मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुक्कुट शर्विलक-विलाप

चलत मुसाफिर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(किंचित्कवी समजून चू.भू.द्या.घ्या.) मालवणातिल सागरलहरी मला खिजविती अष्टौप्रहरी बाण लागता नको तिथे हा पर झाली 'कनका'ची नगरी 'कुक्कुट गेले साथ सोडुनी 'विकास' दिसता दुज्या अंगणी चोचीमधला दाणा जपती नख्या आपुल्या तीक्ष्ण परजुनी 'वाघ' लागला मागावरती 'वांदरे'हि किलकारा करती वनवासातुन सुटका या हो कधी व्हायची? घटिका सरती.. 'सोनिया'सम ते दिन ना उरले 'घड्याळा'तलेही क्षण सरले ठेवावे हे मस्तक ऐसी दिसतिल का चरणांची 'कमले'?

वाचने 3809 वाचनखूण प्रतिक्रिया 18

श्रीरंग_जोशी 15/04/2015 - 22:07
वाह, एकदम समयोचित काव्य.

hitesh 15/04/2015 - 23:24
घड्याळातले क्षणही सरले. असे केले तर सुरात बसेल

योगी९०० 15/04/2015 - 23:47
वाह !! क्या बात .... क्या बात .... क्या बात....!!!

मित्रहो 16/04/2015 - 00:43
जबरी एकदम लय भारी

In reply to by रमेश आठवले

रमेश आठवले 16/04/2015 - 02:04
नुकत्याच झालेल्या चार पोट निवडणुकी मध्ये तीन ठिकाणी मृत आमदाराच्या पत्नी त्यांच्या पतिने जिंकलेल्या जागेवर त्याच्याच पक्षातर्फे निवडून आल्या. उत्तराखंड मध्ये कॉंग्रेस, वांद्र्यात शिवसेना व तासगावात पवारांची पार्टी जिंकली. पंजाब मध्ये मात्र तसे काही सुतक नसल्याने अकाली दलाने कॉंग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्याने रिकामी झालेली जागा कॉंग्रेस कडून हिसकावून घेतली. ही पक्षीय राजकारणा पलीकडची मतदारांची भावनिकता, राणे यांच्या सारख्या जुन्या खेळाडूला आधीच लक्षात यायला हवी होती. समयोचित आणि समर्पक हास्यरस कविता.

नाखु 16/04/2015 - 08:56
ही "मुसाफीरी" जाम आवडली. आता नगरसेवक म्हणून निवडणूक लढविणार का हे बघावे लागेल. नाहीतर कोकणात ग्रामपंचायत आहेच की.

चुकलामाकला 16/04/2015 - 09:16
समयोचित!

चलत मुसाफिर 16/04/2015 - 10:05
प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व कुक्कुटप्रेमींचे आभार. रच्याकने, "समयोचित"चा अर्थ "कविता काही खास नाही, पण टायमिंग बरं आहे" असा होतो हे समजण्याइतका आता मिपावर रुळलो आहे :-)

मूकवाचक 16/04/2015 - 14:39
क्या बात है!