर वापरण्याची कुवत नसते. सबब हा वर्ग माझ्या प्रतिक्रियांचा भाग नाही. माझा मुद्दा आणि विधाने अजुनही अतार्किक वाटत असतील तर तर्कशुद्ध आणि अभ्यासपुर्ण चर्चेसाठी नवा धागा काढण्यास काहीच हरकत नाही. यानिमित्ताने काही गोष्टी माहित झाल्या आहेत, त्या नविन धाग्यात सविस्तर मांडेन. जेणेकरून घरगुती फिल्टर वापरण्यातला फोलपणा लक्षात येईल. तसेही हा धागा मुळात शुद्धतम पाण्याच्या व्यापाराबद्दल आहे, त्यामुळे ही चर्चा अवांतर आहे असे वाटत नाही.
In reply to आरसा by चलत मुसाफिर
In reply to आरसा by चलत मुसाफिर
In reply to सहमत आहे. सिव्हिलायझेशन नष्ट by नगरीनिरंजन
In reply to एक हजार टक्के सहमत ! by चौथा कोनाडा
In reply to हे चाकाचा शोध लागलान सगळी गडबड झाली.... by बबन ताम्बे
In reply to सिव्हिलायझेशन वरुन एकदम टारझन by चौथा कोनाडा
In reply to सहमत आहे. सिव्हिलायझेशन नष्ट by नगरीनिरंजन

In reply to आरसा by चलत मुसाफिर
In reply to लेख व लेखनशैली आवडली. by सानिकास्वप्निल
In reply to लेख आवडला.अगर पर्यावरणाच्या by विअर्ड विक्स
सोन्याची कोंबडी उद्योजक स्वतः कधीच कापणार नाही )उद्योजक म्हणजे आजच्या काळातले प्रतिपरमेश्वर झालेत. सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ति| त्यामुळे असे होणे स्वाभाविक आहे म्हणा; पण जगात इतरत्र घडणार्या घटना आपल्या समजाला फारसा आधार देत नाहीत. मुळात अशा ठिकाणचं पाणी उपसून बाहेर विकणे म्हणजेच सोन्याची अंडी देणार्या कोंबडीच्या मानेवर सुरी फिरवण्यासारखं आहे. प्लँटचा खर्च व इन्फ्लेशन धरुन लुथरा साहेबांना दरवर्षी गुंतवणुकीवरच्या परताव्यात दरवर्षी वाढ अपेक्षित असणार. गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाणी न विकता ही वाढ कशी मिळणार हे सांगू शकाल काय? आणि जर दरवर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणी विकायचे टारगेट असेल तर त्यांच्या टारगेटसाठी वरुणदेव दरवर्षी तेवढा जास्त पाऊस पाडणार की काय? नसेल तर मग कधीना कधी हे पाणी संपेल की नाही?
In reply to सोन्याची कोंबडी उद्योजक स्वतः by नगरीनिरंजन
In reply to जसे खनिज तेल संपणार तसे by विअर्ड विक्स
In reply to आणि याला तुम्ही यशस्वी व by नगरीनिरंजन
In reply to यशस्वी तर आहेच. कल्पक असेल by बॅटमॅन
In reply to आणि याला तुम्ही यशस्वी व by नगरीनिरंजन
In reply to स्वतःच हॉटेलचा व्यवसाय by विअर्ड विक्स
In reply to लुथरा साहेबांची नातवंडं by नगरीनिरंजन
In reply to सरळ विकल्या नक्की? by पैसा
In reply to शक्यता आहे. तसंही असेल. पण मग by नगरीनिरंजन
In reply to "भारतातील कायदे" by नितिन५८८
In reply to कहनि पान्याची by सुनिल जोग
In reply to कहनि पान्याची by सुनिल जोग
मराठी मनाल सम्पतीचे वावडॅ आहे.हे चुकीचे आहे. त्यापेक्षा "मराठी मनाला अवैध संपत्तीचे वावडे आहे" म्हणणे हे ज्यास्त योग्य आहे आणि अभिमानास्पद सुध्दा.
In reply to मराठी मनाल सम्पतीचे वावडॅ आहे by मराठी_माणूस
In reply to मराठी मनाल सम्पतीचे वावडॅ आहे by मराठी_माणूस
In reply to अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. RIP by सतीश कुडतरकर
In reply to सहमत. by एस
In reply to हो, ना. मागच्याच आठवड्यात by चौथा कोनाडा
In reply to आपण प्रत्येकाशीच सहमत होऊ शकत by नगरीनिरंजन
In reply to =)) by आदूबाळ
In reply to बापरे!! by स्वधर्म
लेखन आवडले.