नारळी अंडा करी
नारळी अंडा करी
फार ललित लिहिता येत नाही, थेट मुद्द्याचे लिहितो.
यातला मसाला फ़ळभाजी साठी सुद्धा वापरता येइल. विशेषत: बटाटा.
साहित्य:
०१. १ मध्यम बारिक चिरलेला कान्दा
०२. १ टोमॅटोचे चौकोनी आकारात कापलेले तुकडे
०३. १/२ वाटी मटार
०४. २ वाटी नारळाचे दूध
०५. १ टे.स्पून किसलेला लसुण (५-७ पाकळ्या पुरतात)
०६. १ टे.स्पून किसलेले आले
०७. १ टे.स्पून धणे पावडर
०८. १ टे.स्पून जिरे पावडर
०९. १ टे.स्पून तिखट
१०. १ टे.स्पून हळद
११. १-२ बारिक कापलेल्या मिरच्या
१२. सोयीनुसार तेल (मी १/२ वाटी तेल वापरले होते)
१३. १ टे.स्पून मीठ
१४. १/२ टे. स्पून हिंग
१५. १ टे.स्पून मोहरी
१६. १ टे.स्पून गरम मसाला
१७. ४ उकडलेली अंडी
१८. १ कच्चे अंडे
हवे असल्यास...
१ टे.स्पून दालचिनी पावडर
१ टे.स्पून वेलची पावडर
कॄती:
१. अंडी उकडुन घ्या.
फ़ोडणी:
२. एका पसरट भांड्यात तेल तापवायला ठेवा.
३. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका
४. मोहरी तडतडायला लागल्यावर आच थोडी कमी करुन त्यात हिंग घाला.
मसाला:
५. गरम तेलात कांदा टाकुन सोनेरी रंगावर परता.
६. कांदा होत आला असता त्यात मिरची, लसुण, आले टाका.
७. एखाद मिनीट हे सगळे मिश्रण परतुन घ्या.
८. आता त्यात हळद, तिखट, धणे पावडर,जिरे पावडर (हवे असल्यास...दालचिनी पावडर आणि वेलची पावडर) टाकुन एखाद मिनीट परता.
९. १ कच्चे अंडे ह्या मसाल्यात टाकुन परता.
करी:
१०. उकडलेली अंडी मसाल्यात टाका
११. सर्व बाजुंनी मसाला लागेल इतपत अंडी परता .
१२. नारळाचे दूध टाकुन उकळि येउ द्यात.
१३. उकळि आल्यावर गरम मसाला घालुन ५ मिनीटे मंद आचेवर वाफ़वा.
नारळाचे दूध:
१. बाजारात विकत मिळते.
अथवा
१. २ वाटी पाणी कोमट (गार आणि गरम याच्या मधली पायरी) करा.
२. त्यात ४ चमचे ओल्या खोबऱ्याचा किस टाका.
३. हे मिश्रण मिक्सर मधुन ३-४ मिनीटे फ़िरवुन घ्या
४. मिक्सर मधुन काढुन मिश्रण गाळुन घ्या.
अंडी उकडणे:
१. अंडी बुडतील इतके पाणी एका भांड्यात घ्या.
२. त्यात अंडी टाका. आणि मध्यम आचेवर अंडी उकडा. (एकदम गरम आचेवर भांडे ठेवले तर पाणी लवकर उकळुन अंडी फ़ुटु शकतात)
३. पाणी उकळले की गॅस बंद करुन लगेच झाकण घाला.
४. पाणी गार झाल्यावर अंडी सोलुन घ्या.
(टिप: अंडी उकडताना पाण्यात जर चिमुटभर मीठ घातले तर अंडी सोलणे सोपे होते.)
पर्याय:
१. अंडा करी करताना त्यात कच्चे अंडे फेटुन घालता येते
२. याच मसाल्यात बटाटयाची भाजी करता येते.


वाचने
13650
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
फोटो टाकल्याशिवाय मंडळ
करि
हा घ्या या पाकृचा फोटो
In reply to हा घ्या या पाकृचा फोटो by कपिलमुनी
वा काय फोटोय
In reply to हा घ्या या पाकृचा फोटो by कपिलमुनी
धन्यवाद
करी छान दिसते आहे. माहिती पण
वॉव करी तोंपासु दिसतेय
In reply to वॉव करी तोंपासु दिसतेय by दिपक.कुवेत
नक्की का
In reply to नक्की का by कपिलमुनी
:-))
In reply to :-)) by असंका
अथवा इस्कटून सांगावे ही
In reply to :-)) by असंका
व्हिडो
In reply to :-)) by असंका
संदर्भ कशाला?
In reply to संदर्भ कशाला? by दिपक.कुवेत
यप्प.. मी पण हीच पद्धत वापरतो
In reply to संदर्भ कशाला? by दिपक.कुवेत
अंडि पुरेश्या पाण्यात घालून कुकरला एक शीटी काढणे.
In reply to अंडि पुरेश्या पाण्यात घालून कुकरला एक शीटी काढणे. by आनंदी गोपाळ
तीन तिघाडा.
In reply to अंडि पुरेश्या पाण्यात घालून कुकरला एक शीटी काढणे. by आनंदी गोपाळ
भांड्यामध्ये अंडी उकडताना...
In reply to वॉव करी तोंपासु दिसतेय by दिपक.कुवेत
नवीन पद्धत
In reply to नवीन पद्धत by अनन्त अवधुत
.
वेगळी पद्धत करी करायची.
पाककृती आवडली.
वेगळी पाकृ आवडली.
फोटो डकवल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार.
टमाटे अन मटारचे काय व कसे
मस्तच :)
वेगळी पद्धत
१ टे.स्पून वेलची पावडर
In reply to १ टे.स्पून वेलची पावडर by सस्नेह
टी स्पून म्हणायचं असेल भौतेक.
In reply to टी स्पून म्हणायचं असेल भौतेक. by नगरीनिरंजन
टायपो झालाय
मोठ्या आचेवर जोपर्यंत